Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 19 नोव्हेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 19 नोव्हेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 19, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 19 नोव्हेंबर 2025; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 28 कार्तिक शके 1947; तिथि : चतुर्दशी 09:43; नक्षत्र : स्वाती 07:58
    • योग : सौभाग्य 08:59; करण : चतुष्पाद 22:59
    • सूर्य : वृश्चिक; चंद्र : तुळ 28:13; सूर्योदय : 06:46; सूर्यास्त : 17:59
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    दर्श अमावस्या

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नवीन स्रोतांकडून पैसे मिळू शकतात. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीतून पैसे मिळण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनही आनंदाने भरलेले असेल.  एखाद्या प्रिय मित्राची भेट होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस शुभ असेल.

    वृषभ – ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कामाचा मोठा ताण असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, पैसे जास्त खर्च होतील. वडिलांकडून आर्थिक लाभ मिळू शकतात. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना अडचणी येतील. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. कौटुंबिक जीवनात गोडवा असेल, त्यामुळे राग नियंत्रित करा.

    मिथुन – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करू शकता. कामात यश मिळेल. मित्रांकडून फायदा होऊ शकतो. मात्र वादविवादांपासून दूर रहा. कुटुंबाशी समन्वयही चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या कार्यक्रमातही सहभागी होण्याची शक्यता आहे. खरेदीसाठी  मोठा खर्च केला जाऊ शकतो.

    कर्क – नकारात्मक विचार टाळा. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. बेरोजगार जातकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पती-पत्नीमध्ये सुसंवाद राहील. मित्रांसाठी पैसे खर्च करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

    सिंह – व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कल्पना मनात येतील. चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. अनावश्यक खर्च वाढल्याने चिंता निर्माण होईल. काही ठिकाणी अडकलेले पैसे मिळू शकतात. कामावर खूप मेहनत घ्यावी लागेल. नवीन लोकांशी ओळखी होतील. कुटुंबात काही कारणांनी मतभेद होतील.

    हेही वाचा – स्मृतिचित्रे… लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मवृत्त!

    कन्या – आजचा दिवस संमिश्र असेल. आरोग्य चांगले राहील, परंतु अनावश्यक खर्चामुळे मानसिक ताण वाढेल. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. अशा काही लोकांच्या भेटी होतील, जे भविष्यात मदत करतील. काम/व्यवसाय आणि कुटुंब यांच्यात संतुलन ठेवा. कामकाजाबाबत कुटुंबाकडून मोठा पाठिंबा मिळेल.

    तुळ – आजचा दिवस शुभ राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, नशीब बलवान असेल. उत्पन्न वाढेल. कामात यश मिळेल. नोकरीत बढती मिळू शकते. परदेशातून व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. सरकारी परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यशस्वी होतील. आरोग्याची काळजी घ्या.

    वृश्चिक – दिवस संमिश्र असेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल. परदेश प्रवास करण्याची संधी मिळेल. एखाद्या मोठ्या कंपनीशी करार होण्याची शक्यता आहे. खूप दिवसांनी आवडीच्या व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल.

    धनु – दिवस चांगला जाईल. पालकांच्या आणि घरातील इतर ज्येष्ठांच्या आशीर्वादाने, सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. शारीरिक उर्जेत वाढ झाल्याची भावना अनुभवायला मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. नवीन प्रकल्प सुरू करू शकता. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक समस्या त्रासदायक ठरतील, आत्मसंयम ठेवा.

    मकर – कामात विनाकारण अडथळे येऊ शकतात. मात्र तरीही, ऑफिसमधील प्रलंबित काम पूर्ण झाल्याने मोठा भार हलका होईल. वाहन देखभालीचा खर्च वाढू शकतो. योग आणि ध्यानाद्वारे मानसिक शांती मिळेल. नवीन लोकांशी ओळखी होतील. एखादा नवीन प्रकल्प सुरू करू शकता. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील.

    कुंभ – कठोर परिश्रम कामात सकारात्मक परिणाम देतील. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवता येईल. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. कुटुंबातील सदस्यांना पुरेसा वेळ देऊ शकाल. विद्यार्थ्यांनाही त्यांच्या अभ्यासात रस वाटेल. काळजीपूर्वक कोणताही निर्णय घ्या. आहाराची काळजी घ्या,  प्रवास टाळा.

    हेही वाचा – निर्णय… योग्य की अयोग्य?

    मीन – ऑफिसमध्ये खूप काम असेल. एखादी जुन्या समस्या तणाव वाढवणारी असेल. मन अस्वस्थ असेल, आत्मविश्वासावर परिणाम होईल. पण त्याचबरोबर बोलण्याच्या हातोटीमुळे नवीन ओळखी होतील. जास्त खर्च त्रासदायक ठरेल. एखाद्या कामासाठी मित्राची मदत घेऊ शकता. प्रियजनांचा पाठिंबा, मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.


    दिनविशेष

    संगीतकार सलील चौधरी

    टीम अवांतर

    स्वतःच्या चालींबद्दल अत्यंत काटेकोर असणारा संगीतकार अशी ओळख चित्रपटसृष्टीत निर्माण करणाऱ्या सलील चौधरी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1925 रोजी पश्चिम बंगालच्या 24 परगणातील गाजीपूर येथे झाला. त्यांचे वडील आसाममध्ये चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्यांचे डॉक्टर म्हणून काम करायचे. त्यामुळे ब्रिटिश मालकवर्गाचा सहवास आणि जात्याच संगीताची आवड असलेल्या सलीलदांच्या वडिलांनी पाश्चात्य संगीत ध्वनीमुद्रिकांचा मोठा संग्रह केला होता. तो ऐकतच सलीलदा मोठे झाले‌. याशिवाय कुशाग्र बुध्दी आणि एखादी गोष्ट चटकन ग्रहण करण्याच्या सवयीमुळे कोणत्याही गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय सलीलदा स्वरमालिका शिकले, सुचलेले किंवा ऐकलेले स्वर लिपीबद्ध करू लागले, पियानो, हार्मोनियम, व्हॉयलिन, बासरी यासारखी वाद्ये ते स्वतःच वाजवायला शिकले. त्यांनी गाणी लिहिली, कथा लिहिल्या. त्या वाचकप्रिय ठरल्या. याशिवाय, त्यांनी लिहिलेली नाटके बंगाली रंगभूमीवर सादर झाली आणि त्यांनाही लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांचा मोर्चा बंगाली चित्रपटांकडे वळला, तिथे देखील त्यांनी काही चित्रपट कथा आणि गाणी लिहिली. त्यामुळे बिमल रॉय यांनी सलीलदांना हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी मुंबईला बोलावले. सलीलदांच्या कथेवर आधारित ‘दो बिघा जमीन’  हा चित्रपट बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केला. त्याचे संगीत दिग्दर्शक सलीलदांचं होते. या चित्रपटासाठी सलीलदांना फिल्मफेअर अवॉर्डही मिळाले. पुढे अनेक वर्षे बिमल रॉय आणि सलीलदा ही जोडी कार्यरत होती. बिमलदांच्या आठ चित्रपटांना सलीलदांनीच संगीत दिले होते. त्यातील ‘मधुमती’ या चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय ठरली. याशिवाय नोकरी, जागते रहो, परख, छाया, प्रेमपत्र, उसने कहां था, माया, काबुलीवाला, आनंद, अन्नदाता, रजनीगंधा, छोटीसी बात अशा असंख्य चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. या चित्रपटांमधील गाण्यांनाही अफाट लोकप्रियता मिळाली. हिंदी चित्रपटांखेरीज त्यांनी‌ मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, गुजराथी, आसामी, उडिया अशा भाषांमधील चित्रपटांनाही संगीत दिले. याशिवाय असंख्य चित्रपटांचे पार्श्वसंगीतही त्यांनी तयार केले होते. 1988 साली संगीत नाटक अकादमी, 1990 मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. 2013 साली भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काढलेल्या विशेष टपाल तिकिटावर सलीलदांचा फोटो झळकला. यंदाही त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सलीलदांचे विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले. 5 सप्टेंबर 1995 रोजी त्यांचे निधन‌ झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn