Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 मे 2026

    May 11, 2026

    लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    May 10, 2026

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    May 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कोपिष्ट हत्तीचा माहूत ठरतो बळी
    अवांतर

    कोपिष्ट हत्तीचा माहूत ठरतो बळी

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 23, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, हत्तींचा कळप, शीघ्रकोपी हत्ती, हत्ती माणसाळवणे, माणसाळलेले हत्ती, कोपीष्ट हत्ती, हत्ती माहूत, माहूतांचे बळी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    यश:श्री

    हत्ती या प्राण्याबद्दलचे कुतूहल कायमच अबालवृद्धांना असते. त्यामुळेच सर्कस असो वा (हत्ती असलेला) चित्रपट सर्वांचे लक्ष हत्तीवरच असते आणि चर्चाही हत्तीचीच होते. दिसायला जरी अजस्त्र असला तरी, त्याला माणसाळवले जातं. जंगली हत्ती माणसाळवता येतो आणि त्याला पाळीव बनविण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो. त्यांना माणसाळवताना हुशार आणि तज्ज्ञ माहुतांना बरेच प्रयत्न करावे लागतात. हे हत्ती एकदा माणसाळले की, ते त्या माहुताच्या सर्व आज्ञा पाळतात. हळूहळू माहुतही त्याला पोटच्या पोराप्रमाणे जपतो. अनेक वर्षे पालनपोषण केलेला, प्रेमाने खाऊ घातलेला हत्ती हरवला किंवा मृत झाला, तर त्याच्या माहुताला खूप दुःख होते. हत्तीला जिथे बांधून ठेवले जाते, ती जागा तसेच दोरखंड पाहून त्याला अतिव दुःख होते.

    जंगली हत्तीला माणसाळवल्यानंतर त्याला प्रशिक्षित करताना, माहुत विशिष्ट शब्दांचा वापर करतो. यासाठी काहीवेळा काही संस्कृत तर काही हिंदुस्थानी शब्दांचा वापर करण्यात येतो. ‘जिवाक चिंतामणी’ मध्ये वलयसुंदरम या जंगली हत्तीवर नायक जिवाकन कशाप्रकारे नियंत्रण मिळवतो आणि त्याच्यावर स्वार होतो, याचे वर्णन करण्यात आले आहे… जिवाकनच्या गळ्यात सुगंधी पुष्पांची माला असून तो ‘अप्पुटू अप्पुटू’, ‘अटू अटू’ आणि ‘अई अई’ असे म्हणत त्या हत्तीच्या पाठीवर थापटी मारल्या. त्यामुळे जिवाकनच्या निर्देशानुसार तो त्या आज्ञेचे पालन करू लागला, असा उल्लेख आहे.

    हेही वाचा – संवेदनशील हत्ती अन् इंग्रजी साहित्य…

    पण या जंगली हत्तीला माणसाळवण्याचे प्रयत्न माहुतांसाठी काहीवेळेस जीवघेणेही ठरतात. संतापलेला हत्ती माहुताला चिरडतो. भलेही माहुताबरोबर हत्तीची दाट जवळीक असली, तरी तो त्याला मारतो. यासंदर्भात ‘नालादियार’मध्ये कवीने असा इशारा दिला आहे – हत्तीच्या आकाराच्या तसेच संतापी व्यक्तींशी मैत्री टाळावी किंवा सोडून द्यावी. मात्र कुत्र्यासारखा जीव लावणाऱ्या व्यक्तींशी मैत्री करावी. कितीही प्रेम लावले असेल तरी, हत्ती माहुताला मारतो. मात्र, कुत्र्याबरोबर जवळीक असलेली व्यक्ती त्याला मारायला गेली, तरी तो कुत्रा त्याच्याबद्दल शेपटी हलवून प्रेमच व्यक्त करतो… थोर विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी जवळपास 28 वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखात हा संदर्भ सापडला.

    हत्ती शीघ्रकोपी समजला जातो. त्याची जर कोणी खोडी काढली, तर तो सहन करू शकत नाही. यासंदर्भात काही कथा प्रसिद्ध आहेत. एका युवकाने हत्तीस काहीतरी खायला दिले, परंतु त्यात त्याने दगड ठेवला होता. त्यामुळे संतापलेल्या हत्तीने तोच दगड त्या युवकास मारला. तसेच, एका टेलरच्या मुलाने नदीवर जाणाऱ्या हत्तीला सुई टोचली असता नदीवरून येताना हत्तीने आपल्या सोंडेतील पाणी दुकानातील महागड्या कपड्यांवर उडवून ते सर्व कपडे खराब केले…

    हेही वाचा – हत्तीचे स्मशान!… वास्तव काय?

    हत्ती हा कळप करून राहणारा प्राणी आहे. कुठेही जायचे असले तरी आपल्या नेत्याच्या मागोमाग जातात. ते कधीही नेत्याशिवाय राहात नाहीत आणि त्यांच्या नेत्याचा मृत्यू झाला, तर ती जागा दुसरा हत्ती घेतो. अर्थातच, त्या जागी मजबूत आणि धाडसी हत्ती नेतृत्व करतो. या हत्तीला ‘ओरुत्तल’ असे म्हणतात, असेही दुर्गाबाई भागवत यांनी नमूद केले आहे.

    कळपाने जात असताना हे हत्ती ज्वारी तसेच बाजरीची पिके किंवा उसाच्या मळ्यांमध्ये घुसून त्याची नासधूस करतात. या हत्तींना पळवून लावण्यासाठी गोफणचा वापर करण्यात येतो. बाजरी तसेच ज्वारीच्या शेतामध्ये मचाण उभारले जाते आणि त्यावर रखवालदार उभा राहून शेत उद्ध्वस्त करणाऱ्या हत्तींना गोफणाद्वारे पिटाळून लावतो. गोफणातून मारलेला दगड अतिशय वेगाने जातो आणि हत्तींवर आदळतो, असे दुर्गाबाईंनी त्या लेखात म्हटले आहे. तथापि, आजही अनेक ठिकाणी हत्तीचे कळप येऊन उभे शेत उद्ध्वस्त करत आहेत आणि शेतकरी हतबल आहेत.

    क्रमश:

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026 अवांतर

    आजची तरुण पिढी…

    April 26, 2026 अवांतर

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    By सुधीर करंदीकरMay 3, 2026

    सकाळी सकाळी कॉलेज मैत्रीण छायाचा फोन आला – “अरे, आज काय खास आहे, ते विसरला…

    आजची तरुण पिढी…

    April 26, 2026

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 मे 2026

    May 11, 2026

    लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    May 10, 2026

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    May 10, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 10 ते 16 मे 2026

    May 10, 2026

    Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज

    May 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    May 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 293
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 415
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 205
    • मैत्रीण 18
    • ललित 614
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 मे 2026

    May 11, 2026

    लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    May 10, 2026

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    May 10, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 मे 2026

    May 11, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.