Friday, February 6, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 09 डिसेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 09 डिसेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 09 डिसेंबर 2025; वार : मंगळवार
  • भारतीय सौर : 18 अग्रहायण शके 1947; तिथि : पंचमी 14:28; नक्षत्र : आश्लेषा 26:22
  • योग : ऐंद्र 14:32; करण : गरज 26:00
  • सूर्य : वृश्चिक; चंद्र : कर्क 26:22; सूर्योदय : 06:58; सूर्यास्त : 18:00
  • पक्ष : कृष्ण; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – विचारपूर्वक गुंतवणूक करा, पुढील काळात चांगला लाभ होऊ शकतो. आज मान्यवर संस्थेकडून सन्मान मिळू शकतो. जोडीदाराचा सल्ला कौटुंबिक व्यवसायात फायदेशीर ठरेल. जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळेल, नवीन मित्र देखील बनवाल. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळू शकेल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

वृषभ – दिवसभर व्यग्र राहाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सासरच्यांशी संबंध सौहार्दपूर्ण असतील. महत्त्वाच्या वस्तूंची ऑनलाइन शॉपिंग कराल. चांगला परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक कराल. संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यक्रमाला उपस्थित  रहाल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन – दिवस खर्चिक असेल, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्यात विरोध होईल, त्यामुळे सावध रहा. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच बोलतानाही संयम ठेवा.

कर्क – कठोर परिश्रम आणि योग्य प्रयत्नांमुळे चांगले फळ आणि पारितोषिक मिळू शकते. लग्न किंवा कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने कुटुंबातील अनेकांच्या भेटीगाठी होतील. प्रवास घडू शकतो, मात्र तो खर्चिक ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत संध्याकाळ आनंदात घालवाल.

सिंह – कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल.

हेही वाचा – वेंधळेपणा, पुन्हा एकदा!

कन्या – कठीण कामेही सहज पूर्ण होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. आज पालकांकडून मोठा पाठिंबा मिळेल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील.

तुळ – व्यवसायात नफा होण्याचे संकेत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. एखादी मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी पूर्ण विचार करा. आज आपले काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरोग्य चांगले राहील आणि ऊर्जाही जास्त असेल.

वृश्चिक – आपल्या कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे यासाठी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. कौटुंबिक तणावामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्ये संयम बाळगा. शहाणपणाने निर्णय घ्या. संध्याकाळी देवतेचे दर्शन घेतल्याने शांती मिळेल.

धनु – धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. कठोर परिश्रमानेच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल.

मकर – एखादी मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता आहे. संततीच्या संदर्भातील समस्या सुटतील. आज सासरच्या लोकांकडून तुमचे कौतुक होईल. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळीत असेल, आणि तुमच्या योजनांमध्ये त्यांचा संपूर्ण पाठिंबा असेल.

कुंभ – बुद्धिमत्तेचा वापर करून व्यवसायात नवीन क्लृप्ती लढवाल, ज्यामुळे तुम्हाला नफा होईल. हुशारीने गुंतवणूक करा. जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटल्याने आनंद मिळेल. आज जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या पार्टीला उपस्थित राहाल.

हेही वाचा – ‘आशा’ला कानबाई देवीचा आशीर्वाद!

मीन – जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. दानधर्मात तुमची आवड वाढेल. व्यावसायिकांना आपल्या भागीदारावर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. आज संततीशी संबंधित वाद संपतील. महत्त्वाच्या खरेदी होतील. काही शुभ कारणांनी नातेवाईकाची भेट शक्य आहे.


दिनविशेष

साहित्यविश्वातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. शिवराम कारंथ

टीम अवांतर

भारतीय साहित्यविश्वातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, प्रसिद्ध कन्नड लेखक, तत्त्वचिंतक, विचारवंत, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते, समाजसुधारक डॉ. शिवराम कारंथ यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1902 रोजी कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यातील कोट या गावी झाला. महाविद्यालयात इंटरच्या वर्गात शिकत असतानाच महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात ते सहभागी झाले. पुढे  शिक्षण सोडून ते स्वातंत्र्यलढ्यात उतरले. समाजसुधारणेचा एक भाग म्हणून याच काळात त्यांनी नाटके लिहायला आणि बसवायला सुरुवात केली. याशिवाय, इतर भाषांमधील नाटकांचे अनुवादही केले. वडील शिक्षक असल्याने शिक्षण क्षेत्राविषयी शिवराम यांना विशेष आस्था होती. शाळांचे ‘कोंडवाडा’ हे स्वरूप त्यांना मुळीच मान्य नव्हते. वर्तमान शिक्षण प्रणालीतील दोष लक्षात घेऊन त्यांनी स्वत: पाठ्यपुस्तके लिहिली. याशिवाय,  शब्दकोश, विश्वकोशाची निर्मितीही केली. त्यांनी तयार केलेली शालेय पाठ्यपुस्तके आजही कर्नाटकात अभ्यासक्रमासाठी वापरली जातात. मुलांसाठी बालप्रपंच हा ज्ञानकोश, तसंच प्राणीप्रपंच, पक्षीप्रपंच कोश, विज्ञान कोशही त्यांनी प्रयत्नपूर्वक तयार केले. कारंतांनी जवळपास 34 कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कादंबऱ्यांचे विषय सामाजिक असून वास्तवता तसेच प्रादेशिक चित्रण ही त्यांच्या कादंबऱ्यांची वैशिष्ट्ये मानली जातात. कारंतांनी अनेक एकांकिकाही लिहिल्या. गर्भगुडि आणि बित्तिद बेळे ही नाटके तर गीत नाटके, नवीन नाटके हे त्यांचे एकांकिकासंग्रह विशेष उल्लेखनीय आहेत. आपल्या नाट्यलेखनात त्यांनी पद्यनाट्य, गीतनाट्य आणि छायानाट्य असे प्रयोगही केले आहेत. 1955 च्या अखिल कन्नड साहित्य संमेलनाच्या म्हैसूर अधिवेशनाचे कारंत अध्यक्ष होते. कर्नाटक विद्यापीठाकडून ‘डॉक्टरेट’ तर भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ हे सन्मानही त्यांना लाभले. आधुनिक कन्नड साहित्यात कारंतांना वास्तववादी श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. 9 डिसेंबर 1997 रोजी त्यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!