Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    उद्धार

    November 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आधणीं घातलिया हरळ, होती अमृताचे तांदुळ

    November 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 नोव्हेंबर 2026

    November 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, November 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » उद्धार
    ललित

    उद्धार

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीNovember 2, 2026Updated:November 2, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, शिरीष कुलकर्णी, लेखक शिरीष कुलकर्णी, डॉक्टर शिरीष कुलकर्णी, कथालेखक शिरीष कुलकर्णी, अध्यात्म कथा, सदूची दु:ख, सदूची पत्रिका, जीवनातील नकारात्मकता, जीवनातील सकारात्मकता, आनंद स्वामी, पांड्या स्वामी, सदूवरील संकटे, सदूचे कष्ट, सदूचा प्रामाणिकपणा, सदूचा आत्मविशावस, सदूची श्रद्धा, श्रद्धेतून धैर्य,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उत्तरार्ध

    सदानंदच्या मागे संकटे लागली होती. त्यात तो हतबल होता. तो पत्रिकेच्या घड्या उघडत होता आणि ग्रहस्थितीचा विचार करत होता. एखादे नुकसान झाले की, तो पांड्या स्वामींकडे जाई. पत्रिका तीच असायची, पण तिच्याविषयीची भीती प्रत्येक भेटीत आणखी गडद होई. काही दिवसांनी मुक्तानं अंथरूण धरलं. करायला कोणीच नव्हतं आणि सदूही लक्षच देईना. अखेर कंटाळून मुक्ता माहेरी गेली.

    अशातच शांताकाकूंनी सदानंदला आपल्या चाळीतील एक खोली राहायला दिली होती. त्यांचा घरगुती भोजनाचा व्यवसाय होता. त्या त्याला आनंद स्वामींकडे घेऊन गेल्या. सदानंदनं आपली पत्रिका आनंदस्वामींपुढे ठेवली. त्यांनी ती पत्रिका बाजूला ठेवली आणि सदानंदकडे बराच वेळ अत्यंत भेदक नजरेने पाहिले… ते म्हणाले,

    “एक कोटी रामनामाचा संकल्प कर. त्याला लागेल तेवढा काळ दे. सकाळ-संध्याकाळ ठरवून बसायचं. दिवसा काम शोधायचं. रोजच्या कमाईचा आणि खर्चाचा हिशेब लिहायचा आणि आश्रमात आलास की, सेवेत हात गुंतवायचा.”

    त्याच सुमारास कर्जाने घेतलेल्या छोट्या मालवाहू गाडीचे काम सुरू झाले. पहाटे भाजी, दुपारी धान्य आणि संध्याकाळी भोजनाचे डबे; सदूच्या हातात पुन्हा थोडी कमाई राहू लागली. पण एका पावसाळी रात्री, वळणावर अचानक आलेल्या वाहनाला चुकवताना त्याची गाडी रस्त्याच्या कडेला आदळली. मालाचे नुकसान झाले. त्याच्या हाताला आणि बरगड्यांना मोठी दुखापत झाली. उपचार, गाडीची दुरुस्ती आणि थांबलेले काम यात त्याचे साठवलेले सगळे पैसे संपले.

    हेही वाचा – सदू आणि त्याची दु:ख

    बरे होईपर्यंत सदू शांताकाकूंच्या व्यवसायाचा हिशेब पाहू लागला. ग्राहकांच्या देयकांची नोंद केली. कुठे खर्च वाया जातो, कुठे माल वेळेत पोहोचत नाही, हे त्याच्या लक्षात येऊ लागले. हाताला पूर्ण बळ आले, तेव्हा त्याच्याजवळ आणखी एक नवे काम शिकलेले होते. त्यानंतरची वर्षे फक्त कामात गेली. कधी पैसे अडकले, कधी गाडी बंद पडली, एकदा भागीदारीत नुकसानही झाले. पण आता सदूने प्रत्येक वेळी कागदपत्रे नीट वाचायला, व्यवहार लिहून घ्यायला आणि अडचण वाढण्याआधी सल्ला घ्यायला शिकून घेतले. ग्राहकांकडून पैसे उशिरा आले, तरी कामगारांची मजुरी वेळेवर देण्याचा त्याचा कटाक्ष असे.

    हळूहळू एका गाडीच्या दोन झाल्या, मग आणखी वाढल्या. भोजनपुरवठ्याबरोबर धान्यवितरणाचे काम आले. चार कामगार आले. त्याच्या सचोटीने जपलेली ओळख त्याच्यासाठी नव्या कामांची आपोआप शिफारस करू लागली. मोठे घर बांधून झाल्यावर तो स्वामींना आमंत्रण द्यायला गेला.

    “मुक्ताशी बोललास?” स्वामींनी विचारले.

    “पत्रं जातात, कधी भेटतोही. पण घरी ये म्हणायचं धाडस होत नाही.”

    “तिच्या मनात काय आहे, ते तिच्याकडून ऐक. ज्या दिवसांत तुम्ही दोघांनी सगळं गमावलंत, त्या दिवसांत तिनंही खूप सोसलं आहे.”

    त्या संध्याकाळी तो मुक्ताच्या माहेरी गेला. तिने दार उघडले. दोघे काही वेळ एकमेकांकडे पाहतच राहिले.

    “माझ्याबरोबर घरी येशील?” त्याने विचारले.

    तिचे डोळे भरून आले… “सदू, यावेळी आपलं दुःख दोघांनी वाटून घ्यायचं.”

    त्याने मान हलवली… “तेव्हा तुझा थकवा मला समजलाच नाही. आता आपण कायम बोलत राहू.”

    गृहप्रवेशाच्या दिवशी शांताकाकू आल्या. घरातील माणसे, कामगार, येणाऱ्या गाड्या पाहून त्यांना स्वामींचे शब्द आठवले. देवघरात सदूची जुनी माळ होती. पावसात भिजलेल्या त्या पत्रिकेची घडी त्याने त्याच कपाटात जपून ठेवली होती.

    काही वर्षांनी एके सकाळी शांताकाकू स्वतःची पत्रिका घेऊन आश्रमात आल्या. त्यांच्या भोजनव्यवसायाच्या मोठ्या स्वयंपाकघराचे छत मुसळधार पावसात कोसळले होते. धान्य भिजले होते, काम थांबले होते आणि ग्राहकांकडून घेतलेली आगाऊ रक्कम परत देण्याची वेळ आली होती.

    “स्वामी, मी जप नियमित करते. कुणालाही आजवर फसवलेलं नाही. तरी असं का झालं? सदूचं आयुष्य घडवलंत. आता माझ्यावर दया करा.”

    स्वामींनी त्यांना शांतपणे बसवले… “दुखापत कुणाला झाली का?”

    “सुदैवानं सगळे वाचले.”

    “बरं झालं. आता छताच्या दुरुस्तीचा अंदाज घ्यायचा. तोपर्यंत सुरक्षित दुसरं स्वयंपाकघर मिळतं का ते पाहायचं. ग्राहकांशी स्वतः बोलायचं. अडलेली देयकं कुठली आहेत, ती आधी लिहून आण. अशावेळी हक्काची माणसं बोलाव. सदानंदलाही आवर्जून बोलाव. तुमच्यासोबत काम करायला तोही नक्की तयार असेल.”

    काकू अस्वस्थ झाल्या. “माझा जप वाढवू का?”

    “सध्याचा पुरेसा आहे. गरज पडली तर काही दिवस माळेचे मणी बाजूला ठेव आणि आधी समोरचा प्रश्न सोडव.”

    काकू त्यांच्याकडे पाहतच राहिल्या…

    “सदूला एक कोटी जप सांगितलात आणि मला मात्र हे, असलं?”

    स्वामींचा आवाज अतिशय मृदू झाला…

    “सदू पहिल्यांदा आला होता, तेव्हा त्याचा स्वतःवरचा विश्वास पूर्णपणे संपला होता. त्याला नवा दिवस सुरू करण्यासाठी फार मोठ्या आधाराची गरज होती. तूच तर आई होऊन त्या काळात त्याचा आधार झालीस. पण आज अचानक मोठं नुकसान झाल्यानं तू स्वतःचंच बळ विसरली आहेस. मी आत्ता तुला फक्त त्याची आठवण करून देतोय.”

    “पण मग, माझ्या इतक्या चांगल्या वागण्याचं काय फळ?”

    “तू फोन केलास की, किती माणसं मदतीला येतील, ते फक्त पाहा. वर्षानुवर्षं जपलेला विश्वास तुझ्यासोबत आहे. त्या विश्वासाचा हक्काने हात धर. अपघात घडला म्हणून स्वतःच्या आचरणाला किंवा नशिबाला दोष देत बसू नकोस.”

    त्यांनी पत्रिका तिच्या हातात परत दिली… “जा. काम सुरू कर. शुभं भवतु.”

    दुसऱ्याच दिवशी सदानंदने स्वतःच्या गोदामाचा सुरक्षित भाग रिकामा करून दिला. एका ग्राहकाने मोठ्या कार्यक्रमाचे भोजनकाम त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा सोपवले. काही जुन्या कामगारांनी परत येऊन हातभार लावला. नुकसान भरून काढायला वेळ लागला. त्या काळात काकू दमल्या, रडल्याही. पण प्रश्न आटोक्यात येऊ लागले शिवाय प्रश्नांची यादी रोज लहान होत गेली.

    व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यावर त्यांना स्वामींच्या बोलण्याचा खरा अर्थ उमगला. सदूला पूर्वी जसे सावरले होते, तसेच आज त्यांनाही सावरले गेले होते. मार्गदर्शनाचे रूप फक्त त्यांच्या गरजेनुसार बदलले होते.

    हेही वाचा – बर्फाखालचे निळे भूत

    पांड्या स्वामी हे सगळे  पाहतच होते. अखेर एका दुपारी सदानंदची ती जुनी पत्रिका घेऊन ते आनंदस्वामींच्या भेटीला आले…

    “मी ही पत्रिका कितीदा पाहिली. संकटांचे, दारिद्र्याचे अर्थ काढले. मृत्यूची भीती सांगितली. तरी यानं एवढी प्रगती कशी केली? तुम्ही हे योग कसे मोडून काढलेत?”

    आनंदस्वामींनी समोरच्या अंगणात पाहिले. सदानंद एका नव्या कामगाराला गोदामाचा हिशेब समजावून सांगत होता. त्याच्या हातात पेढ्यांचा बॉक्स होता. नुकतेच मिळालेले मोठे काम सगळ्यांना सांगायला तो आला होता.

    “मला त्याच्यात शक्यता दिसत होती,” स्वामी म्हणाले, “मात्र, एक गोष्ट नक्की की, तुमचे शब्द ऐकून तो सगळे संपले आहे, असे समजू लागला होता. त्याला पुन्हा प्रयत्न करण्याइतका धीर मिळावा, म्हणून मी त्याच्यासमोर त्याच्या मोठ्या घराचं चित्र उभं केलं.”

    “पण तुम्हाला एवढी खात्री कशी होती?”

    “माणसाला अचूक ओळखून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्याचे कष्ट करायचे हात मी पाहिले. प्रामाणिकपणे परत केलेला पैसा पाहिला. भुकेल्या माणसासाठी थांबणं पाहिलं. ही त्याच्या आजच्या आयुष्याची खरी माहिती होती. तिचाही विचार करायला हवा.”

    पांड्या स्वामींची नजर खाली गेली…

    “पत्रिकेत लाख दोष काढता येतील,” आनंदस्वामी पुढे म्हणाले. “पण शुद्ध आचरण, शिकण्याची तयारी, नम्रता आणि श्रम यातूनच माणसाच्या आयुष्याला पुढच्या वाटा फुटत असतात. साधनेनं त्याला स्वतःशी प्रामाणिक राहण्याचं बळ मिळवून दिलं. संकटं आली, तरी त्यानं चुकीचा मार्ग निवडला नाही.”

    त्यांनी पांड्या स्वामींच्या वहीत दोन ओळी लिहिल्या…

    श्रद्धया लभते धैर्यं

    धैर्येण लभते जयम् ।

    शुद्धाचारेण यत्नेन

    दुःखं याति शनैः क्षयम् ॥

    – गीताव्रत साधना

    “श्रद्धेतून धैर्य, धैर्यातून प्रयत्नांची उमेद आणि शुद्ध वर्तनाच्या सोबतीने पुढे जाण्यासाठी नवी वाट मिळते…”

    ते म्हणाले, “गीतेच्या सहाव्या अध्यायातल्या पाचव्या श्लोकात ‘स्वतःचा उद्धार स्वतः करावा,’ असे सांगितले आहे. मला फक्त त्याला त्याच्या कामाला विश्वासाने लावायचे होते.”

    “म्हणजे सदानंदचे भीषण योग तुम्ही मोडून काढले नाहीत?”

    हेही वाचा – भय

    स्वामी हसले… “ते तर सगळं सदूनंच केलं. मी फक्त त्याला श्रद्धा दिली.”

    तेवढ्यात सदानंद आत आला. त्याने दोघांना नमस्कार केला. पांड्या स्वामींनी त्याची पत्रिका त्याच्यापुढे धरली. त्याने ती आदरानं घडी करून खिशात ठेवली. मग बॉक्समधला पेढा त्यांच्या हातावर ठेवला.

    पांड्या स्वामींनी त्याचा हात क्षणभर धरून ठेवला. हमाली करताना पडलेले जुने घट्टे अजूनही हाताला लागत होते. त्याच हाताने कर्ज फेडले गेले होते, तुटत जाणारा संसार पुन्हा उभा केला जात होता आणि अडचणीतल्या शांताकाकूंना भक्कम आधार दिला होता.

    त्यांनी आशीर्वादासाठी दुसरा हात त्याच्या मस्तकावर ठेवला. या पांड्यास्वामींच्या ओठांवर मृत्यूचे भविष्य नव्हते. त्यांनी सदूला आशीर्वाद दिला.

    “सदानंदा, आनंदानं जग. तुझ्या हातून आणखी असंख्य माणसांना सुखाची भाकर मिळणार आहे.”

    समाप्त
    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    Bookshelf : ‘सेतू’… कथानकाची घट्ट वीण असलेली कादंबरी

    November 1, 2026 ललित

    आठवणींची पेटी… आकाशफुले

    November 1, 2026 ललित

    मिता आवडत होती, पण…

    October 31, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : ‘सेतू’… कथानकाची घट्ट वीण असलेली कादंबरी

    By डॉ. अस्मिता हवालदारNovember 1, 2026

    लेखिका आशा बगे यांच्या ‘भूमी’, ‘मारवा’ यासारख्या कादंबऱ्या आणि कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. दिवाळी अंकातून त्यांच्या…

    आठवणींची पेटी… आकाशफुले

    November 1, 2026

    मिता आवडत होती, पण…

    October 31, 2026

    तूप मेतकूट भात

    October 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    उद्धार

    November 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आधणीं घातलिया हरळ, होती अमृताचे तांदुळ

    November 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 नोव्हेंबर 2026

    November 2, 2026

    Bookshelf : ‘सेतू’… कथानकाची घट्ट वीण असलेली कादंबरी

    November 1, 2026

    आठवणींची पेटी… आकाशफुले

    November 1, 2026

    जगावेगळी ‘चिंधी’

    November 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 491
    • अवांतर 217
    • आरोग्य 167
    • पंचांग आणि भविष्य 658
    • फिल्मी 77
    • फूड काॅर्नर 263
    • मैत्रीण 34
    • ललित 1034
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    उद्धार

    November 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आधणीं घातलिया हरळ, होती अमृताचे तांदुळ

    November 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 नोव्हेंबर 2026

    November 2, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.