Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » डॉक्टरनं सांगितल्यावर सर्वांनीच वाढविली दाढी अन्….
    अवांतर

    डॉक्टरनं सांगितल्यावर सर्वांनीच वाढविली दाढी अन्….

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 25, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, डॉक्टरी सल्ला, डॉक्टरचा सल्ला, डॉक्टर म्हणतात दाढी वाढवा, दाढी वाढविण्याचा सल्ला, शहर झाले दाढीवाले, दाढीला बायकांचा आक्षेप, दाढीबद्दल बायकांची चर्चा, दाढीची ऊब, दाढी वैयक्तित बाब, दाढीला वैद्यकीय आधार नाही
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    आपल्या देशात पालकांकडून पाल्यास धाक दाखवण्यासाठी जसा डॅाक्टरांचा वापर केला जातो तद्वतच आपल्या पार्टनरला एखादा मेसेज कन्वे करण्यासाठीही डॅाक्टरांचा वापर केला जातो… “यांना सांगा सिगारेट सोडा…” किंवा “तिला पालेभाज्यांव्यतिरिक्तही जीवनसत्वयुक्त पदार्थ असतात ते बनवा, असं सांगा…” अशी विनंती लोक अधूनमधून करत असतात.

    असाच एक दिवस ओपीडीत याच श्रेणीतलं एक जोडपं आलं होतं; आजार कमी आणि एकमेकांबद्दल आक्षेपच अधिक! बरं यातल्या बऱ्याच गोष्टी तर अवैद्यकीय होत्या… पण चालतंय, भारतीय माणूस बहुदा अघळपघळच असतो… तिला त्यानं वाढवलेली ‘मटनचॅाप्स बियर्ड’ अर्थात ‘दाढी’ आवडत नव्हती तर, तो ‘फॅशनंय’ म्हणून अडून बसला होता… आता मी त्याला दाढी काढायला सांगावं, असं तिचं म्हणणं होतं! कुछ भी… मतलब कुछ भी…!?

    सरतेशेवटी एका आठवड्यासाठी त्याला परवानगी मिळाली आणि पुढच्या रविवारी तो दाढी काढून टाकेल, असा ठराव पास झाल्यानंतर जोडपं किरकोळ तक्रारींसाठी घेतलेली लक्षणजन्य औषधं घेऊन घरी परतलं…

    मला इकडं पॅरिसची आठवण झाली… साल असावं इ.स. 1800.

    फ्रेंच क्रांती नुकतीच झाली होती. राजधानी पॅरिस शहर पुन्हा श्वास घेत होतं. रस्त्यांवर घोडागाड्या, कॅफेमध्ये तत्त्वचर्चा सुरू झाल्या होत्या, पण डॉक्टरांच्या दवाखान्यांत मात्र अजूनही जुन्या वैद्यकीय कल्पनांचं साम्राज्य होतं… याच काळात पॅरिसमध्ये एक अत्यंत ‘अतिआत्मविश्वासू’ डॅाक्टर प्रसिद्ध झाले; या महाशयाचं ठाम मत होतं की, ”थंडी, सर्दी, खोकला आणि फुफ्फुसांचे विकार यांचं मूळ कारण म्हणजे निसर्गानं दिलेल्या उबदार दाढीचा अपमान!”

    हेही वाचा – विषाची परीक्षा…

    त्याच्या मते दाढी ही केवळ फॅशन नसून वैद्यकीय कवच होती… हा डॉक्टर आपल्या व्याख्यानात नेहमी म्हणायचा, ”दाढी गळ्याला ऊब देते, श्वास गरम करते आणि थंड हवा थेट फुफ्फुसात जाण्यापासून अडवते. जो पुरुष दाढी काढतो, तो स्वतःच आजाराला आमंत्रण देतो!”

    हे ऐकून पॅरिसमधील पुरुषांची मान अभिमानानं उंचावली. “अरे, डॉक्टर म्हणतोय तर, काहीतरी विज्ञान असणारच!” आणि मग ‘दाढी’ वाढवण्याची साथच पसरली. महिन्याभरातच शहराचं रूप अक्षरश: बदललं. कालपर्यंत नीट्स चेहऱ्याचे सरकारी कर्मचारी आज झुडपांसारख्या दाढीचे मालक होते, मिशा – कलात्मक वळणात तर, कुणाची दाढी तर गळ्याखालपर्यंत…!

    केशकर्तनालये अक्षरश: ओस पडली. कंगव्यांची विक्री मात्र दुप्पट झाली. रस्त्यावर एकमेकांना ओळखणं कठीण झालं.

    “हा शेजारचा हरकाम्या की एखादा तत्त्वज्ञ?”

    काही दिवसांतच हिवाळा सुरू झाला… सर्दीताई आली, पाठोपाठ खोकलादादाही हजर झाला! काही दिवसांतच लहानग्या खवखवनंही एंट्री मारली… बरं या सगळ्यांनी अगदी दाढीवाल्यांनाही सोडलं नाही; यातल्या काहींनी डॉक्टरला विचारलं, ”ओऽऽ साहेब दाढी असूनही मला सर्दी झालीच कशी?”

    डॉक्टर शांतपणे म्हणाला, ”दाढी अजून पुरेशी दाट नाहीये रेऽऽ”

    …आणि पुरुष पुन्हा आरश्यासमोर उभं राहून दाढी कुरवाळू लागले…

    हेही वाचा – दिग्या नव्हे, ‘दिगास’… फ्रेंच अवलिया!

    पण खरी क्रांती डॉक्टरांनी नाही तर बायकांनीच घडवली.

    एका महिन्यानंतर पॅरिसमध्ये एक नवीन समस्या निर्माण झाली. घराघरात ओळखीचा प्रश्न “नवराच घरी आलाय की कुणी संन्यासी?” डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर जंगल, दाढीत चहा अडकतोय… शेवटी संतप्त दाढीपीडित पत्नी हक्क समिती एकत्र आली आणि त्यांनी थेट नगर परिषदेत एक ऐतिहासिक याचिका दाखल केली. त्यात लिहिलं होतं,

    ”ही तथाकथित ‘वैद्यकीय’ दाढी आमच्या नवऱ्यांना आजारी होण्यापासून वाचवत तर नाहीच, पण आम्हाला मात्र भयंकर त्रास देतेय.”

    याचिकेतील तळटिप तर खासच होती – ”जर दाढीच औषध असेल, तर आधी सगळ्या डॉक्टरांनी दाढ्या वाढवाव्यात!”

    सभा हसून हसून कोसळलीच… नगर परिषदेनं अधिकृत निवेदन जारी केलं, ”दाढी ही वैयक्तिक आवड असू शकते, पण ती वैद्यकीय उपचार नाही.”

    आठवड्याभरातच पॅरिसच्या केशकर्तनालयांमध्ये रांगा लागल्या. कंगवे बाजूला झाले, वस्तरे हातात आले… सरतेशेवटी त्या’ डॅाक्टर महाशयानंही कबूल केलं,

    “कदाचित, मी दाढीच्या उबेवर जरा जास्तच विश्वास ठेवला.” पण त्याचं नाव इतिहासात कायम झालं, ज्यानं संपूर्ण शहराला एका महिन्यासाठी ‘दाढीवाला’ बनवलं…!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026 अवांतर

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026 अवांतर

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    By हर्षा गुप्तेApril 13, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. गेल्या लेखात मी डॉगी ब्रँडीबद्दल जुजबी…

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 267
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 385
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 554
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.