Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एका मुठीतील आनंद…

    October 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी

    October 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑक्टोबर 2026

    October 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शर्वाय आणि आराध्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात…
    ललित

    शर्वाय आणि आराध्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात…

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यOctober 30, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, माधवचे कटकारस्थान, माधवला निशाची साथ, शर्वाय आराध्या विवाह, शर्वायला आराध्याची साथ, आनंदीला माधवची फूस, तन्वीची दुहेरी खेळी, माधवच्या कटात अज्ञात व्यक्ती
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 49

    दिवाकर एकटक त्या दोघांकडे पाहत होते. त्याच्या नजरेत काळजीही होती आणि एक हलकंसं समाधानही. बराच वेळ बोलणं झालं होतं. विषय गंभीर होते, पण दोघांची मानसिक तयारी पाहून त्याला हायसं वाटलं.

    ते थोडंसं हसत म्हणाले, “जाऊ द्या आता, खूप बोललात आज. थोडं विश्रांती घ्या. बाकी उद्याच उद्या पाहून घेऊ…”

    शर्वाय आणि आराध्या दोघंही उठले.

    शर्वाय म्हणाला, “गुडनाइट बाबा…”

    आराध्याही हसून म्हणाली, “शुभरात्री बाबा…”

    दिवाकर यांनी त्यांच्याकडे पाहत हलकेच मान डोलावली…

    ते निघाले… शांतपणे जाणाऱ्या त्या दोघांना दिवाकर एकटक पाहात राहिले. त्यांच्या मनात एक विचार उमटून गेला —

    “हे नातं आता फक्त योजना नाही. या दोघांच्या डोळ्यांत विश्वास आहे. उद्या काहीही होवो, ही साथ तुटू नये…”

    आकाशात चंद्र  डोकावत होता… त्या चांदण्यात शर्वाय आणि आराध्याची सावली एकत्र मिसळत चालली होती — भविष्याच्या अगदी उंबरठ्यावर…

    आराध्या सुमित्रा आजींच्या खोलीकडे वळली. आजी तिथे एकट्याच बसल्या होत्या. त्यांच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारून  मग झोपी जावं, असा तिचा मानस होता. आजींच्या खोलीच्या थोडंसं पुढे जात शर्वाय जिना चढण्याकरिता पायऱ्यांकडे वळला… वर पहिला मजला  जवळ जवळ त्याचा होता. पण जाताना त्याचं लक्ष मात्र आराध्याकडेच होतं…

    आराध्या आजींच्या खोलीत शिरताना थांबली, आणि नकळत मागे वळून पाहिलं — शर्वायचं लक्ष तिच्यावरच होतं हे तिला जाणवलं. दोघांच्याही नजरा क्षणभर भिडल्या…

    शर्वायने हलकंसं स्मित करत मान डोलावली…

    आराध्यानेही लाजून नजरेनेच “असं नका बघू…” असं हसून सांगितलं.

    या नजरेच्या भाषेत फार काही बोललं गेलं…

    कालच तर त्यांचं लग्न झालेलं, आता त्या नात्याच्या दुसऱ्याच  रात्री  ते  दोघं वेगवेगळ्या खोलीत जात होते. पण मनाच्या एका धाग्याने बांधले गेले होते — अदृश्य, पण अधिक घट्ट!

    आराध्या दाराशी उभी होती, सुमित्रा आजींनी तिला पाहिलं आणि गालातल्या गालात हसल्या…

    “अगं वेडे… इथे कुठे येतेस? तो असताना तरी त्याच्यासोबत राहायला हवं… जा, शर्वाय तुझी वाट बघत असेल….” बेडवर बसत त्या म्हणाल्या, “आता प्रत्येक क्षण नव्याने लिहायचा आहे, आराध्या. मागे काही राहिलं असेल, मनात काही उरलं असेल, तर तिथेच विसरून टाक. आजपासून तू केवळ आमची सून नाही, तर शर्वायच्या आयुष्याची खरी भागीदार आहेस.”

    हेही वाचा – माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    आराध्याच्या डोळ्यांत क्षणभर पाणी तरळलं. ती गप्प उभी राहिली. आजींनी तिचा हात हातात घेतला, थोडा वेळ थोपटलं तिला… आणि मग अगदी सहज बोलल्या —

    “जा आता… तो काही बोलत नसेल, पण आतून त्यालाही वाटत असेल… तुझी वाट पाहात असेल.”

    सुमित्रा आजींच्या डोळ्यांत मिश्किल चमक होती…

    “माझ्या नातवाला नाराज करू नकोस हं… नाहीतर मला तुला दमात घ्यावं लागेल!” असं म्हणत त्यांनी  आराध्याच्या पाठीवर थोपटलं.

    आराध्या थोडीशी धास्तावून मागे वळत म्हणाली, “पण आजी, कोणी पाहिलं तर?”

    आजी खळखळून हसल्या…

    “अगं वेडी… आता तू त्याची बायको आहेस! कोण पाहिलं, काय पाहिलं याची चिंता आता नको करत जाऊस. घरातले सगळे जाणतात… तू कोण आहेस? ….आणि जर कुणी टकमक पाहिलंच, तर फक्त एवढंच म्हण – सरांनी काम सांगितलं होतं…”

    आराध्या लाजून खाली पाहू लागली. ओठांवर नकळत हास्य फुललं… आराध्याने आजींना हळूच मिठी मारली. आजींच्या कुशीत क्षणभर विसावून ती दरवाज्याकडे वळली.

    “जा आता… वेळ वाया घालवू नकोस. तुझं आयुष्य तुझ्या दारात उभं आहे — उघड दार आणि थेट त्याच्या डोळ्यांत बघ…” असं म्हणत आजींनी हळूच तिच्या पाठीवर एक प्रेमळ थाप दिली.

    सुमित्रा आजींचं बोलणं ऐकून आराध्या थोडी सावरली…

    “सगळे नोकरचाकर झोपले असतील आता. पहाटेपर्यंत कुणी येणार नाही. शर्वाय इथे असताना कोणी त्याला डिस्टर्ब करत नाही, बरं का! ही वेळ तुमची आहे… घराच्या भिंती जरी जुने संदर्भ मांडत असल्या, तरी त्यांच्याही आत आज एक नवं नातं तयार झालंय. शर्वायच्या खोलीत तुझी पावलं पोहोचणं, हे आता कोणालाही अचंबा वाटण्यासारखं नाही.”

    आराध्याने एक दीर्घ श्वास घेतला. आजींच्या शब्दांत जी माया होती, तिनं तिच्या मनातल्या भीतीला घट्ट मिठी मारली होती.

    “जा… आणि यावेळी, मागे वळून पाहू नकोस,” असं आजींनी खोटं रागावल्यासारखं करत म्हटलं.

    नव्या नात्याच्या पहिल्या पावलांची चाहूल देत… ती शर्वायच्या खोलीकडे चालू लागली. आराध्या हसतच वळली… तिच्या पावलांचा आवाज हलका होता, पण हृदयातली धडधड मात्र स्पष्ट ऐकू येत होती.

    त्या रात्री, जुन्या वाड्याच्या त्या दगडी भिंतीही साक्षी होत्या… एका नव्याने फुलणाऱ्या प्रेमाच्या क्षणाची!

    आराध्या हलकेच वरच्या मजल्यावर गेली. अंगणात पसरलेल्या चंद्रप्रकाशाच्या सावल्या तिच्याबरोबर वर चढल्या. ती श्वास रोखून उभी राहिली – मनात हलकीशी भीती आणि ओलसर उत्सुकता होती…

    दार खरंच उघडंच होतं… हळूहळू पाय उचलत ती आत शिरली, आणि अलगद दार लावलं. दार बंद होताच, जणू वेळ थांबला…

    क्षणाचाही विलंब न करता, दोन मजबूत हातांनी तिच्या कमरेभोवती विळखा पाडला. पाठीवर श्वासांची उष्णता जाणवली.

    “अखेर आलीस…” शर्वायचा आवाज अलगद ओसंडत होता.

    आराध्याच्या शरीरात हळवं कंप पसरलं. ती काही बोलली नाही – फक्त डोळे मिटून त्या स्पर्शात विरघळली.

    “तुला वाटलं, मी झोपलो असेन का?” त्याने हसत विचारलं.

    “नाही…” ती कुजबुजली, “तुम्ही वाटच पाहात असाल,  पण बोलणार नाहीत, असं आजी म्हणाल्या…”

    आपल्याला कोणी पाहील… तुम्हाला त्रास नको… असंच वाटलं मला आणि म्हणून मघाशी आजींच्या खोलीत गेले…

    शर्वाय तिच्या केसांत हात फिरवत म्हणाला, “ही रात्र… फक्त आपली आहे आराध्या. आज माझं अस्तित्व, माझं घर, माझं मन – सगळं तुझं आहे.”

    दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळून गेले — आज शब्द अपुरे होते… फक्त स्पर्श बोलत होता…

    शर्वाय आणि आराध्या यांच्या एकत्र येण्याने त्या वाड्याच्या भिंतींनाही जणू स्नेहाचा श्वास मिळाला होता… वास्तूही आज भारावली होती – जणू अनेक वर्षं साठून राहिलेली एक ऊर्जा आज फुलून आली होती.

    शर्वायचा हात आराध्याच्या हातात होता, आणि त्या शांत, नीरव वातावरणातही त्यांच्या श्वासांमधील लय हवेमध्ये गुंजत होती. हवेत एक वेगळाच भाव जाणवत होता – ते त्यांच्या एकत्र येण्याचं केवळ सौंदर्य नव्हतं, तर त्या नात्यातील सच्चेपणा, समर्पण आणि आंतरिक विश्वासाचं प्रतिबिंब होतं. त्या रात्री चंद्रही जरा जास्त उजळ वाटत होता…

    हेही वाचा – माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?

    हो… त्यांच्या त्या एकत्र येण्याने, जणू काही दुष्ट शक्तीच्या नाशाचा आरंभ झाल्यासारखा भास होत होता. वर्षानुवर्षं साचलेली अनिष्ट ऊर्जा, वाड्याभोवती पसरलेली गूढ सावली… त्या सगळ्यांचं अस्तित्व त्या पवित्र मिलनासमोर क्षीण वाटत होतं.

    शर्वाय आणि आराध्या – दोन वेगळ्या विश्वातून आलेले, पण एकाच ध्येयाने जोडलेले. त्यांचं नातं केवळ प्रेमाचं नव्हतं – ते एका मोठ्या नियतीचं भाग होतं…

    वाड्याच्या अंगणात एक अलगच शांतता होती – ती वादळाआधीची नव्हती, तर वाईटावर मात करण्याची पूर्वनांदी होती. जणू कोणीतरी पुटपुटत होतं…

    “जिथे प्रेम असतं, तिथे अंधार फार काळ टिकू शकत नाही.”

    आणि आता प्रेम जागं झालं होतं.

    वाड्याच्या अंगणातल्या आंब्याच्या झाडावरून  पक्ष्याचा सूर भुरभुरत उतरला… आणि वाड्याच्या त्या जुन्या भिंतीतून पहाट जागी झाली. ती वाड्यातली पहिली पहाट होती – शर्वाय आणि आराध्याची – त्या वाड्यात, त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणारी.

    आराध्या हळूहळू जागी झाली. कपाळावर शीतल वाऱ्याचा स्पर्श जाणवत होता. खिडकीतून मोरपंखी प्रकाश खोलीत उतरला होता. पांघरूणातून बाहेर पडताना तिला शर्वायचा चेहरा दिसला – झोपेतही शांत, समाधानानं भरलेला!

    ती अलगद उठून  बाल्कनीकडे गेली. पहाटेचा सुगंध श्वासात भरून घेत म्हणाली, “ही पहाट अशीच असेल का रोज? कुठलीशी अनामिक ओढ, पण त्यात एक हळूवार शांतताही…”

    तेवढ्यात मागून शर्वायचा आवाज आला, “जर तू दररोज अशीच पहाट दाखवणार असशील, तर मी रोज उशिरा उठायचा निर्णय घेईन…”  म्हणत पाठून येत त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले.

    आराध्या हसली. ती वळली आणि म्हणाली, “माझ्या बॉस नवऱ्याला आता मला जागं करावं लागतंय… काय दिवस आले!”

    शर्वायने तिचा  हात हातात  घेत, तो तिला घेऊन खाली  निघाला…

    क्रमशः
    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    एका मुठीतील आनंद…

    October 31, 2026 ललित

    सत्याचा विजय होतोच, पण…

    October 29, 2026 ललित

    मानसची सहामाही आणि आईचे आजारपण…

    October 28, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    एका मुठीतील आनंद…

    By प्रणाली मंगेश महाशब्देOctober 31, 2026

    देण्याचा आनंद शिकवणारी एक हृदयस्पर्शी गोष्ट… एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे नाव…

    सत्याचा विजय होतोच, पण…

    October 29, 2026

    मानसची सहामाही आणि आईचे आजारपण…

    October 28, 2026

    मित्र आणि अध्यात्म

    October 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एका मुठीतील आनंद…

    October 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी

    October 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑक्टोबर 2026

    October 31, 2026

    शर्वाय आणि आराध्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात…

    October 30, 2026

    Recipe : विदर्भातील पारंपरिक पदार्थ गुळशेल!

    October 30, 2026

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 489
    • अवांतर 217
    • आरोग्य 165
    • पंचांग आणि भविष्य 655
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 263
    • मैत्रीण 34
    • ललित 1029
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एका मुठीतील आनंद…

    October 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी

    October 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑक्टोबर 2026

    October 31, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.