Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 सप्टेंबर 2026

    September 29, 2026

    गणेशोत्सव अन् बालपणीच्या आठवणी

    September 28, 2026

    मॅग्नोलिया

    September 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » भय
    ललित

    भय

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीSeptember 28, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, शिरीष कुलकर्णी, लेखक शिरीष कुलकर्णी, डॉक्टर शिरीष कुलकर्णी, कथालेखक शिरीष कुलकर्णी, नदी सागर संगम, नदीचे भय, नदीचे अस्तित्व, नदीचं वाहणे, महासागरात विलय, महासागरातील विलयाचा धोका, नदीचे महासागर, नदीचे नवे रूप, अथांग महासागर
    गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    खलील जिब्रानची ही कथा. माझा सगळ्यात आवडता कथाकार हा खलील जिब्रानच! लहानपणी त्याची एक कथा मी वाचली होती. त्याच्या एका कथेनं मला पंधरा दिवस रडवलं होतं… त्याची ‘भय’ ही कथा खूप सुंदर आहे… नदी सागराला मिळते, असं एक चित्र मी तयार करण्याचा प्रयत्न केलाय… आणि त्या इंग्रजी कथेचा स्वैर अनुवादही आपणा सर्वांसाठी, अर्थातच विनम्रतेने!


    असे म्हणतात की, अवखळपणे समुद्रापर्यंत वाहात आलेल्या नदीला समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी खूप भीती वाटू लागते. नदी भीतीने अक्षरशः थरथर कापू लागते. डोंगराच्या उंच शिखरांवरून खाली येतानाचा आपला प्रवास तिला आठवू लागतो. आता तिचं समर्पण जवळ आलंय. आता तिचं स्वतंत्र अस्तित्व आणि ओळखही संपणार आहे. ती समुद्रमय होणार आहे. सहाजिकच ती, जंगल आणि गाव ओलांडणारे लांब वळणदार रस्ते आठवतेय… तिने सुजलाम सुफलाम केलेली वाटेतली शेती, झाडं आठवू लागली आहेत… तिने प्रवास केलेल्या आनंददायी वाटेकडे ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतेय….

    हेही वाचा – तुलना आणि मत्सर

    …आणि अचानक समोर तिला मोठा विस्तीर्ण असा अथांग महासागर दिसतोय. आता तिचा वेगच एवढा आहे की, त्या समुद्रात थेट प्रवेश करण्याशिवाय आणि कायमस्वरूपी अदृश्य होण्याशिवाय कोणताच पर्याय तिला उरलेला नाही.

    नदी पुन्हा वळसा घेऊन उगमस्थानापर्यंत वळून परत जाऊ शकत नाही. खरंतर, असं कोणीही परत जाऊ शकत नाही. असं सर्वोच्च टोकावर येऊन पुन्हा जन्मापर्यंत परत जाणे, ही या सृष्टीवरची अत्यंत अशक्य असलेली गोष्ट आहे. तिलाही ते अशक्य आहे. शेवटी नदीला महासागरात जाण्याचा धोका पत्करावाच लागतो. ती प्रवेश करते आणि तेव्हाच भीती नाहीशी होते! इथे येऊनच नदीला समजलेय, की माझं इथे येऊन अस्तित्व संपलेलं नाही… हा तर माझा खरा जन्म आहे. इथं आल्यामुळेच तर तिला समजलंय, की ती महासागरात नाहीशी होणार नव्हती, तर महासागर होणार होती!

    हेही वाचा – एकटं टाकून…


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    गणेशोत्सव अन् बालपणीच्या आठवणी

    September 28, 2026 ललित

    मॅग्नोलिया

    September 28, 2026 ललित

    Bookshelf : ‘पानिपत’… युद्धाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी कादंबरी

    September 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    गणेशोत्सव अन् बालपणीच्या आठवणी

    By हर्षा गुप्तेSeptember 28, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. वाजत गाजत बाप्पा आले… दीड दिवसांचे…

    मॅग्नोलिया

    September 28, 2026

    Bookshelf : ‘पानिपत’… युद्धाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी कादंबरी

    September 27, 2026

    निसर्गाचे संगीत

    September 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 सप्टेंबर 2026

    September 29, 2026

    गणेशोत्सव अन् बालपणीच्या आठवणी

    September 28, 2026

    मॅग्नोलिया

    September 28, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – अंतर्ज्ञान, अचानक धनलाभ

    September 28, 2026

    भय

    September 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुण ते कैसे किती, बांधती कवणे रीती

    September 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 451
    • अवांतर 214
    • आरोग्य 152
    • पंचांग आणि भविष्य 604
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 955
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 सप्टेंबर 2026

    September 29, 2026

    गणेशोत्सव अन् बालपणीच्या आठवणी

    September 28, 2026

    मॅग्नोलिया

    September 28, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.