मेष
नवीन वर्षाची सुरुवात आनंदात होईल. नवीन संकल्प हाती घ्याल आणि वेळेत पूर्ण करू शकाल. नोकरदारांना प्रमोशन आणि पगारवाढ संभवते; बदली होण्याची शक्यताही आहे. व्यावसायिकांच्या दृष्टीने छान वातावरण आहे; नवीन ऑर्डर मिळतील. व्यावसायिक भागीदाराला महत्त्व द्या; त्यांचे विचार ऐका. जोडीदाराबरोबर महिला छान वेळ घालवतील. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये; अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
वृषभ
या आठवड्यात मनाप्रमाणे गोष्टी घडतील. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाला भांडवल कमी पडेल; त्यासाठी बँकेची मदत मिळेल. व्यवसायातील स्थिती समाधानकारक राहील. कुटुंबात मंगलकार्य घडेल आणि महिलांच्या माहेरची मंडळी एकत्र येतील. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल; वेळेचे नियोजन आवश्यक आहे.
मिथुन
नोकरदारांसाठी कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील; वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अवघड कामे सहज पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाकडून नवीन करार केले जातील; कामानिमित्त परदेशप्रवास होईल. कुटुंबात महिलांचे लहान कारणांनी वादविवाद होऊ शकतात, अशावेळी तटस्थ राहून प्रश्न सोडवा. विद्यार्थ्यांची क्रीडा–कला क्षेत्रात प्रगती होईल. विवाहयोग्य तरुण–तरुणींचे विवाह ठरतील.
कर्क
या आठवड्यात तरुण–तरुणींचा भाग्योदय संभवतो; नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांकडे नवीन जबाबदारी सोपविली जाऊ शकते. इतरांशी स्पर्धा करू नका; खाण्या–पिण्याकडे लक्ष द्या. व्यावसायिक वर्गाला जाहिरातीमार्गे व्यवसाय वाढवता येईल. माहेरील लोकांसोबत महिलांचा प्रवास घडेल; छान वेळ जाईल. विद्यार्थ्यांनी वाहनांची काळजी घ्यावी; वेगावर नियंत्रण ठेवा.
सिंह
या आठवड्यात परदेशी जाण्याची इच्छा असलेल्यांची मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरदारांनी काम नीटनेटके आणि वेळेवर पूर्ण करावे; अनेक लाभ मिळतील. व्यावसायिक वर्गाची स्थिती समाधानकारक राहील; व्यवसाय विस्तार करू शकाल; कोर्ट प्रकरणे संपतील. महिलांचा मैत्रिणी आणि बहिणींसोबत परदेशप्रवास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना पार्ट टाइम नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कन्या
या आठवड्यात नवीन संकल्प कराल, पण ते पूर्ण करता येणार नाही. विवाहाविषयी तरुणांच्या समस्या दूर होतील. नोकरदारांनी घाई–गडबडीत निर्णय घेणे टाळावे. कागदपत्रे नीट वाचूनच त्यावर सही करावी; कोणत्याही व्यवहारातील नियम–अटी काळजीपूर्वक पाहा. महिलांना परिवार आणि मैत्रिणींबरोबर लहान–मोठे प्रवास करता येतील. विद्यार्थ्यांचा करमणुकीवर खर्च वाढेल.
हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?
तुळ
या आठवड्यात मनोकामना पूर्ण होतील; सकारात्मक विचार करा. नोकरदारांना नवीन जबाबदारी मिळू शकते; अधिकार वाढतील. व्यावसायिक वर्गाने नियमांचे उल्लंघन करू नये; लहान प्रश्नांना कमी लेखू नये; ते वेळीच सोडवण्यावर भर द्यावा. कुटुंबात मंगलकार्य ठरल्याने महिला आनंदी असतील. मित्रांनी घेतलेले पैसे विद्यार्थ्यांना परत मिळतील.
वृश्चिक
हा आठवडा अनुकूल आहे. आर्थिकबाबतीत चांगले यश मिळेल. वाईट मित्र आणि कुसंगत टाळा. नोकरदारांची प्रगती होईल; त्यांना नवीन जबाबदारी आणि पगारवाढ मिळू शकते. व्यावसायिकांना उत्तम संधी मिळतील; जोडधंदा सुरू करू शकाल. महिलांनी कुसंगत टाळावी; पैसे विचारपूर्वक खर्च करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे; वेळेत निर्णय घ्या.
धनु
या आठवड्यात शुभग्रहाची साथ मिळेल. राहत्या घरासंबंधीचे प्रश्न सुटतील. नोकरदारांसाठी सकारात्मक वातावरण असेल; वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण वागा. व्यावसायिक वर्गाचे येणे वसूल होईल; नवीन कामे मिळतील; आर्थिक प्रश्न सुटतील. महिलांच्या शब्दाला मान मिळेल; घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून लांब राहावे.
मकर
परदेशी जाण्याचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. नोकरदारांचे जुने संबंध पुन्हा जुळतील; टार्गेट पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाला नवीन ओळखी भविष्यात उपयोगी पडतील; प्रवासात लाभ होईल; व्यवसायातील थकबाकीची वसुली होईल. महिलांचा सहकुटुंब प्रवास होईल; घरात आनंद राहील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रयत्नात यश मिळू शकेल.
कुंभ
या महिन्यात मोठ्या संधी उपलब्ध होतील. नोकरदारांना नवीन संधी मिळतील; त्याचा योग्य उपयोग करा; कर्तृत्व सिद्ध करू शकाल. प्रसिद्धी आणि आर्थिक उत्पन्न वाढेल. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत व्यवसायात मोठी वाढ होईल; मोठ्या उलाढालीतून लाभ मिळेल; आर्थिक प्रश्न सुटतील; समाजात मान–सन्मान मिळेल. महिलांना पगारवाढ मिळेल; मनाप्रमाणे खर्च करू शकाल. विद्यार्थ्यांनी प्रवासात वाहनांवर नियंत्रण ठेवावे; नियम पाळावेत.
मीन
या आठवड्यात ग्रह अनुकूल आहेत. नोकरदारांचे नोकरीचे प्रश्न सुटतील; नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. व्यावसायिक वर्गाचे निर्णय अचूक ठरतील; स्पर्धकांवर मात करू शकाल. महिलांनी मैत्रिणींमधील संभाव्य वाद–विवाद टाळावेत; कोणाचीही बाजू घेऊ नये. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधून नोकरी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – आपुलेची मरण पाहिले म्यां डोळा…


