Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अंतिम सत्य मात्र एकच!
    अवांतर

    अंतिम सत्य मात्र एकच!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरJanuary 16, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मी मराठी, मराठी लेख, अंतिम सत्य, सामाजिक एकोपा, धार्मिक एकोपा, जातीद्वेष, धर्मद्वेष, सिनेमातील सणउत्सव, सणउत्सवांचा जल्लोष, सामाजिक आनंद, धार्मिक आनंद,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सिनेमांमधून मुंबईच्या सण-उत्सवांचे दर्शन होत असते. गोविंदाच्या जल्लोषापासून बाप्पाच्या दर्शनापर्यंत सर्व उत्साहात दाखवलं जातं. विशेष म्हणजे, सिनेमांमध्ये दाखविले जाणारे सण-उत्सव हे कधी सामाजिक एकतेचे रूप म्हणून दाखवले गेले तर, कधी असामाजिक अराजकता या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दाखविले गेले. खरंतर, हे सण, उत्सव आपणच निर्माण केलेत सामूहिक एकोप्यासाठी आणि सामूहिक आनंदाकरिता ना?  परंतु त्यामधील ही एकत्मतेची भावना मात्र दिवसेंदिवस बीभत्स होत चाललीय, अस वाटत. दोन हात,  दोन पाय, एक डोकं अशा सारख्याचं शरीराचा मनुष्य केवळ त्याच्या वैचारीक भेदामुळे एकमेकांशी वैर घेऊन बसला आहे.

    अग्नी, जल, वायु, पृथ्वी, आकाश ही निसर्गातील पंचतत्व. मनुष्यरुपी चालता बोलता देह जेव्हा निष्प्राण होतो तेव्हा तो पंचतत्वात विलीन होतो असं आपण म्हणतो.

    मी राहायला नागपुरला. मुंबईतील माझ्या घरातून मेट्रोच्या पुलापलीकडे पाहिले तर, हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लीम कब्रस्तान एकमेकांच्या बाजूलाच दिसतात. त्याच्याच बाजूला ख्रिश्चनांचे ग्रेव्हयार्ड पण असावे, असं वाटतं. मी जेव्हा जेव्हा मुंबईत येते तेव्हा या जागांकडे माझी हमखास नजर जातेच, कारण ते अगदी माझ्या दृष्टीक्षेपात आहे. सहज जरी खिडकीबाहेर नजर टाकली तरी, ते दृश्य दिसतं. खरंतर, वास्तवाची जाणीव करून देणारं हे चित्र आहे. मला पहिले हे माहीत नव्हतं, परंतु कधीतरी तेथील पाइपमधून धूर निघताना दिसायचा आणि नंतर हळूहळू एक जळकट, कुबट गंध हवेद्वारे घरामध्ये यायचा. तो गंध कशाचा आहे, हे जाणून घ्यायच्या प्रयत्नातूनच तिथे स्मशानभूमी आणि कब्रस्तान असल्याचा मला पता लागला.

    हेही वाचा – राजयोगिनी कुंती अन् दुर्वास ऋषी

    सांगायचा मुद्दा हा आहे की, मनुष्य मेल्यानंतर तिथे एकमेकांच्या बाजूला असलेल्या आपापल्या धर्मांच्या स्थानांवर कुठलीही तक्रार न करता बिनदिक्कतपणे विसावतो! का तर तो तेव्हा निष्प्राण असतो. त्याचा विचार प्रवाह थांबलेला असतो. तो तेव्हा मृत झालेला असतो. मग तो जिवंत असताना या वास्तवाचा स्वीकार करून का जगत नाही? जे काही जिवंत असताना आपल्यापाशी आहे ते नश्वर आहे, ते नष्ट होणार आहे, हे माहीत असूनही नको त्या गोष्टींकरिता का आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती आपण व्यर्थ खर्ची घालतो? आहे तो क्षण महत्त्वाचा समजून जीवनाचा भरभरून आनंद का आपल्याला घेता येत नाही? हे समजायला अजून किती वेळ लागणार आहे काय माहीत?

    अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी खिडकीत उभी राहून विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषाचा आनंद घेत होते, आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती… ढोल पथकांचा आवाज गर्जत होता… ट्रकवरील डीजेचा कर्णकर्कश आवाज कानावर पडत होता… त्याच वेळेस एक मेट्रो कुठलाही धर्मभेद किंवा जातीभेद न करता एकत्रितपणे माणसांचा लोंढा आपल्या डब्यांमध्ये सामील करून समोरील पुलावरून धावत होती… पुलापलीकडे असलेल्या स्मशानभूमीतून कुठल्यातरी पुण्यात्म्याच्या अंत्येष्टीचा धूर तेथील चिमण्यांमधून बाहेर पडत असल्याचे दिसत होते, तर त्याच वेळेस कुठूनतरी दूरवरून अजान कानावर पडत होती…

    हेही वाचा – पश्चात्तापदग्ध राजयोगिनी कुंती…

    आकाशाकडे पाहिले तर भारताच्या नकाशासारखा भासणारा एक ढग हळूहळू आकाशात विरळ होताना दिसत होता आणि मी ते सर्व दृश्य पाहून अंतर्मुख झाले होते. एक अनुभव असाही जो तुम्हाला कधी ना कधी गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडतो. पंचतत्वातून आलो आहोत, पंचतत्वातच विलीन होणार आहोत, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधायला इतका छोटासा अनुभवदेखील पुरेसा आहे. प्रत्येक धर्माचे रीतीरीवाज जरी वेगवेगळे असले, विचारधारा भिन्न असल्या तरी अंतिम सत्य मात्र हे एकच आहे!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026 अवांतर

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026 अवांतर

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 26, 2026

    रामनवमी विशेष कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम कौसल्येचा राम…

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026

    नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!

    March 26, 2026

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 248
    • अवांतर 175
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 362
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 513
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn