Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: किरण कृष्णा बोरकर
किरण कृष्णा बोरकर - मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका. विविध विषयांवरील पुस्तकांचे समीक्षण समाजमाध्यमांवर प्रकाशित. विश्वविक्रमी काव्यवाचन सोहळ्याचे आयोजन. आदिवासी मुलांसाठी वाचनालय स्थापना. समाजाने आपल्याला खूप काही दिलंय आता समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या हेतूने कॉलेजमधील मित्रांसोबत "स्टार्ट गिव्हिंग फाऊंडेशन"ची स्थापना. मुंबईतील रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी मित्रांसोबत "ज्ञानसेवा फाऊंडेशन" सुरुवात केली. पूरग्रस्त, दरड कोसळणे आणि इतर नैसर्गिक आपत्तीवेळी मदतीचा हात. ‘गोष्टी तुमच्या आमच्या’ पुस्तकास 'साहित्यसंपदा पुस्तक रत्न' पुरस्कार. कोकण साहित्य मराठी परिषद, कल्याण यांच्यातर्फे 'उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार'. स्टार्ट गिव्हिंग फाऊंडेशनच्या कार्याबद्दल ‘अष्टगंध पुरस्कार’. साहित्यिक सहभागाबद्दल कोकणदीप मासिक यांचा ‘कोकणदीप प्रेरणा पुरस्कार’. मोबाईल नं : 9969277054 / ईमेल: k.borkar1@gmail.com
“यावर्षी अमोलचे लग्न ठरले नाही तर, पुढच्या वर्षीपासून तुला घरी आणणे बंद!” हातातली घंटा जोरजोरात बडवत रघुवीर कदम कडाडले. त्यांचा आवाज ऐकून धूप आणि अगरबत्तीचा मंद सुवास अनुभवत असलेला तो खडबडून जागा झाला, तर आता लवकरच भक्तांच्या घरी जाण्यासाठी तोंडाला फेशियल पॅक आणि डोळ्यांवर काकडीचे काप ठेवून आराम करीत असलेला उंदीरही बेडवरून पडला. “हा कदम पूजा करतोय की धमकी देतोय?” थोड्या चिंतीत आवाजात त्याने आपल्या उंदराला विचारले. “घ्या, करा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण. मग हे असेच चढून बसतात आणि काहीही नवस मागतात. पण तुम्हाला तर सवय झालीय ‘तथास्तु’ म्हणायची…’ तो शेपटी आपटत काकडीचे काप तोंडात टाकीत खोचकपणे म्हणाला. “अरे माझे…

