Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आयुष्य मुळापासून बदलून टाकणारे वळण
    ललित

    आयुष्य मुळापासून बदलून टाकणारे वळण

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 2, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, मांजर, बोका, डंपर, डिगर, दनू, पिदू
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिप्ती चौधरी

    आमचं बंगलोर प्रस्थान रहित झाले! आम्हाला पुन्हा आमच्या मुंबईच्या सोसायटीत आणून सोडले आणि एक महिन्याने परत प्रयत्न करू, असे ठरले. आम्हाला पुन्हा आणून सोडल्यानंतर दोन दिवस आम्ही गायबच झालो. कुठे घाबरून पळून गेलो का, या कल्पनेने साऱ्यांचे धाबे दणाणले होते. पण आम्ही परतून आलो आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

    एक महिन्याने आमच्या प्रस्थानाचा दिवस ठरवला. आता आम्हाला पकडून सरळ बंगलोर गाठायचे होते. सकाळी दूध प्यायला आल्यानंतर मी अलगद डिंपल आंटीच्या हातात सापडलो. तिने रात्रीच माझा पिंजरा तिच्या घरी आणून ठेवला होता. आमचे पिंजरे खूप आधीपासून आणून आम्हाला खेळायला दिले होते, त्यामुळे त्यात आमचा वास येत होता आणि सवयीचाही होता. मी शांत आत बसलो. आता सर्व डंपरची वाट बघत होते. महाशय आले, पण पकडायचा प्रयत्न करताच त्याने सुसाट वेगाने धूम ठोकली! ती पार सोसायटीचे कुंपण ओलांडून बाजूच्या गच्च झोपडपट्टीत! आता झाले… सारे संपले… हा काय हाती लागत नाही असे दिसताच मलाही सोडून द्यावे, असा विचार चालला होता. पण आवाजची टीम (प्राण्यांसाठी काम करणारी संस्था) हार मानायला तयार नव्हती! त्यांनी बाहेर जाऊन थोडी टेहळणी केली. बाबांना येऊन सांगितले की, बहुदा साहेब भिंतीलगतच्या गोदामात लपले असावेत, चला शोधूया का?

    आता गोदाम भिंतीलगत असले तरी तिथे पोहचायचयं तर, मुख्य रस्त्यावरून बाहेर पडून त्या गच्च चाळींच्या वेड्या-वाकड्या गल्लीतून जावे लागते. पण कधीही पाऊल न ठेवलेल्या त्या आडगल्ल्यांमध्ये डंपरसाठी जायला बाबा तयार झाले! कसे तरी तिथे पोहोचले तर, त्या गोदामाला कुलूप! तिथे आजूबाजूला चौकशी करून ते गोदामाला वळसा घालून दुसऱ्या बाजूला गेले. तिथला दरवाजा उघडा होता. आत धूळ आणि पडीक सामानाचे साम्राज्य…. इथे दनू कसा असेल म्हणून बाबा मागे फिरणार तितक्यात हळूच त्यांना इशारा करण्यात आला. बघतात तर दनू एका ढिगाऱ्यामागे गुपचूप लपून बसलेले! नजरेनेच ठरले की एकाने मागून जाऊन पकडायचे आणि तो समोर पळला तर, समोरून बाबांनी धरायचे. प्लॅन तर झकास होता, पण डंपर काय चीज आहे ते या बिचाऱ्याना काय माहीत!

    मागून कोणी येतेय याची चाहूल लागताच, तो चित्त्यासारखा झेपावला आणि बाबांच्या डोक्यावरून उडी मारून अजून तिसऱ्याच वस्तीत पळून गेला! झाले! हे सर्व हात हलवत परत आले. आता माझा धीर सुटत चाललेला, त्यामुळे मी ओरडायला सुरवात केली!

    घरी आल्यावर बाबांनी शेवटचा प्रयत्न म्हणून डंपरला हाक मारली… आणि काय चमत्कार दोन-तीन हाकेनंतर डंपरने हळूच दुरून प्रतिसाद दिला! पण आता तो भलताच बिथरला असल्याने ‘आवाज’ची माणसे दूर झाली आणि फक्त बाबांना त्याच्याशी संवाद साधू दिला. थोडा अंदाज घेऊन डंपर भिंतीवरून उडी मारून आवारात आला. आजूबाजूला कोणी नाही, याची खात्री करून बाबांच्या जवळ आला, हातातले दूध पिऊ लागला… पण पकडायचा प्रयत्न करताच पुन्हा धूम ठोकली.

    आता सर्वांना तो हाती लागणे अशक्य वाटत होते. त्यात आजी आणि बाबाही बंगलोरला निघाले होते त्यांच्या विमानाची वेळ झाली होती. आम्ही आई, दीदी, पप्पा याना ओळखत होतो, तरी मधे बरेच महिने गेले होते. आम्ही बंगलोरला पोहचल्यावर आम्हाला सवयीचे आणि ओळखीचे आजी आणि बाबा असतील तर, आम्हाला तिथे रुळणे सोपे जाईल म्हणून तेही आमच्यासाठी थोडे दिवस बंगलोरला निघाले होते. आता डंपरने साऱ्या प्लॅनवरच पाणी फिरवले होते; तरी तिकिटे आधीच काढून ठेवल्याने त्यांना निघणे भाग होते.

    या निराशेतही कुठे तरी वेडी आशा शाबूत होती आणि अशक्य वाटत असतानाही बाबांनी डंपरला साद घातली… ती मनापासून निघालेली आर्त हाक कदाचित कुठेतरी त्याला भिडली… आणि आयुष्य बदलवून टाकणारा निर्णय त्याने घेतला… तो पुन्हा बाबांच्या जवळ आला! या वेळी बाबांनी सर्व बळ एकवटून त्याचे मानगूट पकडले! तो प्रतिकार करत  पडद्यावर चढून गेला,  इतक्यात बाजूला झालेले आवाजचे सरावलेले हात सरसावले आणि साहेब पिंजऱ्यात कैद झाले!

    हुश्श…. हे ऐकूनच आई दमली तर चिकाटीने तासन् तास प्रयत्न करणाऱ्या बाबा आणि आवाजच्या सदस्यांना त्रिवार सलाम!!!

    आजी आणि बाबांना आधीच उशीर झाला होता, म्हणून लगेचच आम्हाला गाडीत घालून ते निघाले. प्रवास मोठा होता त्यामुळे त्या छोट्या पिंजऱ्यात आम्हाला ठेवणे शक्य नव्हते.  त्यांच्याकडील मोठ्या पिंजऱ्यात आम्हाला ठेवणे भाग होते. वाटेत अदलाबदल करू असे ठरवून गाडी निघाली आणि आमच्या जन्मभूमीला… मुंबईला…. त्या सोसायटीला… आणि दुरून आम्हाला बघणाऱ्या डिगरला आम्ही अखेरचा दंडवत केला… एक आयुष्य मुळापासून बदलून टाकणारे वळण घेऊन आमचा प्रवास सुरू झाला..!

    या नवीन आयुष्यात आम्ही कसे रुळू याची चिंता करीत आमची आई बंगलोरला आमची आतुरतेने वाट बघत होती…

    टीप : डिगर अजूनही मुंबईला त्याच सोसायटीत आहे. आता ऑपरेशननंतर त्याचे मार खाण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. बाबा आणि आजी जेव्हा मुंबईत असतात, तेव्हा त्याची चंगळ असते. पण नसतात तेव्हाही सोसायटीतील काही इतर घरे त्याची काळजी घेतात. थोडे catfood बाबा वॉचमनला त्याच्यासाठी देऊन ठेवतात. पण त्याचा एक नेम कधीही चुकत नाही, बाबा आणि आजी कितीही महिन्यांनी मुंबईला परतली तरी, स्वागतासाठी डिग्रू दरवाजात हजर! दिदीसाठी सुरू केलेली डिग्रू pick up and drop services आजही आजी आणि बाबांसाठी घराचा दरवाजा ते मुख्य गेट अशी साथ देत आहे!

    क्रमश:

    (पिदू या मांजराची आत्मकथा)

    diptichaudhari12@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    बेटर हाफ

    June 22, 2026 ललित

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026 ललित

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    बेटर हाफ

    By अतुला प्रणव मेहेंदळेJune 22, 2026

    “अगं ऐकलंस का… झाली की नाही तुझी बासुंदी बनवून? आवर पटापट. आत्ता येईल सरू…” गजाननरावांनी…

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 336
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 22
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.