दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 21 जुलै 2025; वार : सोमवार
भारतीय सौर : 30 आषाढ शके 1947; तिथि : एकादशी 09:39; नक्षत्र : रोहिणी 21:07
योग : वृद्धी 18:38; करण : कौलव 20:22
सूर्य : कर्क; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:18
पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
कामिका एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस मेष राशीच्या जातकांसाठी उत्साह आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. त्याचे खुल्या मनाने आणि उत्साहाने स्वागत करा. साहस आणि वैयक्तिकरित्या होणारी प्रगती तुमची वाट पाहत आहे. त्यामुळे तणाव कमी करा आणि कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करा. अविवाहित जातकांना विवाहाच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीची भेट होऊ शकते.
वृषभ – वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील प्रगतीचा दिवस आहे. मात्र प्रेमाच्या बाबतीत, भावनांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्तरावर नियोजनाला प्राधान्य दिले पाहिजे. आरोग्य सुधारावे, यासाठी विशेष प्रयत्न करा.
मिथुन – समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. स्पर्धात्मक स्वभाव इतरांपेक्षा पुढे जाण्यात सहाय्यभूत ठरेल. आज कुटुंबासमवेत अवश्य वेळ घालवा. व्यावसायिक जीवनातील अतिताणामुळे शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. ध्यानधारणा केल्याने बराच फरक पडेल.
कर्क – आजचा दिवस थोडा व्यग्र असेल. कार्यालयातील एखाद्या घटनेमुळे अतिरिक्त जबाबदारी देऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी भागीदारीबाबत सावध राहिले पाहिजे. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. खूप जास्त जंक फूड खाऊ नका.
सिंह – सिंह राशीच्या जातकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. काही जातकांना तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे आवडत्या कामात मन रमवा. कामाच्या दरम्यान सलग काम करण्यापेक्षा काही वेळाने विश्रांती घ्या. अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे
कन्या – आजचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असणार आहे. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. दिवसभरात पुरेसे पाणी प्या.
हेही वाचा – Skin Care : त्वचा आणि तिचे प्रकार
तुळ – आजचा दिवस संस्मरणीय ठरेल. कार्यालयातील वातावरण हळूहळू सकारात्मक होईल. जोडीदाराशी असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येवर योग्य त्या वैद्यकीय सल्ल्याने लगेच औषधोपचार सुरू करा.
वृश्चिक – एखादी चांगली बातमी मिळू शकते. जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत दिवस चांगला असेल. मानसिक आरोग्याकडेही पुरेसे लक्ष द्या. सकारात्मक विचार करत राहा. आरोग्याला पोषक असे अन्नपदार्थ खा.
धनु – वैयक्तिक पातळीवर प्रगती करण्याच्या दृष्टीने अनेक संधी आज उपलब्ध होतील. सकारात्मक विचारांमुळे वैवाहिक आयुष्य, कारकीर्द, पैसा आणि आरोग्यातील बदलांशी जुळवून घेणे सोपे जाईल. त्यामुळे संपूर्ण जीवनात चांगले बदल होऊ शकतात.
मकर – आजचा दिवस मकर राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ आहे. अनेक मार्गांनी पैसे येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी स्थानिक राजकारणाला बळी पडू नका. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा.
कुंभ – कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. तुमची मेहनत फळास येईल. काही जातकांना पदोन्नतीही मिळू शकते. मात्र रागावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक वादात अडकणे टाळा.
मीन – मीन राशीच्या जातकांसाठी दिवस सामान्य असेल. आरोग्य सुधारण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. कामाचा जास्त ताण घेऊ नका. व्यावसायिकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. आनंदी राहा.
हेही वाचा – त्वचा आणि त्वचेवर परिणाम करणारे घटक
दिनविशेष
व्रतस्थ संशोधक रा. चिं. ढेरे
टीम अवांतर
व्रतस्थ संशोधक, अभ्यासक, लेखक आणि संपादक रा. चिं. तथा रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म 21 जुलै 1930 रोजी मावळ भागातील निगडे या गावी झाला. महाराष्ट्राच्या धर्मेतिहासाचा सखोल, सूक्ष्म आणि सर्वांगीण अभ्यास प्रातिभ बुद्धीने करणारा संशोधक म्हणून देश-विदेशातील संशोधकांत रा. चिं. ढेरे यांची ओळख आहे. 1975 मध्ये एम.ए.शिवाय ते पीएच.डी. झाले. 1950 साली त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचे लघुचरित्र लिहिले. 1952-53 साली त्यांनी भोर संस्थानच्या शंकराजी नारायण पारितोषिकासाठी नाथ संप्रदायावरती लघुप्रबंध लिहिला. त्याला पुरस्कारही मिळाला आणि येथूनच ढेरे यांच्या शोधकार्यास आणि संशोधनात्मक लेखनाला प्रारंभ झाला, तो शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहिला. रा. चिं. ढेरे यांची वाङ्मयसूची लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन या त्यांच्या गौरवग्रंथात सविस्तर आहे. त्यांच्या ग्रंथांची संख्या जवळजवळ एकशे दहा आहे. यात स्वतंत्र, अनुवादित, आधारित आणि संपादनेही आहेत. अनेक महत्त्वाच्या ग्रंथांना ढेरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. अनेक प्रतिष्ठित संस्थांनी त्यांचा गौरव केला. महाराष्ट्र शासनाचे त्यांच्या वेगवेगळ्या ग्रंथांना नऊ वेळा पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (1990) त्यांना देण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा पहिला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. संगीत नाटक अकादमीचा रवीन्द्रनाथ टागोर सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांच्या जेष्ठ कन्या अरुणा ढेरे या राष्ट्रीय कीर्तीच्या अभ्यासक, व्याख्यात्या, संशोधक आणि कवयित्री असून त्यांची दुसरी कन्या वर्षा गजेंद्रगडकर या लेखिका आहेत तसेच त्यांचे पुत्र मिलिंद ढेरे हे राष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार आहेत. 1 जुलै 2016 डॉ. रा. चिं. ढेरे यांचे पुण्यात निधन झाले.