Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » दरवाजे… जन्मापासून मृत्यूपर्यंतचे…
    अवांतर

    दरवाजे… जन्मापासून मृत्यूपर्यंतचे…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 16, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, आयुष्याचा दरवाजा, दरवाजा आयुष्य, जन्म मृत्यू, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, कॉलेज शिक्षण, आयुष्याचे सार्थक, भिडे मॅडम,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    संगीता भिडे

    ‘दरवाजा’ हा शब्द खरंतर तुम्हा-आम्हा सर्वांच्या नित्य परिचयाचा आणि जिव्हाळ्याचा! सहज माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं आणि विचार केला “कधी ओळख झाली माझी ‘दरवाजा’ या शब्दाशी? आणि दिवस आठवला तो माझ्या जन्माचा. मातेच्या उदरात अगदी सुरक्षित असताना अचानक एका दिवस मातेच्या उदरकक्षांतून ‘दरवाजा’ ओलांडून आले की, अस्मादिक या भूतलावर- काळोखातून उजेडाकडे. एक मोठा ‘ट्यॅहा’ केला आणि उजेडाकडे बघताना डोळे दिपले, पटकन मिटले. क्षणभर भांबावले. उबदार हातांचा स्पर्श जाणवला आणि खात्री झाली, ‘हा माझाच दरवाजा’. सुरक्षिततेची हमी देणारा हा ‘दरवाजा’ आजतागायत माझी सोबत करतोय, हिंमत देतोय, जगण्याची उमेद देतोय.

    असेन 7/8 महिन्यांची, घराच्या प्रमुख दरवाज्याला लागली एक आडवी फळी. मज्जा संपली सगळी! एक दिवस मात्र पाय फळीवरून पलिकडे नेता आला, दाराबाहेरचं अंगण खुणावू लागलं, पावलं दुडूदुडू धावू लागली. एक ‘दरवाजा’ ओलांडला. आई-बाबांना पुन्हा काळजी, अंगणाचं कवाड उघडून जायचं नाही बरं का बाहेर. बुवा येतो आणि उचलून नेतो.’ काही काळ अंगणात पावलं थबकली, पण पुढला दरवाजा खुणावत होता ना! शाळेचा दरवाजा!! वेड लागलं शाळेचं, शाळेत जाऊन अभ्यास करण्याचं. खांद्याला अडकवली एक पिशवी, त्यात घातली पेन्सिल, पाटी आणि नजर चुकवली हळूच आईची. ‘दरवाज्या’ची सीमा ओलांडली आणि उड्या मारत शाळेत निघाले. अनोळखी रस्ता, अनोळखी वाट, तरीही शोधायचा होता शाळेचा ‘दरवाजा’. वाटेत भेटल्या शेजारच्या शकूमाई, ‘बाळा, कुठे निघालीस एकटीच?’

    ‘मला न शालेत जायचंय…’

    ‘चल, आपण दोघी जाऊ या शालेत?’

    ‘चालेल.’

    …आणि आणलं मला परत घराकडे, आई मात्र घाबरीघुबरी – ‘कुठे गेली असेल लेक माझी?’ पुन्हा एकदा घराचा ‘दरवाजा’ बंद! ‘एकटीनं जायचं नाही बरं का कुठे! पोलीस दादा पकडतो.’ आणि ‘दरवाज्या’ला लागली वरती आणखी एक कडी!!

    हेही वाचा – पुतळे असावेत की नसावेत?

    वय वर्ष 6 पूर्ण… आईबाबांनी धाडलं शाळेत मला.

    काय तो आनंद! शब्दातीत!! मला आवडणारा होता तो ‘दरवाजा’… ‘शाळेचा दरवाजा’!!
    आता एक मोठ्ठा ‘दरवाजा’ उघडा झाला होता माझ्यासाठी – ‘ज्ञानाचा दरवाजा!’ असे अनेक ‘दरवाजे’ ओलांडत अस्मादिकांची स्वारी आली की ‘महाविद्यालयाच्या दरवाज्यापाशी’… माझं ज्ञानाचं आकाश विस्तारत होतं. नवनव्या विषयांचं दालन माझ्यासाठी उघडत होत. आनंदाचं निधान मला सापडलं होतं, म्हणतां म्हणतां पदवीधर झाले आणि अजून एक नवीन ‘दरवाजा’ दृष्टीपथात आला. हा ‘दरवाजा’ मला खुणावत होता का? नाही, नक्की सांगता येत नाही, पण त्या ‘दरवाज्या’पाशी मी आले होते. एका नवीन गावातला ‘नवीन दरवाजा’, नवीन घराचा! घराचा उंबरठा ओलांडून नवीन घरात प्रवेश करती झाले. हा ‘दरवाजा’ मात्र वेगळीच जाणीव करून देत होता. सर्वच अपरिचित चेहरे, नाती, जागा, गाव – डोक्यावर ओझं वाढल्याची जाणीव तर दुसरीकडे आणखी एका नात्याची हुरहूर… हे सारं स्वीकारणं-एक नवीन आव्हान आणि आवाहन. हा ‘विवाह दरवाजा’ ओलांडतांना हळवी झाले, थोडी घाबरले, बावचळले. माहेरच्या दरवाज्याकडे पुन्हापुन्हा वळून बघत राहिले. सारंच नवीन, पण प्रेमाने आणि कौशल्याने ‘संसाराचे दरवाजे’ आजतागायत ओलांडत आले, कधी हरले, कधी जिंकले… पण प्रवास कधी थांबवला नाही.

    हेही वाचा – गैरसमज…

    आता उभी आहे, आयुष्याच्या अंतिम दरवाज्यापाशी… यमदेवाला एकच प्रार्थना, ‘यमदेवा, तू माझ्या दाराशी आज नाहीतर उद्या येणार आहेस, हे माहीत नाही का मला? ये, पण शांतपणे ये, पावले न वाजवता ये… आणि अलगदपणे उचलून ने तुझ्या ‘दरवाज्या’पल्याड…

    असा संपेल माझा ‘दरवाज्यां’चा प्रवास!

    असा हा ‘दरवाजा’ आयुष्यातील अविभाज्य घटक,

    नाही समजायची ती अटक,

    तरच होते आयुष्याचे ‘सार्थक’ !

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026 अवांतर

    आजची तरुण पिढी…

    April 26, 2026 अवांतर

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    By सुधीर करंदीकरMay 3, 2026

    सकाळी सकाळी कॉलेज मैत्रीण छायाचा फोन आला – “अरे, आज काय खास आहे, ते विसरला…

    आजची तरुण पिढी…

    April 26, 2026

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 292
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 612
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026
    Most Popular

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.