Sunday, March 1, 2026

banner 468x60

HomeललितElectric Corpses : मृतदेहात जीव परत आणण्याचे प्रयत्न!

Electric Corpses : मृतदेहात जीव परत आणण्याचे प्रयत्न!

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

एखाद्याच्या शरीरानं प्राण सोडला तरी त्याच्या आप्तस्वकियांना कुठंतरी काहीतरी सुप्त आशा वाटत असते… डॅाक्टर ॲाक्सिजन लावतील, सीपीआर देतील, एखादं इंजेक्शन दिलं तर हृदय पुनःश्च कार्यरत होईल वगैरे… पण एकदा विकेट पडली की पडली; अगदी तुरळक परिस्थितीत डीआरएसचे बेनिफिट मिळते… आता ही परिस्थिती असेल तर, तेव्हा काय असेल? जेव्हा वैद्यकशास्त्र काय एकूण विज्ञानच पाळण्यात होतं!

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात विजेचा शोध लागला तेव्हा तर, जगानं पहिल्यांदाच ‘एखाद्या अदृश्य शक्तीचा’ थेट अनुभव घेतला होता… विज्ञान उत्तरोत्तर नव्या क्षितिजांकडं धाव घेत असताना माणसाला पहिल्यांदा प्रश्न पडला की, ”ही अदृश्य शक्ती म्हणजेच वीज ‘जीवनाशी’ निगडित आहे का?” याच प्रश्नातून जन्म झाला एक विचित्र आणि भयचकित करणाऱ्या प्रवाहाचा ‘The Electric Corpses’ म्हणजेच मृतदेहाला ‘वीज’ देऊन जीव परत आणण्याचे प्रयत्न!

1780च्या दशकात इटालियन वैज्ञानिक लुईजी गॅल्वानी यांनी एक अनपेक्षित प्रयोग केला… एका प्रयोगादरम्यान त्याच्या बायकोनं प्रयोगशाळेत बेडकाचे पाय कापले असताना धातूचा हूक आणि वीज तयार करणाऱ्या यंत्राचा संपर्क झाला आणि अचानक बेडकाचे कापलेले पाय हलले! हे दृश्य इतकं चमत्कारीक होतं की, गॅल्वानी म्हणाला,

“हीच ती Animal Electricity जी जीवन निर्माण करते.”

यातून उभयंतांनी असा निष्कर्ष काढला की, जिवंत प्राणी स्वतःच्या पेशींमध्ये सूक्ष्म विद्युत ऊर्जा साठवतो आणि तीच स्नायूंच्या हालचालींचं कारण आहे!

हा प्रयोग म्हणजे ‘Electrophysiology’ या नव्या शाखेचा पाया होता..

गॅल्वानीचा पुतण्या जिओव्हानी अल्डिनी यानं हा सिद्धांत पुढं नेला, पण अधिक धाडसी स्वरुपात… 1803 साली लंडनमधील Royal College of Surgeons च्या प्रयोगशाळेत त्यानं मृत गुन्हेगार जॉर्ज फॉस्टर याच्या शरीराला विजेचा झटका दिला आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर चमत्कार घडला…

हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!

मृत जॅार्जनं अचानक हात पसरले, डोळे किंचित उघडले… त्याच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक भाव उमटला आणि तो किंचित कण्हला…

प्रेक्षक भयभीत झाले. काहींना वाटलं की, मृत जॅार्ज पुन्हा जिवंत झाला की काय? पण काही क्षणांत सर्व शांत झालं. प्रवाह थांबला आणि त्याचा देह पुन्हा निश्चल झाला… अल्डिनीनं आपल्या नोंदीत लिहिलं, ”वीज प्रवाहानं स्नायू हलवले पण आत्म्याला स्पर्श केला नाही.”

आजच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हे प्रयोग स्पष्ट करतात की, “वीज स्नायूंमध्ये तात्पुरती आकुंचनक्रिया घडवू शकते. मृत शरीरातील काही पेशी अल्पकाळासाठी विजेला प्रतिसाद देतात म्हणूनच मृतदेह हालचाल करतो, पण जीवनासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, मेंदू आणि हृदयातील जैवरासायनिक समन्वय प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली असते, त्यामुळं ‘जीव परत येत नाही.’

हेही वाचा – विषाची परीक्षा…

त्या काळात या प्रयोगांनी प्रचंड खळबळ माजवली. जनतेला हे प्रयोग ‘अमानवी’ वाटले; काहींनी तर अल्डिनीला ‘देवाशी खेळणारा वेडा’ ठरवलं, पण अल्डिनीचे प्रयत्न एवढेही निरर्थक नव्हते… याच प्रयोगांमधून पुढं Defibrillation अर्थात हृदयाला पुन्हा कार्यान्वित प्रक्रिया, Neurostimulation आणि Brain mapping सारख्या आधुनिक तंत्रांचा पाया घातला गेला.

या प्रयोगांनी केवळ विज्ञानालाच नाही तर, अगदी साहित्य जगतालाही हादरवून सोडलं; मेरी शेली हिनं 1818 मध्ये लिहिलेल्या ‘Frankenstein; or The Modern Prometheus’ या कादंबरीत अल्डिनीच्या प्रयोगांचा प्रभाव स्पष्ट दिसतो!

आजच्या वैद्यकशास्त्रात तर ‘वीज’ अत्यावश्यक साधन आहे; हृदयाचे ठोके स्थिर ठेवण्यासाठी Pacemaker, मेंदूतील विकृती दूर करण्यासाठी Deep Brain Stimulation, विजेवर चालणारं Artificial Organs ही सर्व तंत्रं या प्रारंभीच्या प्रयोगांची दूरगामी फळं आहेत!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!