सचिन कोळी
(आरोग्य सल्लागार)
तुम्ही डायबेटिक पेशंट आहात… पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्यामध्ये Insulin Deficiency (इन्सुलिन कमी तयार होणे) आहे की, Insulin Resistance (इन्सुलिनचा प्रभाव कमी होणे)? कारण हे समजलं तरच ठरतं की, तुम्ही कसा Diet Plan follow केला पाहिजे, कोणते बदल केले पाहिजेत आणि कोणते घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
खालील काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही स्वतः अंदाज लावू शकता की तुमच्यात Deficiency आहे का Resistance –
Insulin Resistance कडे इशारा करणारे प्रश्न
- तुमचं पोट सुटलं आहे / कंबर वाढली आहे का?
- जेवल्यानंतर झोप येते / सुस्ती येते का?
- गोड खाण्याची इच्छा वारंवार होते का?
- वजन कमी करण्याचा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही का?
- मान, बगल किंवा जांघेत काळेपणा आला आहे का?
- BP, triglycerides, fatty liver, PCOS यापैकी काही आहे का?
यापैकी 4 किंवा जास्त “हो” = इन्सुलिनचा प्रभाव कमी झाल्याची शक्यता जास्त.
हेही वाचा – शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!
Insulin Deficiency कडे इशारा करणारे प्रश्न
- मागच्या काही महिन्यांत अचानक वजन कमी झालं का?
- Sugar अचानक 300–400+ गेला का?
- खूप तहान / वारंवार लघवी / अशक्तपणा आहे का?
- गोळ्या घेत असूनही sugar कंट्रोल होत नाही आणि इन्सुलिन लागलं का?
यापैकी 3 किंवा जास्त “हो” = शरीरात इन्सुलिन कमी तयार होत असल्याची शक्यता जास्त.
Score समजून घ्या
- Resistance score जास्त = शरीर इन्सुलिनला नीट प्रतिसाद देत नाही.
- Deficiency score जास्त = शरीरात इन्सुलिन कमी तयार होत आहे.
- दोन्ही जास्त = दोन्ही समस्या असू शकतात / पॅन्क्रियाज थकत आहे.
जर याबद्दल काही संभ्रम, शंका किंवा प्रश्न असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल.
(सौजन्य – समर्थ आरोग्य फाऊंडेशन)
संपर्क – 9150014545
हेही वाचा – रक्तदाब कमी झालाय… कसे ओळखायचे?
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
https://whatsapp.com/channel/0029VbAtufJ65yDINAO9Ad2H
या लिंकला क्लिक करून WhatsApp Channel जॉइन करा.


