Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!
    अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 11, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, वॉटरलू टीथ, वॉटरलूचे दात, वॉटरलूची लढाई, वॉटरलूचे युद्ध, दंचचिकित्सा, नवे दात बसवणे, वॉटरलूच्या दाताला मागणी, वॉटरलू दाताला मागणी, वॉटरलू दाताचे संसर्ग,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर दाताची विकेट जवळपास पडलीच होती, पण बेल्स मात्र काठावर अडकली होती… “आज सुट्टी आहे…” वगैरे चर्चा करून ‘डिस्ट्रॅक्शन मेथड’ वापरत… “किती स्ट्रॅांग मुलगा आहे…” कौतुकसोहळा रंगवून… ‘व्हर्बल ॲनेस्थेशिया’ देत हळूच दात उपटून काढला आणि त्याच्या हातात दिला. किंचित दुखलं, पण पडलेला दात बघून तो चकित झाला आणि म्हटला, ”काय करू?”

    आम्ही बालपणी पडलेला दात छतावर फेकायचो किंवा रात्री ‘दंतपरी’ येऊन भेटवस्तू देईल या अपेक्षेनं झोपताना उशीखाली ठेवायचो… मुलगा आपला ‘दात’ हातात घेऊन परतला आणि इकडं मला ‘वॉटरलू टीथ’ आठवलं!

    साल असावं 1815… युरोप हादरवणाऱ्या नेपोलियन युद्धाचा शेवट जवळ आला होता… बेल्जियमस्थित ‘वॉटरलू’ या गावाच्या परिसरात ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्यांमध्ये प्रचंड रक्तपात झाला… एका दिवसात जवळपास तब्बल 50 हजारांहून अधिक सैनिक कामी आले. युद्ध संपल्यावर रणांगणावर विखुरलेली शरीरं सडू लागली… पण काहींना यात दिसला ‘आपदा में अवसर’ अर्थातच दातांची सोन्याची खाण!

    त्या काळात दंतप्रत्यारोपणाची नुकतीच सुरूवात झाली होती आणि दात बसवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आताशा उदयाला येत होती. पण तत्कालीन कृत्रिम दातांचा दर्जा वाईट तर होताच पण महागडाही होता. हत्तीच्या सुळ्यांपासून, हाडांपासून किंवा धातूंपासून बनवलेले दात खूपच कठीण आणि बेढब वाटत. काही ‘व्यापारी’ मंडळींनी युद्धभूमीवरून ताज्या मृत सैनिकांचे दात काढून घ्यायला सुरुवात केली. हे दात ‘Waterloo Teeth’ म्हणून ओळखले जाऊ लागले, कारण ते वॉटरलूच्या रणांगणावरून मिळाले होते!

    हेही वाचा – दिग्या नव्हे, ‘दिगास’… फ्रेंच अवलिया!

    युद्धात मरणारे सैनिक प्रामुख्याने तरूण आणि सशक्त होते. त्यांचे दात मजबूत, पांढरे अन् सुंदर असायचे… त्या काळी इंग्लंड आणि फ्रान्समधील श्रीमंत समाजात दात बसवण्याचं फॅड कम फॅशन प्रचंड वाढलं होतं. त्यामुळं लंडन-पॅरिसच्या दंतवैद्यांकडं श्रीमंत स्त्रिया हसत पोहोचायच्या “Doc, I want Waterloo teeth!”

    थोडक्यात एखाद्या तरूण सैनिकाच्या मृत्यूतून जन्म घ्यायचं एखाद्या श्रीमंत स्त्रीचं मनमोहक हास्य…

    लवकरच या व्यापाराचा वारेमाप विस्तार झाला; हे फक्त फक्त वॉटरलूपुरतं मर्यादित राहिलं नाही… तर, क्रिमियन युद्ध, अमेरिकन सिव्हिल वॉर आणि नेपोलियन युद्धांनंतर जगभरच्या रणांगणांवरून ‘दात’ गोळा होऊ लागले.

    काही व्यापाऱ्यांनी तर गरीब लोकांना पैशाच्या मोबदल्यात दात काढायला भाग पाडलं. दातांचे ‘बंडल’ तयार होऊन इंग्लंडला पाठवले जात आणि तेथील दंतचिकित्सक polish करून ते श्रीमंत ग्राहकांना बसवत.

    त्या काळी स्वच्छता आणि संक्रमण नियंत्रण ही संकल्पना फारशी नव्हती; परिणामी काही लोकांना त्या ‘Waterloo Teeth’ मुळं संसर्ग झाला, फोड आले आणि सेप्सिस झालं पण समाजात याबाबत फारशी माहिती नव्हती… लोक म्हणायचे, ”हे खरे दात आहेत म्हणूनच ते जास्त सुंदर दिसतात.”

    19व्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्सिलन दात तयार होऊ लागले आणि Waterloo Teeth ची सद्दी हळूहळू संपली पण त्या आधी जवळजवळ 50 वर्षे यूरोपभर श्रीमंत लोक मृत सैनिकांच्या दातांनी सजलेले हास्य दाखवत मिरवत होते… एक ब्रिटिश व्यंगचित्राची तळटिप होती, ”तिचं हास्य सुंदर आहे, पण ते तिचं नाही ते वॉटरलूचं आहे.”

    हेही वाचा – डॉक्टरनं सांगितल्यावर सर्वांनीच वाढविली दाढी अन्….

    ‘Waterloo Teeth’ ही केवळ वैद्यकीय इतिहासातील घटना नाही तर, ती मानवी लोभ, सामाजिक भेद आणि विज्ञानाच्या अपरिपक्व टप्प्याचं प्रतिबिंब आहे. युद्धभूमीवर पडलेले मृत शरीर त्या काळातील समाजाच्या ‘सौंदर्यदृष्टी’चा भाग झाली, हे ऐकलं तरी थरकाप उडतो. आज दंतोपचार करताना स्टील, सिरॅमिक किंवा कंपोझिट राळ वापरली जाते… अगदी स्वच्छता, स्टरिलायझेशन याची काळजी घेऊन!

    क्षणभभर “आपल्या हास्यासाठी कोणाचं जीवन गमावलं गेलंय” असं इमॅजिन केलं तरी कळतं ‘Waterloo Teeth’ हा फक्त इतिहास नाही तर तो मानवतेला एक तडा आहे!


    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    …तर पोटगी मिळत नाही!

    July 29, 2026 अवांतर

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026 अवांतर

    संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!

    July 17, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    …तर पोटगी मिळत नाही!

    By Team AvaantarJuly 29, 2026

    ॲड. अमोल दोरवट हिंदू विवाह अधिनियम, 1955चे कलम 24 (खटला चालू असताना पोटगी) आणि कलम…

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026

    संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!

    July 17, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026

    हर्निया (आंत्रवृद्धी) विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता

    August 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑगस्ट 2026

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 380
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 514
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 821
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.