Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शुभमंगल… संमिश्र भावनांचा सोहळा
    मैत्रीण

    शुभमंगल… संमिश्र भावनांचा सोहळा

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 6, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, वपु, पार्टनर, मंगलाष्टक, शुभविवाह, सनई,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link
    1. मानसी देशपांडे

    “कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान…” हे मंगलाष्टकाचे सूर म्हणजे वधूसाठी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू, अशा स्वरूपाचे असतात. कारण, अंतरपाट सरला की गळ्यात माळ पडल्यावर अचानक एक नवीन जबाबदारी अंगावर आल्यासारखी वाटते. प्रसिद्ध लेखक व. पु. काळेंनी किती छान म्हटलं आहे, “संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चुल पेटवायची थांबवायचं नसतं. दरी निर्माण झाली म्हणजे आपण खोल जायचं नसतं, तर ती दरी पार करायची असते…” हीच शिकवण प्रत्येक आई मुलीला देतेच. आज अचानक माझ्या मनात एक विचार आला, लग्नात मंगलाष्टकं सुरू असताना तिथे मुलीची आई उपस्थित नसते. का बरं? बहुदा, सनईच्या सुरांनी हृदय गलबलते. ती मंगलाष्टकं आता काहीच क्षणांवर मुलीची पाठवणी येऊन ठेपली आहे, असं जणू सुचवत असतील. शिवाय सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी प्रार्थना ती माऊली परमेश्वराजवळ करतच असते…

    मुलीचं लग्न म्हणजे आई-वडिलांसाठी एक सुखद सोहळाच असतो, नाही का! मुलगी सुद्धा आनंदात असतेच, पण जेव्हा ती बोहल्यावर चढते त्यावेळी मात्र हृदयातली धडधड तिलाच कळू जाणे. यावर गाण्याची ओळ अगदी साजेशी अशी आहे,

    “लग्नमंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी…”

    ‘सनई’ हे तसं म्हटलं तर, एक शुभप्रसंगी वाजवले जाणारे वाद्य. पण या वाद्यातील सुरांचा आणि मुलीच्या तसेच जास्त करून तिच्या वडिलांच्या मनातील भावना यांचा खूप जवळचा संबंध व. पुं.नी दाखवला आहे, “लग्न सोहळ्यात मुलीच्या बापाची भूमिका सनई बजावीत असते. मांगल्याच्या बरोबरीने ते सूर करुण का वाटतात? तर मुलीच्या बापाला मुलीच्या विरहाचं दुःख प्रकट करता येत नाही. त्याच्या डोळ्यातलं पाणी सनईच्या रुपानं वाहत असतं…” ही वेळ खरंच संमिश्र भावनांनी ओतप्रोत भरलेली असते. आई रडून मोकळी होते, पण वडील जास्त रडू शकत नाहीत. कारण, वडिलांच्या मनात तेव्हा,

    “घेऊ कसा निरोप तुटतात आर्त धागे,
    हा देह दूर जाता मन राहणार मागे
    धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे…”

    हेच सुरू असते. सनईचे सूर असो, आई-वडिलांच्या मनातील भावना असो, व. पुं.नी मांडलेल्या विचारच पुरेसे ठरतात. जे जे विचार व. पुं.नी व्यक्त केले आहेत ते सर्व प्रत्येक आई-वडील अनुभवत असतात. म्हणून तर हा सोहळा प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहतो… थोडक्यात व.पु. म्हणजे काय तर, या ओळी,

    “पार्टनर रुपी सखी, दोस्त तो रंग मनाचे अचूक हेरतो
    प्रेममयी स्वर शब्दांनी छेडून, अवघे जगणे महोत्सव करतो…”

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026 मैत्रीण

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    March 11, 2026 मैत्रीण

    मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!

    March 10, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    By दिलीप कजगांवकरMarch 24, 2026

    पहाटेचे साडेपाच वाजले होते. सूर्यनारायण अजून पूर्व क्षितिजावर अवतरला नव्हता; पण स्वयंपाकघरात आणि हॉलमध्ये मात्र…

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    March 11, 2026

    मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!

    March 10, 2026

    जागतिक महिला दिन विशेष… तिचे असणे, तिचे नसणे!

    March 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026

    नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!

    March 26, 2026

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 248
    • अवांतर 175
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 362
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 513
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn