Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वाढदिवसाच्या शुभेच्छा… दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा!
    अवांतर

    वाढदिवसाच्या शुभेच्छा… दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा!

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 23, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, वाढदिवसाचे सेलिब्रेशन, वाढदिवसाच्या शुभेच्छा, हर्षा वाढदिवस, हर्षा गुप्तेचा वाढदिवस, दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याला शुभच्छा
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    डिसेंबर हा महिना माझ्या वाढदिवसाचा. मला माझ्या वाढदिवसाचं कायमच अप्रूप वाटत आलं आहे. तसं पाहिलं तर, सगळ्यांनाच असतं. आमच्याकडे पहिली 5 वर्षं वाडी भरून वाढदिवस साजरे करायची पद्धत आहे. त्यानंतर कधी सेलिब्रेशन केल्याचं आठवणीत नाही. कोणी शुभेच्छा दिल्याचं सुद्धा आठवणीत नाही. थोडं मोठं झाल्यावर कॉलेजमध्ये, नाटक किंवा शूटच्या ठिकाणी कोणी ना कोणी शुभेच्छा द्यायचे. पण हे व्हॉट्सॲप, फेसबुक आल्यापासून कोण कोण आणि कितीजण वाढदिवसाला शुभेच्छा देतात, भेटवस्तू मिळतात… सगळा आनंद आणि खूप मज्जा वाटते!

    हेही वाचा – बारीक व्हायचंय? तर मग…

    जसं मला कोणी शुभेच्छा दिलेल्या आवडतात, तसं मला इतरांना शुभेच्छा द्यायलाही आवडतं. रोज फेसबुकवर नोटिफिकेशन्स येतात. व्हॉट्सॲपवर तर जयवंत वाडकर, संजय भाडळे पाटील, चंद्रशेखर सांडवे आणि दिलीप गुजर हे लोक रोज कोणाचे वाढदिवस आहेत, ते जाहीर करतात. मग जमेल तेवढ्यांना मी वैयक्तिकरीत्या शुभेच्छा पाठवते. कोविडनंतर मी कोणी ओळखीचं नसेल तरीही त्यांच्या वाढदिवसाला मी आवर्जून शुभेच्छा देते. कोविडमध्ये जवळची, लांबची, ओळखीची, अनोळखी अशी कितीतरी माणसे देवाघरी गेली. मृत्यू या गोष्टीचा तेव्हापासून धसका बसलाय. त्यामुळे प्रत्येकाने दीर्घायुषी व्हावे, हीच प्रामाणिक इच्छा असते. त्यामुळे मी देत असते जमेल तेवढ्या लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    हेही वाचा – …अन् व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘क्राइम’ने मुक्त केलं!

    आमच्या घरात कोणाचाही वाढदिवस असला की, एक विशिष्ट फोन कॉलची आम्ही सगळेच वाट पाहायचो. सुमन आत्या या खरंतर माझ्या आते सासूबाई. पण काही म्हणा, सुमन आत्या आणि भाई साहेबांचा फोन आला म्हणजे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत व्हायचा. आत्याबाई गेल्या, त्यानंतर आलेल्या वाढदिवशी थोडंसं कुठे तरी चुकल्यासारखं वाटत होतं आणि अचानक भाईसाहेबांचा फोन आला… तो आनंद अवर्णनीय! भाईसाहेब गेल्यानंतर सगळ्यांना शुभेच्छा द्यायचं व्रत… हो व्रतच, माझे चुलत सासू-सासरे म्हणजे विनोदकाका आणि सुधाकाकींनी सुरू ठेवलं. काही काळाने काका गेले. काकी खूप म्हाताऱ्या झाल्यात. पण जगात कितीही काही घडलं तरी, माझ्या सासूबाई मात्र मला फोन करून शुभेच्छा देतातच. आई, वडील, नवरा मुले, सून, जावई तर शुभेच्छा देतातच… पण सासर घरून होणारं कौतुक जरा जास्त वाटतं. वाढदिवस सफळ संपूर्ण होतो.

    या वर्षी तर, माझा सिनेमा ‘आशा’ रीलिज झाला. सुपरहिट सिनेमा. यापेक्षा मोठ बर्थडे गिफ्ट काय बरं असू शकतं!

    वाचकहो, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी वाढदिवसाच्या आवर्जून शुभेच्छा द्या. प्रेम वाढवा!!!


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    …तर पोटगी मिळत नाही!

    July 29, 2026 अवांतर

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026 अवांतर

    संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!

    July 17, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    …तर पोटगी मिळत नाही!

    By Team AvaantarJuly 29, 2026

    ॲड. अमोल दोरवट हिंदू विवाह अधिनियम, 1955चे कलम 24 (खटला चालू असताना पोटगी) आणि कलम…

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026

    संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!

    July 17, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026

    हर्निया (आंत्रवृद्धी) विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 380
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 515
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 821
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.