Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, November 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 01 नोव्हेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 01 नोव्हेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 1, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 01 नोव्हेंबर 2026; वार : रविवार
    • भारतीय सौर : 10 कार्तिक शके 1948; तिथि : सप्तमी 14:51; नक्षत्र : पुष्य 28:30;
    • योग : साध्य 14:38; करण : बालव 25:57;
    • सूर्य : तुळ; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:37; सूर्यास्त : 18:06;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    भानुसप्तमी

    कालाष्टमी

    कराष्टमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर

    टीम अवांतर

    ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1918 रोजी अहमदनगर येथे झाला. मात्र त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. भावे स्कूलमध्ये शिकत असताना ते शिक्षकांच्या हुबेहूब नकला करायचे. एकदा ऐनवेळेस ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील ‘भद्रायू भाटकर’ हे पात्र शरद तळवलकर यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती.

    कॉलेजमध्ये गेल्यावर 1935 साली ‘रणदुंदुभी’ नाटकातील शिशुपालाची भूमिका करणारा कलाकार ऐन वेळी अडला. त्यावेळीही शरद तळवलकर यांनी आपल्या अभिजात कलागुणांनी त्या भूमिकेत कमालीचा रंग भरला. तेव्हापासून दरवर्षी कॉलेजच्या स्नेहसंमेलनातील नाटकांमध्ये त्यांना भूमिक  मिळावी यासाठी आग्रह धरला जाऊ लागला. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.

    हेही वाचा – शरीरात उष्णता अधिक आहे? हे घरगुती उपाय करून पाहा…

    नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्या पाहण्यात त्यातील एक भूमिका आली आणि ‘नाट्य विकास’ संस्थेत त्यांनी तळवलकरांना सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. नाटकात कामे करणे ही गोष्ट त्या काळात फारशी समाजमान्य नव्हती. त्यामुळे वडिलांनी नाटक कंपनीत जाण्यास विरोध केला. पण नाटकाच्या वेडापायी शरद तळवलकरांनी घर सोडले. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे मिलीटरी अकाउंट्समध्ये नोकरी करत त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली.

    ‘छापील संसार’ नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. 1952 साली गाजलेल्या ‘पेडगावचे शहाणे’ आणि ‘लाखाची गोष्ट’ या राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटांत त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. याशिवाय दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटात लक्षात राहण्याजोगी भूमिका मिळाली. तिथून सुरू झालेला त्यांचा अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता.

    नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. नटश्रेष्ठ बालगंधर्वांसोबत केलेल्या  ‘एकच प्याला’ नाटकात रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकातला ‘गोकर्ण’ शरद तळवलकरांनी आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केला.  ‘करायला गेलो एक’ या तुफान विनोदी फार्सने शरद तळवलकर यांचे नाव महाराष्ट्रभर गाजायला सुरूवात झाली.

    मराठी चित्रपट सृष्टीत राजा गोसावी यांच्याबरोबर ‘अवघाची संसार’, ‘दोन घडीचा डाव’ आणि ‘याला जीवन ऐसे नाव’ हे त्यांचे चित्रपट गाजले. या शिवाय भावबंधनमधील ‘कामण्णा’, ‘अपराध मीच केला’ मधील ‘गुप्तेकाका’, ‘दिवा जळू दे’मधील ‘गोळे मास्तर’ अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. ‘अप्पाजींची सेक्रेटरी’ आणि ‘सखी शेजारीण’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या; पण संपूर्ण नाटक पेलून धरणाऱ्या दमदार अशाच होत्या.

    पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील ‘नभोनाट्ये’ हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था देखील त्यांनी उभारली. ‘मुंबईचा जावई’, ‘धाकटी मेहुणी’, ‘आली अंगावर’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘गडबड घोटाळा’, ‘धुमधडाका’ यांसारख्या चित्रपटांमधील विनोदी भूमिका तर ‘एकटी’, ‘लेक चालली सासरला’, ‘अष्टविनायक’, ‘कैवारी’ या चित्रपटांतील चरित्र भूमिकाही त्यांनी अजरामर केल्या.

    हेही वाचा – एका मुठीतील आनंद…

    जावई विकत घेणे आहे आणि एकटी या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. याशिवाय नाट्यसृष्टीत अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या विष्णुदास भावे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 1992 साली वाशी येथे झालेल्या 72 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. गुदगुल्या आणि अनुभवाचे बोल ही त्यांची दोन पुस्तकेदेखील प्रकाशित झाली. प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी शरद तळवलकर यांच्या अभिनयाचे मार्मिक वर्णन करून ठेवले आहे. ते म्हणतात, “हा माणूस इतका साधा आहे की, यांच्या नावात काना, वेलांटी, उकार काहीच नाही हो.” जवळजवळ 60 वर्षे अभिनय करणाऱ्या या अवलियाचे 22 ऑगस्ट 2001 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑक्टोबर 2026

    October 31, 2026 पंचांग आणि भविष्य

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    By प्राजक्ता काथेNovember 1, 2026

    मेष : मोठ्या गुंतवणुकीची शक्यता या आठवड्यात नोकरदार जातकांना कामाचा ताण जाणवेल. काही जातकांना पगाराबरोबर…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑक्टोबर 2026

    October 31, 2026

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 01 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    मिता आवडत होती, पण…

    October 31, 2026

    तूप मेतकूट भात

    October 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 490
    • अवांतर 217
    • आरोग्य 167
    • पंचांग आणि भविष्य 657
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 263
    • मैत्रीण 34
    • ललित 1031
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.