Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चाफा बोलेना… अरविंदच्या मृत्यूची आईला चाहूल
    ललित

    चाफा बोलेना… अरविंदच्या मृत्यूची आईला चाहूल

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेJanuary 27, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, चाफा बोलेना, जोशी काकूंचा मृत्यू, जोशींची तीन मुले, सुबोधचे हस्तलिखित, अरविंदचा मृत्यू, अरविंदचा अपघाती मृत्यू, अरविंदच्या मृत्यूची चाहूल, अरविंदचा पुणे प्रवास, बर्वे कथा, सतीश बर्वे कथा, सतीश बर्वे,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 1

    जोशी काकूंचं जाणं जितकं अचानक होतं, तितकंच धक्कादायक देखील होते आमच्या सगळ्यांसाठी. हिंडत्याफिरत्या काकू एक दिवस अशा जातील असं खरंच वाटलं नव्हतं. आपल्या रोजच्या बघण्यातला माणूस अचानकपणे कायमचा निघून जातो, हे अजूनही मानायला मन तयार होत नाही. आम्हा सगळ्या मित्रांना बसलेला धक्का अजूनही कायमचा संपलेला नाही. आमचा मित्र म्हणजे काकूंचा मोठा मुलगा सुबोधकडे तर बघवत नाहीये अजूनही… त्याच्या समोर जाऊन उभं राहायला हिंमत होत नाहीये माझी.

    आजवर जोशी काकूंनी आयुष्यात नि:स्वार्थीपणे फक्त देण्याचं काम केले. मग ते त्यांच्या तीन मुलांना  वाढवताना दिलेले संस्कार आणि शिकवण असो नाहीतर, त्यांच्या लाडक्या शाळेतील विद्यार्थ्यांना केलेलं ज्ञानदान असो. त्यांच्या आयुष्याचा आणि बुद्धिमत्तेचा हात कधीच आखडता ठेवता आला नाही त्यांना…

    हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!

    सुबोधने एक दिवस त्याच्या हस्ताक्षरातील मजकूर आणि जोशी काकूंची डायरी मला आणून दिली आणि म्हणाला मला की, आईवर लिही काहीतरी. मी सगळा मजकूर शांतपणे वाचला. माझ्या लक्षात आलं की, त्या सगळ्या सुबोधच्या आठवणी आहेत. त्यावर मी ठरवलं की, आपण काहीतरी नव्याने कथानक लिहिण्यापेक्षा सुबोधचंच लिखाण आणि काकूंच्या डायरीतील मजकूर जसंच्या तसं कथेत समाविष्ट करावं म्हणजे त्यांच्या भावनांचा योग्य तो आदर राखला जाईल. सुबोधने लिहिले होते की,

    “बाबांच्या अकाली अपघाती निधनानंतर खरंतर घरची बाई हादरली असती, कोसळली असती. पण त्याही परिस्थितीत आई कमरेला पदर खोचून उभी राहिली. बाबांचे त्यांच्या भावाबहिणींसोबतचे नातेसंबंध सुरुवातीपासूनच ताणलेले होते. अशा परिस्थितीत देखील बाबांचं दिवस-कार्य आईनं स्वतःच्या हिमतीवर केले. बाबांच्या भावंडांत जरी संवाद नव्हता तरी, बाबा त्यांच्या ऑफिसमध्ये सगळ्यांच्या मदतीला सदैव पुढे असायचे. मग ती ऑफिसच्या कामकाजातील मदत असो किंवा सहकाऱ्यांच्या वैयक्तिक पातळीवरची मदत असो! त्या सर्वाची परतफेड म्हणून बाबांच्या ऑफिसतर्फे त्यांच्या वैयक्तिक कायदेशीर देण्याव्यतिरिक्त त्यांच्या सहकाऱ्यांनी पैसे जमवून आईच्या हातात मोठ्या रकमेचा चेक ठेवला होता… तेव्हा आईला आपल्या नवऱ्याचं त्याच्या ऑफिसमधलं स्थान कळलं आणि ती गहिवरून गेली होती.

    आईने त्यानंतर मोठ्या हिमतीने शाळेत नोकरी मिळवली आणि आम्हा तिघांनाही डोळ्यांत तेल घालून  वाढवलं. आईचा त्याग किती उच्च कोटीचा आहे, हे समजण्याचं आमचं वय तेव्हा नव्हते. पण जेव्हा आम्ही भावंडं समजण्याच्या वयात आलो, तेव्हा मात्र तिला तिचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने जगता येईल, याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष दिले. सुदैवाने माझी (सुबोध) आणि बंधू अरविंदची बायको तसेच केतकीचा नवरा श्रीरंग म्हणजे तिचा जावई सगळेच समजूतदार होते त्यामुळे आमच्या संसारात सुद्धा तिचं स्थान अबाधित राहिले. केतकीच्या बाळंतपणासाठी तिला अमेरिकेला नेण्यासाठी श्रीरंगने आधी तिच्याकडे हट्ट धरला आणि नंतर तिचा होकार मिळताच तिला न्यायला देखील आला होता तो मुंबईत… केतकीच्या बाळंतपणासाठी आई अमेरिकेला गेली. तिच्या नातवाने मान धरायला सुरुवात केली आणि मग सहा महिन्यांनी आईला परतीचे वेध लागले.

    आम्हा तिघांनाही आयुष्यात चांगल्याप्रकारे स्थिरस्थावर करून तिने तिची जबाबदारी पूर्ण केली. दिवस खरे आनंदात जात होते, पण म्हणतात ना सगळं सुरळीत सुरू असताना अचानकपणे काही तरी घडतं आणि होत्याच नव्हतं होऊन जाते…

    सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट. अरविंद पुण्याला चालला होता कामासाठी. पावसाळ्याचे दिवस होते. आईनं त्याला विचारले देखील होते की, काम पुढे ढकलता येण्यासारखं असेल तर पुढे ढकल. खरं, तसं शक्य होते. पण अरविंद हट्ट करून निघाला. आईच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती. अरविंद नेहमीप्रमाणे तिच्या पाया पडला, पण नेहमीचा आशीर्वाद न देता आई बोलून गेली की, तू संध्याकाळी परत येईपर्यंत मी उपास धरणार आहे. अरविंद तेव्हा म्हणाला देखील होता आईला की, पाऊस थोडाच सतत असाच जोरात पडणार आहे. तो थांबेल की, काही वेळाने. तू नको उपाशीपोटी राहूस, मग तुला पित्ताचा त्रास होईल विनाकारण. पण ती आईच होती ना. तिने काही ऐकलं नाही आणि हिरमुसला होऊन अरविंद निघाला.

    हेही वाचा – फुलपाखरू… 40 वर्षांपूर्वीच्या आठवणी

    पाऊस खरंच कोसळत होता पाठीमागे वाघ लागल्यासारखा. आईचंच काय, पण न थांबणारा पाऊस बघून मी सुद्धा थोडा काळजीत पडलो होतो. थोडा उशिराच अरविंदचा फोन आला पुण्याला पोहोचल्यावर आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. पुढे 3-4 तास काम करून अरविंद परत यायला निघाला. आईचा रूसवा दूर करण्यासाठी त्याने चितळ्यांच्या दुकानातून बाकरवडी आणि आंबा बर्फी घेतल्याचे कळवलं.

    दिवेलागणीची वेळ झाली तरी, अरविंद घरी पोहोचला नव्हता. घड्याळाचा काटा जसजसा पुढे सरकत होता, तसतसा आईचा चेहरा काळजीने ग्रासत चालला होता. नऊ वाजले, पण अरविंद घरी पोहोचला नव्हता. त्याचा फोन देखील लागत नव्हता त्यामुळे माझी काळजी देखील वाढली होती. आई तर डोकं धरून बसली होती. अखेर दहाच्या सुमारास फोन वाजला. मी भीतभीतच घेतला तो. समोरून जे सांगितले, त्याने माझे डोके सुन्न झाले. शेवटी काळाने घाला घातला होता. घाटात एका अवघड वळणावर अरविंदच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यातच त्याचा दुःखद अंत झाला होता. लोणावळा पोलिसांनी आम्हाला बोलावलं होतं, ओळख पटवून अरविंदच्या देहाचा ताबा घेण्यासाठी. मी फोन ठेवला. आई माझे खांदे गदागदा हलवून मला विचारत होती की, फोन कोणाचा आहे आणि समोरच्या माणसाने तुला काय सांगितले म्हणून. पण मी बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. माझी दातखिळी बसली होती.

    क्रमशः

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026 ललित

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026 ललित

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    By प्रणाली वैद्यMay 8, 2026

    भाग – 24 समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने…

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.