Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मुलाचं परदेशी शिक्षण अन् मातृत्वाची परीक्षा!
    ललित

    मुलाचं परदेशी शिक्षण अन् मातृत्वाची परीक्षा!

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेJanuary 26, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, परदेशी शिक्षण, आई मुलगा, खंबीर मनाची आई, पिता कन्या, सासरा सून, मुलाचे उच्च शिक्षण,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    विमानतळावर मित्रांच्या घोळक्यातून बाहेर पडत सोहम् माझ्याजवळ आला आणि त्याने मला कडाडून मिठी मारली. घरून निघताना रडायचं नाही, असं ठरवून देखील माझे डोळे पाणावले… “आई, असंच रडक्या डोळ्यांनी मला निरोप देणार आहेस का तू?” सोहम् मला थोपटत म्हणाला.

    “नाही बाळा. बिलकुल नाही. हे बघ मी पुसले डोळे. मी हसऱ्या चेहऱ्याने तुला निरोप देणार आहे. आपला सेल्फी काढ बरं आधी न विसरता! नाहीतर तसाच घाईघाईने आत निघून जाशील…”

    फोटो सेशन संपलं. सोहमने मला लगोलग ते व्हॉट्स ॲपवर पाठवले. माझ्या पाया पडून आशीर्वाद घेऊन तो सामानाची ट्रॉली घेऊन एकटाच पुढे चालायला लागला.

    सोहमने परदेशी शिक्षणासाठी संधी त्याच्या गुणवत्तेवर मिळवली, तेव्हा केवढा आनंद झाला होता मला. पण त्याचे तिथल्या विद्यापीठात जायचे दिवस जसजसे जवळ यायला लागले, तेव्हा मात्र मी मुळापासून हादरले. माझी बेचैनी दिवसेंदिवस वाढत चालली होती. कामात लक्ष लागेना. उगाचच चीडचीड होत होती. लेकाच्या सुखाआड यायचं नाही, असं दहादा मनाला बजावून सुद्धा डोळ्यांत येणारे अश्रू मी थोपवू शकत नव्हते…

    हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…

    लहानपणापासूनच तो आईवेडा. ‘आई, आई…’ करत सतत अवतीभवती असायचा. जसजसं वय वाढत गेलं, तशी त्याची तल्लख बुद्धी समोर येत गेली. शाळेत अभ्यासाबरोबरच खेळात देखील बक्षिसे मिळविली. ती घरी येऊन मला दाखवायला, तो नेहमी कासावीस असायचा. छोट्या-मोठ्या आजारपणात मांडीवर झोपायचा हट्ट करणारा तो कॉलेजच्या पायऱ्या चढून सुद्धा माझी मांडी सोडायला तयार नसायचा. कॉलेजमध्ये खंडीभर मित्रमैत्रिणी बनवले आणि सगळ्यांना घेऊन हक्काने घरी यायचा आणि खाद्यपदार्थ बनवण्यात मी कशी बेस्ट आई आहे हे अभिमानाने मिरवायचा. कधीतरी उगाचच मला चिडवत म्हणायचा, “आई लहानपणी तू लावायचीस तशी तीट लाव ना, उगाच कोण्या मुलीची नजर नको लागायला तुझ्या लाडक्या मुलाला.”

    काही वर्षांपूर्वी यांच्या अचानक जाण्याने माझ्या जगण्याला ब्रेक लागला होता. काही कळायच्या आतच सगळं संपलं होतं. तेव्हापासून सोहम् आणि मी एकमेकांच्या सोबतीने जगत होतो… माझी अवस्था आणि बेचैनी माझ्या बाबांनी अचूक हेरली आणि गेल्या आठवड्यात ते घरी येऊन गेले. परदेशी जाण्याचं काहीतरी सामान आणायला गेलेला सोहम् परत आला असावा, असे समजून मी दार उघडले आणि बाबांना अचानक दरवाज्यापाशी उभं बघून मला आश्चर्य वाटले. पण त्यांनी यायचं प्रयोजन सांगितले आणि मी काहीशी शांत झाले. मी पटकन चहा आणि पोहे बनवले खायला. खाता खाता बाबांनी मला समजवायला सुरवात केली,

    “बेटा, तुझ्या पोटी एवढा बुद्धिमान मुलगा जन्माला आला आहे. त्यामुळे त्याच्या तल्लख बुद्धीचा पक्षी जर सातासमुद्रापार जाऊन मोठा पराक्रम गाजवणार असेल तर, उलट मी म्हणेन की, तुझ्यासारखी नशीबवान तूच आहेस. सगळ्यांच्याच नशिबी हे सुख देत नाही देव. उलट, त्याच्या पंखात तुझ्या प्रेमाची, प्रोत्साहनाची आणि भक्कम आधाराची शक्ती तुला मनापासून ठासून भरायची आहे जेणेकरून, तो गरूडझेप घेऊन परदेशीभूमीवर भक्कमपणे उभा राहून त्याचं शिक्षण पूर्ण करू शकेल. बेटा, तीनच वर्षांचा प्रश्न आहे. हा हा म्हणता दिवस जातील निघून…”

    “बाबा तीन वर्षे म्हणजे कमी का दिवस आहेत. हे गेल्यापासून तर आम्ही दोघेच जगत आलोय एकमेकांच्या सोबतीने. त्याच्याशिवाय एक दिवस देखील जगले नाहीये मी…”

    “बेटा सगळं कबूल आहे तुझं. पण तरीही मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुला सावरायला हवं आता. पूर्वीच्या काळी राजे लढाईला निघताना त्यांच्या पत्नी आणि माता त्यांच्या कपाळावर कुंकूम तिलक लावून त्यांना ओवाळून निरोप देताना विजयाचा आशीर्वाद द्यायच्या. आपला सोहम् देखील ज्ञानाच्या लढाईवर निघालेला ज्ञानयोद्धा आहे. तेव्हा त्याला हसतमुखाने यशस्वी होण्याचा आशीर्वाद देत तू निरोप दे. तुझ्या प्रेमाची सगळी ताकद पणाला लाव, जेणेकरून तो परत येईल तेव्हा तुझ्या आनंदाचा वटवृक्ष तयार झालेला असेल. तुझी नोकरी अजून सुरू आहे. शिवाय, तुझे इतर छंद जोपासण्यासाठी उलट तुला पुरेपूर वेळ मिळेल. अधूनमधून आम्हाला भेटायला येत जा किंवा आपल्या नातेवाईकांना भेटायला जा. जागा बदलली की, तुझं मन देखील टवटवीत होईल.”

    हेही वाचा – लढाई… व्यवहार की भावना?

    “हे बघ जो तो आपलं प्रारब्ध घेऊन जन्माला येतो आणि आयुष्याचा प्रवास करत असतो त्या आकाशगंगेतील ग्रहांप्रमाणे. आपली मुलं आपल्या जवळ असताना जशी आपल्या आयुष्यात दिवाळी सुरू असते, तसंच काही काळासाठी दूर असताना त्यांच्या सोबतच्या गोड आठवणींसोबत एकटेपणाची दिवाळी देखील साजरी करता यायला पाहिजे आपल्याला! देव घेत असलेल्या या तुझ्या मातृत्वाच्या परीक्षेत तुला घवघवीत यश मिळेल, याची खात्री आहे मला,” असे सांगून त्यांनी मला विश्वास देण्याचा प्रयत्न केला.

    बाबा मला त्यांच्यापरीने समजावून गेले आणि दहा मिनिटांतच सोहम् घरी आला. माझा हसतमुख चेहरा बघून त्याला आश्चर्य वाटले, “काय ग आई! कोणी जादूगार आला होता की, काय मी नसताना?  किती रिलॅक्स दिसते आहेस तू आता…”

    “हो आला होता एक जादूगार… त्याने माझी व्यवस्थित तयारी करून घेतली आहे.”

    “कसली तयारी? माते, कळेल असं बोल प्लीज…” सोहम् मला चिडवताना खूपदा माते म्हणून हाक मारायचा.

    “माझी मातृत्वाच्या परीक्षेची तयारी. तीन वर्षे चालणारी ही खडतर परीक्षा मी मोठं यश संपादन करून पास होणार आहे, याची खात्री मला आता पटली आहे. तू निश्चिंतपणे जा ठरल्याप्रमाणे अमेरिकेला पुढील शिक्षणासाठी…” माझ्या बोलण्याचा काहीच उलगडा न झाल्याने दोन्ही खांदे उडवून सोहम् आतल्या खोलीत निघून गेला.

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026 ललित

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026 ललित

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    By प्रणाली वैद्यMay 8, 2026

    भाग – 24 समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने…

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.