Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : भरड्याचे वडे
    फूड काॅर्नर

    Recipe : भरड्याचे वडे

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 15, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, Recipe, delicious, स्वादिष्ट, भरडा वडा, वडा, थापलेला वडा, पितृपक्ष विशेष, Bharda Vada, Vada, Thaplela Vada, Pitrupaksha Special
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आराधना जोशी

    साहित्य

    • तांदूळ – 1 वाटी
    • हरभरा डाळ – पाव‌ वाटी
    • उडदाची डाळ – पाव‌ वाटी
    • धणे – पाव‌ वाटी
    • जिरे – 2 टेबलस्पून
    • मेथी – अर्धा चमचा
    • तिखट – 1 टेबलस्पून
    • हळद – 1 टीस्पून
    • मीठ – चवीनुसार
    • हिंग – पाव टीस्पून
    • तीळ – 3 टेबलस्पून
    • कणीक – 2 टेबलस्पून
    • तेल – 3 टेबलस्पून (मोहन म्हणून)
    • तेल – वडे तळण्यासाठी
    • कोथिंबीर – अर्धी वाटी (चिरलेली)

    पुरवठा संख्या : 7 ते 8 जणांसाठी

    तयारीस लागणारा वेळ :

    • तांदूळ धुवून वाळवून घेण्यासाठी – अर्धा तास
    • भाजून घेण्यासाठी – 10 मिनिटे
    • भरडा काढण्यासाठी – 5 मिनिटे

    तळण्यासाठी लागणारा वेळ : 15 मिनिटे

    एकूण वेळ : एक तास

    विशेष आहार माहिती : शाकाहारी

    हेही वाचा – Recipe : खमंग आणि रुचकर मूंगलेट

    कृती

    1. तांदूळ स्वच्छ धुवून थोडावेळ चाळणीत निथळत ठेवा.
    2. नंतर स्वच्छ सुती कापडावर धुतलेले तांदूळ पसरवून पंख्याखाली अर्धा तास वाळत ठेवा.
    3. एका पातेल्यात हरभरा डाळ, उडदाची डाळ, धणे, जिरं, मेथी हे साहित्य एकत्र करून घ्या.
    4. अर्ध्या तासाने जाड बुडाची कढई गरम करून गॅस बंद करा.
    5. आता या गरम कढईत तांदूळ घालून ते भाजायला सुरुवात करा. हे करताना गॅस बंदच ठेवायचा आहे.
    6. तांदूळ गरम झाले की, हरभरा डाळ, उडदाची डाळ एकत्र केलेले साहित्य त्यात घाला. तेही जरा कोमट होईल इतपत परतून घ्या. या सगळ्यात गॅस बंदच ठेवायचा आहे.
    7. आता हे साहित्य पूर्ण गार झाल्यावर मिक्सरमधून त्याचा जाडसर भरडा काढून घ्या. हा भरडा एअर-टाइट डब्यात भरून ठेवा.
    8. वडे करताना तीन वाट्या भरडा बाऊलमध्ये घ्या. त्यात तिखट, हळद, चवीनुसार मीठ, हिंग, तीळ, कोथिंबीर घालून छान मिक्स करा.
    9. दुसरीकडे तीन टेबलस्पून तेल गरम करून या वड्याच्या मिश्रणावर घाला. सर्व परत एकदा नीट मिक्स करा.
    10. आता त्यात 2 टेबलस्पून कणीक आणि अर्धी वाटी गरम पाणी घालून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
    11. आता लागेल तसं कोमट पाणी घेऊन संपूर्ण पिठ भिजवावे.‌ भिजवताना ते फार सैल नाही, फार घट्ट नाही अशाप्रकारे असावे.
    12. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवावे.
    13. दूधाची प्लास्टीकची पिशवी घेऊन त्याला तेलाचा हात लावून त्यावर लिंबाएवढा वड्याच्या पिठाचा गोळा घेऊन तो हाताने खूप जाड नाही, खूप पातळ नाही अशाप्रकारे थापून घ्या.
    14. मध्यम आचेवर तेलात खरपूस तळून घ्या.
    15. भरडा वडा तयार आहे.

    हेही वाचा – Recipe : मिक्स हर्ब राईस आणि चीज स्पिनॅच सॉस

    टीप

    • हे वडे पितृपक्षातील नेवैद्यासाठी करणार असाल तर याला मधे भोक पाडत नाही.
    • वडा थापून करणं जमत नसेल तर लाटण्याला थोडंसं तेल लावून त्याने लाटून केले तरी चालतील.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    अवांतर, Recipe, delicious, स्वादिष्ट, भरडा वडा, वडा, थापलेला वडा, पितृपक्ष विशेष, Bharda Vada, Vada, Thaplela Vada, Pitrupaksha Special

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn