Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वारसा

    August 10, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026

    माणुसकीची फुले

    August 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 25 फेब्रुवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 25 फेब्रुवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 25, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 25 फेब्रुवारी 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 06 फाल्गुन शके 1947; तिथि : नवमी 26:41; नक्षत्र : रोहिणी 13:38
    • योग : विष्कंभ 25:28; करण : बालव 15:46
    • सूर्य : कुंभ; चंद्र : वृषभ 24:54; सूर्योदय : 07:02; सूर्यास्त : 18:41
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – अधिक मेहनत करावी लागेल आणि तुमची दैनंदिन दिनचर्या थोडी गोंधळाची असू शकते. अनावश्यक रागामुळे नुकसान होऊ शकते, म्हणून शांत राहा. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यास एखाद्या मित्राची मदत मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कोणत्याही मुद्द्यावर घाईघाईने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे.

    वृषभ – आत्मविश्वास आणि चिंता आज हातात हात घालून  एकत्र राहतील. कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक ताण वाढू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक विचार टाळा. जुन्या मित्रांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या मुलाखतीत यश मिळेल. आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

    मिथुन – रागावर नियंत्रण ठेवून संघर्ष टाळणे आज महत्वाचे आहे. वाद घालून एखादे नाते खराब करू नका. उत्पन्न वाढवण्याच्या काही संधी येतील, सोबतच खर्च देखील वाढू शकतात. वाहन खर्च वाढेल. छोट्या छोट्या गोष्टी त्रासदायक ठरू शकतात, त्यावर लगेचच उपाय शोधणे योग्य ठरेल. शिक्षणात अडथळा येऊ शकतो.

    कर्क – कामाच्या ठिकाणात किंवा  वातावरणात बदल शक्य आहेत. व्यावसायिकांना अधिक मेहनत करावी लागेल. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. संयम राखणे आवश्यक आहे. आणखी थोडी मेहनत केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. धार्मिक कार्याकडे जास्त कल असेल.

    सिंह – आज मन आनंदी असेल. त्याचबरोबर तोंडावर ताबा ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या शब्दामुळे कोणी तरी दुखावले जाण्याची शक्यता आहे. खोट्या अहंकाराला बळी पडून गोष्टी बिघडू देऊ नका. कामात आव्हाने येतील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.

    कन्या – आज आत्मविश्वास वाढेल. तथापि, उत्साहाच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. नोकरदार जातकांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. पदोन्नती होऊ शकते. उत्पन्नात वाढ होईल. पूर्ण विचार करूनच गुंतवणूक करा. आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

    तुळ – वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कारकिर्दीतील बदल फायदेशीर ठरतील. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र, रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा. शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा.

    हेही वाचा – Bookshelf : ‘आहे मनोहर तरी’ सुनीताबाई नावाच्या स्वतंत्र व्यक्तीची ओळख

    वृश्चिक – आज शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. उत्पन्न आणि नफा दोन्हीमध्ये वाढ होईल. मित्रांकडून तुम्हाला पाठबळ मिळेल. व्यवसायात गुंतागूंत निर्माण होऊ शकते, मात्र त्यावर तुम्ही तोडगा काढू शकाल. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करणे शक्य आहे. नातेसंबंध अधिक सुसंवादी होतील.  आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

    धनु – आज मन शांत असेल. कामे मनासारखी होतील, पण दुसरीकडे खर्चांमध्ये वाढ होईल. वाहनांशी संबंधित खर्च वाढू शकतात. जोडीदाराशी लहान सहान गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या हट्टीपणामुळे नातेसंबंध बिघडू देऊ नका. सर्व गोष्टी सामंजस्याने घ्या. पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

    मकर – कार्यालयीन वातावरण तसेच वाढत्या आर्थिक खर्चामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल. मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. कुटुंबासह एक लहानशी सहल होऊ शकते. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

    कुंभ – व्यवसायात आव्हाने उद्भवू शकतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. खर्च वाढतील. कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. कामाचा ताण वाढेल, मात्र सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा. लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे.

    मीन – मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. भावनिकदृष्ट्या अथवा घाईघाईने कोणतेही  निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवन आनंदी राहील. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. अभ्यासात विद्यार्थ्यांची आवड वाढेल आणि अपेक्षित यश मिळेल.


    दिनविशेष

    सर्वश्रेष्ठ फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन

    टीम अवांतर

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आणि यशस्वी कप्तान सर डॉनल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांचा जन्म 27 ऑगस्ट 1908 रोजी न्यू साउथ वेल्समधील कूटमंड्र या गावी झाला. त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी वडिलांनी प्रोत्साहन दिले. ते स्वयंसिद्ध क्रिकेटपटू होते. त्यांनी कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय स्वतःच सराव करून क्रिकेटचे तंत्र आत्मसात केले. अकराव्या वर्षी ते पहिला सामना खेळले. बाराव्या वर्षी त्यांनी शालेय सामन्यांमध्ये शतक केले. सतराव्या वर्षांपासून ते ‘बाउरल डिस्ट्रिक्ट’ संघातर्फे जिल्हा पातळीवर बेरीमा स्पर्धेतही खेळू लागले.

    ऑस्ट्रेलियातर्फे खेळताना ब्रॅडमन यांनी कसोटीत 99.94च्या सरासरीने धावा केल्या तर, शेफील्ड शील्ड स्पर्धेत त्यांची सरासरी 110 इतकी आहे. डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंड संघाविरुद्ध आपली पहिली कसोटी मालिका खेळली. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात डॉन यांनी केवळ 18 धावा केल्या. तर, दुसऱ्याच कसोटी सामन्यात शतक (112) झळकवले. कसोटी क्रिकेट कारकीर्दीतील त्याच्या धावा अशा : एकूण कसोटी सामने 52, एकूण डाव 80, नाबाद 10, एका खेळीतील सर्वोच्च धावा 334, एकूण धावा 6,996 सरासरी 99.94 धावा, शतके 29, अर्धशतके 13. क्षेत्ररक्षणात झेल 52. ते इंग्लंडविरुद्ध 37, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5, वेस्ट इंडिजविरुद्ध 5 आणि भारताविरुद्ध 5 सामने खेळले.

    हेही वाचा – फाटका अन् मोठ्या हॉटेलमधली मेजवानी…

    एकूण 52 कसोटी सामन्यांपैकी 24 सामन्यांत त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले. त्यात त्यांनी 15 विजय मिळविले आणि फक्त 3 वेळा पराभव पत्करावा लागला. उर्वरित सहा सामने अनिर्णित राहिले. कप्तान म्हणून त्यांनी एकदाही मालिका गमावली नाही, हे त्याच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होय. क्रिकेटचा जनक असलेला इंग्लंडने त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे घाबरून बॉडीलाइनसारखी वादग्रस्त युक्ती लढवली, असे सांगितले जाते. मात्र या भयानक माऱ्याला तोंड देत ब्रॅडमन यांनी नाबाद 103, 66, 76, 48 आणि 71 अशा धावा केल्या.

    ब्रॅडमन म्हणजे धावा जमवणारे यंत्र, असे समीकरणच त्यांच्या धावा काढण्याच्या वेगामुळे तसेच सातत्यामुळे तयार झाले होते. ब्रॅडमन यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. या महान खेळाडूने क्रिकेटमध्ये अशी उंची गाठली जी अन्य कोणालाही गाठता आली नाही. ब्रॅडमन यांच्यानंतर अनेक खेळाडू झाले ज्यांनी धावांच्या बाबत, शतकांच्या बाबत किंवा अन्य गोष्टींमध्ये त्यांचे विक्रम मोडले. पण ब्रॅडमन यांनी मिळवलेला मान आणि सन्मान कोणालाच मिळाला नाही. ब्रॅडमन यांना 1949 साली ‘सर’ हा किताब ब्रिटिश शासनाने दिला. बाउरल येथील मैदानाला ब्रॅडमन यांचे नाव देण्यात आले (ब्रॅडमन ओव्हल). फेअरवेल टू क्रिकेट हे त्यांचे आत्मचरित्र वाचकप्रिय ठरले. 25 फेब्रुवारी 2001 रोजी त्यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 09 ते 15 ऑगस्ट 2026

    August 9, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरAugust 10, 2026

    जीवनप्रवास उलगडणारे 100 ज्योतिषीय मार्गदर्शक सूत्रे अशी आहेत – 15) वृद्धावस्था (50 वर्षांनंतर) – रोग…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 09 ते 15 ऑगस्ट 2026

    August 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 09 ऑगस्ट 2026

    August 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वारसा

    August 10, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026

    माणुसकीची फुले

    August 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला

    August 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026

    Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण

    August 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 390
    • अवांतर 202
    • आरोग्य 137
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 528
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 840
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वारसा

    August 10, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026

    माणुसकीची फुले

    August 10, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.