माधवी जोशी माहुलकर
संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय? काहीतरी चटपटीत खावेसे वाटते आहे? चकली, चिवडा असे पदार्थ खाऊन खाऊन किती खाणार? त्याचीही चव जीभेला नकोशी झाली आहे, हो ना? मग बनवा चटपटीत, चटकदार, कुरकुरीत आणि चमचमीत असे पोळीचे खस्ते! शिळ्या पोळ्यांना हा एक नवीन ट्विस्ट देऊन एकदम चटकदार डिश तयार करता येते. हे बनतातही पटकन अन् संपतातही चटकन!
साहित्य
- शिळ्या पोळ्या
- बारीक चिरलेले टोमॅटो – 2
- बारीक चिरलेले कांदे – 2
- वाफवलेले मूग (वाटीभर) किंवा एक उकडलेला बटाटा
- गोड दही – वाटीभर
- चिंच-गुळाची चटणी किंवा ईमली सॉस – चवीनुसार
- पुदिना-कोथींबीर चटणी – चवीनुसार
- नायलॉन शेव – वाटीभर
- तिखट – 1 चमचा
- मीठ – चवीनुसार
- जिरेपुड – 1 चमचा
- धणेपुड – 1 चमचा
- चाट मसालाव – 1 लहान चमचा
- बारीक चिरलेली कोथींबीर – मूठभर
- तेल – तळणासाठी
हेही वाचा – Recipe : मूगडाळ आणि तांदळाची लुसलुशीत इडली!
कृती
- प्रथम सर्व शिळ्या पोळ्यांचे कात्रीने समान चार भाग करून घ्यावेत आणि तेलामध्ये ते खरपूस तळून घ्यावेत.
- तळलेल्या पोळीच्या तुकड्यांना एका डिशमध्ये घेऊन त्यावर प्रथम थोडे वाफवलेले मूग (किंवा उकडलेला बटाटा कुसकरून) ठेवावे आणि त्यावर तिखट, मीठ भुरभुरून टाकावे.
- नंतर वरून पुदिना चटणी, चिंच-गुळाची चटणी, गोड दही टाकून परत एकदा तिखट, मीठ, धणेपुड, जिरेपुड आणि चाट मसाला आवडीनुसार टाकावा.
- आता त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, जिरेपुड, धणेपुड टाकून वरून नायलॉन शेव आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.
टिप्स
- चिंच-गुळाची चटणी आणि पुदिन्याच्या चटणीचा वापर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
- या खस्त्यासोबत वाफवलेले मूग किंवा बटाटा हे ऐच्छिक आहे.
- शिळ्या पोळ्यांची चतकोर तळायच्या नसतील तर पोळी कडक होईपर्यंत भाजूनही घेता येते. पण भाजलेल्या पोळीचे तुकडे थोड्या वेळात नरम पडतात. तळून घेतलेले पोळीचे तुकडे उरले तर डब्यामध्ये भरून ठेवता येतात आणि पुन्हा वापरता येतात.
एकूण कालावधी – साधारण अर्धातास
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.


