आजच्या भागात आपण केस रंगवताना केसांमध्ये काय बदल होतो, ते बघू. जेव्हा तुम्ही केसांना रंग लावता तेव्हा त्यातील रसायनांमुळे (chemicals) क्यूटिकल (cuticle) उघडते आणि हे रसायन केसांमध्ये शिरते. तुम्ही सुरुवातीच्या लेखांत केसांना रंग melanin मुळे मिळतो, हे वाचले असेलच. तर हे chemicals melanin bleach करतात आणि तेव्हा melanin चा स्वत:चा रंग हा फिक्कट होतो. जेव्हा हा रंग फिक्कट होतो, तेव्हा त्यावर तुम्ही लावलेला रंग चढतो आणि तो कॉर्टेक्समध्ये (cortex) फिक्स होतो. जेव्हा तुम्ही लावलेला ओला रंग धुता तेव्हा क्यूटिकल बंद होतात आणि नवीन रंग केसांच्या बाहेर येत नाही.
केसांना मेंदी लावताना सुद्धा हेच घडत असते, फक्त मेंदीमध्ये नैसर्गिक रसायने असतात. तेथे बाहेरून रसायने घालावी लागत नाहीत.
हेही वाचा – Hair care : केसांना नियमितपणे तेल लावण्याची गरज आहे का?
लोकांची अशी तक्रार असते की, ‘केस colour करायला लागल्यापासून माझे केस जास्त लवकर अजून पांढरे झाले.’ पण असे होत नाही! कारण melanin तयार होण्याची प्रक्रिया ही केसांच्या मुळाशी होत असते आणि रंग हा मुळाशी लावला जात नाही. काही मिलीमीटर अंतर ठेवून लावला जातो. जर रंग घरी लावत असाल तर, हे घडत नाही आणि रंग सगळीकडे लावला जातो. हे टाळता आले तर उत्तमच. त्यासाठी प्रोफेशनल (Professional) व्यक्तीकडे जाऊन, रंगवून (colouring) घेणे चांगले. केस रंगवल्यानंतर तुमच्या Hair dresser ने after care सांगितले आहे, जे केस रंगवण्याशी निगडीत आहेत – म्हणजे Shampoo, conditioner आणि serum – ते वापरावे. जेणे करून तुम्ही केलेले colouring जास्त दिवस टिकेल.
हेही वाचा – Hair care : केसांची त्रिस्तरीय रचना…
केस पहिल्यांदाच रंगवत असाल तर, कानामागे Patch test घेणे चांगले. ज्यामुळे रंगाची ॲलर्जी (allergy) नाही ना, हे कळते.
आतापर्यंत आपण त्वचा आणि केस यांची बऱ्यापैकी माहिती पाहिली. या सगळ्या गोष्टींचे आरोग्य तेव्हाच उत्तम राहील जेव्हा तुम्ही उत्तम समतोल आहार घ्याल, योग्य व्यायाम कराल. जेव्हा त्वचेला आणि केसांना आतून पोषण मिळेल, तेव्हाच बाहेरून केलेल्या उपायांचा फायदा होईल.
समाप्त


