Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आठवणींचे कपाट!
    ललित

    आठवणींचे कपाट!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 13, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, आठवणींचे कपाट, राणी ताईचे कपाट, स्वरा आणि आरोह, स्वरा आरोहाचे भांडण, राणी ताईचे कपाट, राणी ताईची पत्र, राणी ताईकडून आईला गिफ्ट, राणीचे आई बाबांना गिफ्ट, समजूतदार राणी ताई, राणी स्वरा आणि आरोह,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रणाली मंगेश महाशब्दे

    आज बऱ्याच दिवसांनी घरात गडबड नव्हती. आम्ही दोघे आणि आता आमची दोन मुलं म्हणजे मुलगा आरोह आणि मुलगी स्वरा असे चौघेच घरी होतो. तसे तर, आम्हाला तीन मुलं. मोठी मुलगी राणी जिचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.

    तीन महिन्यांपूर्वी लग्न ठरले. लग्न लवकर करायचे असे ठरले होते, कारण मुलाला सुटी नव्हती. तो एक महिन्याची सुट्टी घेऊन येणार होता. लग्न झाल्यावर मुलगी दुसऱ्या घरी यापेक्षा ती दुसऱ्या देशात जाणार, याचे जास्त दु:ख वाटत होते. त्यामुळे खूपच तयारी करायची होती. व्हिसासाठी फिरणे, लग्नाच्या खरेदीसाठी फिरण्यापेक्षा महत्त्वाचे होते.

    असो, सगळी गडबड संपून आज बऱ्याच दिवसांनी मी निवांत बसले होते. तेवढ्यात आतून भांडणाचा आवाज आला. आमचे चिरंजीव आणि कन्यारत्न यांच्यामध्ये सुखसंवाद सुरू होते. कपड्यांवरून भांडण चालू आहे, एवढेच लक्षात आले. पण मुद्दामच गप्प बसले. ‘ते आणि त्यांचा गोंधळ’ असे म्हणून दुर्लक्ष करायचे ठरवले. पण थोड्या वेळात आवाज जरा वाढतच गेला. शेवटी वैतागून काय झाले, ते विचारले.

    स्वरा, ”आई बघ ना, माझे सगळे कपडे फेकून दिले याने आणि आता कपाटात जागा पण देत नाही.“

    आरोह, ”आई, काय करायची आहेत, हिला 2-2 कपाटं?”

    स्वरा, ”अगं, त्यामध्ये तर ताईचे कपडे आहेत ना?”

    आरोह, ”ताईचे कपडे काढून ही तिचे सामान ठेवू शकते ना? उलट तिला पण पूर्ण कपाट मिळेल.”

    स्वरा, ”ताईचे सामान कुठे ठेवू मग?”

    असे म्हणत पुन्हा दोघांचे हळूहळू आवाज चढायला लागले. शेवटी आरोहने ताईचे कपाट उघडले आणि स्वराला सांगितले की, “हे सामान बाहेर काढ, नंतर आई ठेवेल… असेही आता कुठे ताईला हे लागणार आहे!”

    हेही वाचा – आजींनी नव्या तरुणाईचे टोचले कान

    मी मात्र कपाटातील सामान बघण्यात हरवून गेले. स्वरा हळूहळू राणीचे सामान एकेक करून बाहेर काढायला लागली. सामानात वर ठेवलेली साडी बाहेर आली. राणीला ती साडी खूप आवडली होती. ती साडी होती तिच्या लाडक्या आत्याची. आत्याची लाडकी राणी… म्हणजे अगदी खाण तशी माती आणि आत्या तशी भाची! दोघींचे खूप छान जमायचे. त्या दोघींना एकत्र बघितले की, आमचे हे पण खूश असायचे. राणीने काही मागितले आणि आत्याने दिले नाही, असे कधीच व्हायचे नाही.

    “आई, आत्ता सामान खूप झाले आहे गं, पण पुढच्या वेळेस ही आत्याने दिलेली साडी मी घेऊन जाणार आहे. तोपर्यंत इथे कपाटात ठेवते…” असे म्हणून तिने ती लाडक्या आत्याने दिलेली साडी कपाटात ठेवली होती. त्या साड्यांखाली काही ड्रेस ठेवले होते. तसे तर हे ड्रेस आत्ता तिला नवीन घेतले होते. त्या ड्रेसमधून एक पाकीट खाली पडले. स्वराने पाकीट उचलले उघडून बघितले तर, त्यामध्ये स्वरासाठीच चिठ्ठी होती –

    “स्वरा, तू लहान असल्यामुळे नेहमीच माझे सामान वापरायला तुला आवडायचे. माझे नवीन ड्रेस तुझ्यासाठीच ठेवले आहेत. खरंतर, हे तुझ्यासाठी घेतले होते मी. आता मी घरी नाही तेव्हा तूच मोठी आहेस. आई-बाबांना त्रास देऊ नको. त्यांना मदत करत जा. आरोह लहान आहे, तेव्हा त्याला पण सांभाळून घे. तू समजूतदार आहेसच, आता थोडी जबाबदारीने वाग… आणि हो, ही चिठ्ठी वाचून झाल्यावर छान स्माइल कर… कारण तू sad झाल्यावर चांगली दिसत नाहीस. तुझीच राणी ताई”.

    चिठ्ठी वाचून इतक्यावेळ भांडणारी स्वरा तर रडायलाच लागली. आरोहला समजतच नव्हते की, या दोघींना कसे समजवायचे. त्याने स्वराला बाजूला सारले आणि पुढचे सामान काढायला लागला. कपाटात बाजूला खूप सारी पुस्तके होती. तसे तर, राणी तिच्या पुस्तकांना कधीच या दोघांना हात लावू देत नव्हती, कारण दोघेही अजिबात वस्तूंची नीट काळजी घेत नव्हते. त्या पुस्तकांबरोबर एक चिठ्ठी आरोहसाठी पण होती…

    “आरोह, तू हुशार आहेसच. असाच खूप अभ्यास कर… मोठा हो. आम्हा सगळ्यांनाच तू खूप शिकावे, असे वाटते. आत्तापर्यंत कधी काही जबाबदारी तुझ्यापर्यंत येऊ दिलेली नाही, पण आता स्वत:हून सगळ्यांना मदत कर. तू लहान आहेस जबाबदारी बरोबर हे लहानपण सुद्धा जप. ही सगळी पुस्तकं आता तुझीच आहेत. त्यांची काळजी घे.”

    आरोहला पण काय बोलावे समजेना. थोड्यावेळापूर्वी जो भांडणाचा आवाज होता, तो जाऊन मुसमुसून रडण्याचा आवाज यायला लागला होता.

    अजून खाली दोन गिफ्ट दिसत होते एकावर आई तर एकावर बाबा असे लिहिले होते. हे सगळे सुरू होते… तेवढ्यात बाहेर गेलेले बाबा पण घरी आले. या तिघांचे काय चालू आहे बघायला ते खोलीत आले तर, सगळेजण शांत बसले होते. कपाटातून बाहेर निघालेला पसारा बघून बाबा आरोह आणि स्वराकडे बघू लागले तेवढ्यात स्वराने त्या दोन गिफ्टवर ठेवलेली चिठ्ठी बाबांच्या हातात दिली –

    “आई-बाबा हे गिफ्ट तुमच्यासाठी आहे. आई तू नेहमी म्हणायची की, सगळा पगार खर्च नको करत जाऊस. थोडे पैसे बाजूला ठेवत जा वेळेला उपयोगी येतात. आम्हा तिघांचे करताना तुम्ही दोघांनी स्वत:चा कधी विचारच केला नाही. स्वत:च्या आवडी-निवडी नेहमीच बाजूला ठेवल्या. परिस्थिती कशीही असो नेहमी समाधानी कसे रहायचे, हे तुम्हा दोघांनी शिकवले. तुमच्या संस्कारांची शिदोरी घेऊन मी या घरातून जात आहे. तुमची मान नेहमी उंच राहील, हाच मी प्रयत्न करत रहीन. तुम्हा दोघांसाठी पाकिटांमध्ये दोन गोष्टी ठेवल्या आहेत. या वस्तू ठेवताना तुमच्या जावयाने मला खूप मदत केली. बाबा तुम्हाला माहीत आहे का, तो अगदी तुमच्यासारखाच आहे. घरच्या माणसांसाठी खूप हळवा आहे. आता जरा गिफ्ट उघडून बघा.”

    हेही वाचा – मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौन्दर्य संस्कार

    असे म्हणताच, एक गिफ्ट स्वराने तर दुसरे आरोहने उघडले. एका पाकिटामध्ये दोघांसाठी मेडिकल चेकअपचा फॅार्म होता तर, दुसऱ्या पाकिटात लेकीकडे जाण्यासाठीचे तिकीट होते. लेक खरंच मोठी झाली, असे म्हणत बाबा पण हळवे झाले.

    आता खरंतर चौघांनाही काय बोलावे, ते समजेना… पण तेवढ्यात आरोह पुढे आला कपाटातील सर्व वस्तू जागेवर ठेवल्या आणि कपाटावर ‘Love You ताई’ असे लिहिले. तसेच, स्वत:च्या कपाटात सुद्धा स्वराचे सामान ठेवायला जागा केली… आणि हे कपाट कायम ताईचेच असेल हे पण सांगितले. यावर मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले.


    मोबाइल – 9730020494


    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026 ललित

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026 ललित

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    By प्रदीप केळुस्करAugust 1, 2026

    भाग – 2 आज शूटिंग नसल्याने वंदना सकाळी निवांत आठ वाजता उठली. गेले पाच दिवस…

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026

    हर्निया (आंत्रवृद्धी) विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 380
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 516
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 821
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.