दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 25 जुलै 2025; वार : शुक्रवार
भारतीय सौर : 03 श्रावण शके 1947; तिथि : प्रतिपदा 23:22; नक्षत्र : पुष्य 16:00
योग : वज्र 07:27, सिद्धी 29:30; करण : किंस्तुघ्न 11:57
सूर्य : कर्क; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:17
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
जरा जिवंतिका पूजन
महालक्ष्मी स्थापना आणि पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस सामान्य असेल. नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु प्रत्येक अडचणीसह आयुष्यात काहीतरी नवीन शिकाल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. सकारात्मक राहा. यामुळे भविष्यातील प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी मदत होईल.
वृषभ – खूप आत्मविश्वास असेल. आव्हानांवर मात करू शकाल. सर्व स्वप्ने सत्यात उतरतील. मेहनतीचे फळ मिळेल. जीवनात सकारात्मक उर्जेचा ओघ राहील. यामुळे भविष्यात यशाचा मार्ग मोकळा होईल.
मिथुन – जीवनाच्या सर्व पैलूंकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे. वादांमुळे नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संवादाच्या माध्यमातून समस्या सोडवा. आज चिडचिड वाढेल. मात्र विचारांमध्ये स्पष्टता असू द्या. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका.
कर्क – तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. कार्यालयातील सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जीवनात सकारात्मक बदल होतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सर्व काही ठीक राहील.
सिंह – धीर धरा हा मंत्र आज महत्त्वाचा ठरेल. नोकरीसाठी एखादी मुलाखत देणार असाल तर त्यात यश मिळेल. त्यामुळे अपयशाची भीती बाळगू नका आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करा. ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक आव्हानावर मात कराल.
कन्या – नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि प्रणयाचा अभाव असू शकतो. वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी केलेले छोटे प्रयत्न देखील उपयुक्त ठरतील आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. अविवाहितांसाठी संसाराची सुरुवात करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. मात्र त्यासाठी कोणतीही घाई करू नका. एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
तुळ – व्यावसायिक जीवनात स्पर्धेचे वातावरण असेल. प्रतिस्पर्ध्याच्या कृतीमुळे कारकिर्दीत अडचणी निर्माण होतील. त्यामुळे कार्यालयीन कामे कुशलतेने हाताळा. स्वभाव काहीसा चिडचिडा बनेल. मात्र धीर धरा आणि शांत मनाने निर्णय घ्या.
वृश्चिक – स्वप्ने सत्यात उतरतील. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या सोडवल्या जातील. मन प्रसन्न राहील. जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. नवीन बदल स्वीकारण्यास तयार रहा. नवीन छंद किंवा उपक्रम पुढे नेण्यासाठी ही चांगली वेळ आहे.
धनु – आर्थिक स्थिती चांगली राहील. विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीमुळे भविष्यात चांगला परतावा मिळेल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. मनाचे ऐका कारण यामुळे योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. आर्थिक बाबींमध्ये चांगले निर्णय घेऊ शकाल.
मकर – वादविवाद टाळा. यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. इतरांच्या भावना समजून घ्या, मात्र जास्त भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. दैनंदिन दिनचर्येतून काही वेळ पुरेशी विश्रांती घ्या. नवीन, आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अवलंब करा. आव्हाने कठीण वाटू शकतात, परंतु सातत्यपूर्ण प्रयत्न यशाकडे नेतील.
कुंभ – जीवनात भरपूर सकारात्मकता असेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि यशासाठी कठोर परिश्रम करा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल.
मीन – आर्थिक स्थिती चांगली राहील. करिअरच्या वाढीसाठी नवीन संधी मिळतील, परंतु मानसिक आणि शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घ्या. नव्या व्यायाम रूटीनचे काटेकोर पालन करा. दररोज योग आणि ध्यान करा. यामुळे निरोगी आणि उत्साही राहण्यास मदत होईल, आरोग्य सुधारेल.
हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या
दिनविशेष
प्रसिद्ध कवी वसंत बापट
टीम अवांतर
सुप्रसिद्ध कवी वसंत बापट यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. 1948 साली पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून एम. ए. झालेल्या वसंत बापट यांच्यावर लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहावासाचे संस्कार झाले. बिजली (1952) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. सेतु (1957), अकरावी दिशा (1962), सकीना (1972) आणि मानसी (1977) हे त्यांचे बिजलीनंतरचे काव्यसंग्रह. संस्कृत आणि इंग्रजी कवितेचा प्रभावही या कवितेवर दिसतो. जनजागृती करणे हेही कवितेचे एक महत्त्वाचे कार्य आहे, असे बापट मानत असल्यामुळे राष्ट्रीय संकटाच्या, दु:खाच्या वा देशातील विविध जन-आंदोलनांच्या प्रसंगी त्यांनी आपली संवेदनशील प्रतिक्रिया आपल्या कवितेतून मांडली आहे. ‘उत्तुंग आमुची उत्तरसीमा इंच इंच लढवू’ ही त्यांची गाजलेली कविता किंवा त्यांनी रचिलेला ‘संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा’ ही त्याची काही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. बंगालीतील, विशेषत: गुरुदेव टागोरांच्या कवितेतील मानवतावाद आणि इंग्रजी कवितेतील स्वच्छंदतावादी प्रवृत्ती यांचेही संस्कार बापटांच्या कवितेवर झालेले दिसतात. भारताचा निसर्ग, चालीरीती, लोककला, वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने होत असलेली त्याची वाटचाल याचे प्रत्ययकारी चित्रण बारा गावचे पाणी (1967) या प्रवासवर्णनपर ग्रंथात त्यांनी केले आहे. सेतु या काव्यसंग्रहास तसेच लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या बालगोविंद (1965) या नाटकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. 1999मध्ये मुंबईत झालेल्या 72व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 17 सप्टेंबर 2002 रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.