Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, November 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 1, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Fifteen, पंधरावा अध्याय, अध्याय पंधरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप, पुरुषोत्तम योग
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय पंधरावा

    पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापें कुरोंडी । तैसी आणी गोडी । अक्षरांतें ॥11॥ सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥12॥ नादब्रह्म खुजें । कैवल्यही तैसें न सजे । ऐसा बोलु देखिजे । जेणें दैवें ॥13॥ श्रवणसुखाच्या मांडवीं । विश्व भोगी माधवीं । तैसी सासिने बरवी । वाचावल्ली ॥14॥ ठावो न पवता जयाचा । मनेंसी मुरडली वाचा । तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु ॥15॥ जें ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जें नागवे । तें अगोचर फावे । गोठीमाजीं ॥16॥ येवढें एक सौभग । वळघे वाचेचें आंग । श्रीगुरुपादपद्मपराग । लाहे जैं कां ॥17॥ तरी बहु बोलूं काई । आजि तें आनीं ठाईं । मातेंवाचूनि नाहीं । ज्ञानदेवो म्हणे ॥18॥ जे तान्हेनि मियां अपत्यें । आणि माझे गुरु एकलौतें । म्हणौनि कृपेंसि एकहातें । जालें तिये ॥19॥ पाहा पां भरोवरी आघवी । मेघ चातकांसी रिचवी । मजलागीं गोसावी । तैसें केलें ॥20॥ म्हणोनि रिकामें तोंड । करूं गेलें बडबड । कीं गीता ऐसें गोड । आतुडलें ॥21॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    अर्थ

    कोट्यावधी पूर्ण चंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावे, अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते ॥11॥ ज्याप्रमाणे सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे (ज्या दैवाच्या योगाने) वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते ॥12॥ ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते की, त्या व्याख्यानापुढे नादब्रह्म ठेंगणे होते (फार काय सांगावे) त्या व्याख्यानापुढे मोक्षसुद्धा तितका शोभत नाही. ॥13॥ श्रवणसुखाच्या मांडवामधे सर्व जगाला वसंतऋतूचा उपभोग घेता येईल, अशा प्रकारे व्याख्यानरूप वेली चांगली भरास येते. ॥14॥ ज्या देवाचा पत्ता लागत नाही, म्हणून मनासह वाचा परतते, असा जो देव, तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो (शब्दाने त्याचे वर्णन त्याला करता येते) हे केवढे आश्चर्य आहे! ॥15॥ जे ज्ञानाला कळत नाही व ध्यानासही सापडत नाही, असे जे निर्विषय ब्रह्म, ते त्याच्या बोलण्यात सापडते. ॥16॥ गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्या वेळी प्राप्त होतो, त्या वेळी (वर सांगितलेले) एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते. ॥17॥ तर या संबंधाने फार काय सांगू? आज ते दैव माझ्याशिवाय दुसर्‍या ठिकाणी नाही, असे ज्ञानदेव म्हणतात. ॥18॥ कारण की, मी श्रीगुरूंचे तान्हे मूल आहे आणि माझे गुरु एकपुत्री आहेत. म्हणजे माझ्या गुरूंना मी एकटेच मूल आहे. म्हणून त्यांच्या त्या कृपेला मी एकटा ठिकाण झालो. ॥19॥ पाहा, चातक पक्ष्याकरता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामग्रीची वृष्टी करतो, त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरता केले आहे. (त्यांनी आपल्या कृपेचा सर्व साठा माझ्यात ओतला.) ॥20॥ म्हणून माझे रिकामे (शास्त्र वगैरे न पढलेले) तोंड बडबड करू गेले, तर त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले. ॥21॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी

    October 31, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026 अध्यात्म

    गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    October 29, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी

    By Team AvaantarOctober 31, 2026

    अध्याय पंधरावा आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें । वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूचीं…

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    October 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें पैलपण जाये, भक्त हें ऐलपण ठाये

    October 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 01 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    मिता आवडत होती, पण…

    October 31, 2026

    तूप मेतकूट भात

    October 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 490
    • अवांतर 217
    • आरोग्य 167
    • पंचांग आणि भविष्य 657
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 263
    • मैत्रीण 34
    • ललित 1031
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.