Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सत्याचा विजय होतोच, पण…
    ललित

    सत्याचा विजय होतोच, पण…

    ॲड. कृष्णा पाटीलBy ॲड. कृष्णा पाटीलOctober 29, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, ॲड कृष्णा पाटील, लेखक कृष्णा पाटील, वकील कृष्णा पाटील, सत्याचा विजय, जमिनीचा खटला, बरमू नाना, शिदा आप्पा, भूमीहीन शिदा आप्पा, कोर्टातील उलटतपासणी, शिदा आप्पाची उलटतपासणी
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    काल कोर्टात एक अजब किस्सा घडला. खरंतर, न्यायालयात असे अजब किस्से रोजच घडत असतात. कोर्टात कुणी खरं सांगत असतं आणि ते खोटं वाटतं. कुणी खोटं सांगत असतं आणि त्याच्या आवाजात एवढा आत्मविश्वास असतो, की क्षणभर खरं वाटतं. खरं काय आणि खोटं काय, याचाच संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे बरेच किस्से घडत असतात. पण काही किस्से असे असतात की, ते कोर्ट उठल्यानंतरही डोक्यातून जात नाहीत.

    हा त्यापैकीच एक.

    त्याचं झालं असं की, पाच-सहा वर्षांपूर्वी बरमू नाना माझ्याकडे आले होते. का? तर शिदा आप्पांनी त्यांच्याविरोधात कोर्टात दावा दाखल केला होता. दाव्याचं कारण विचित्र होतं. त्यांचेकडून बरमू नानांनी एक जमीन खरेदी घेतली होती. खरेदीखत झालं होतं. व्यवहार पूर्ण झाला होता. पण आता शिदा आप्पांचं म्हणणं होतं, ‘मी भूमीहीन झालो आहे.’ बरमू नानांनी त्यांची संपूर्ण मिळकत खरेदी केली होती. एक गुंठासुद्धा त्यांच्या नावावर उरला नव्हता. त्यामुळे कायद्यानुसार एखाद्याला भूमीहीन करता येत नाही आणि मी भूमीहीन झाल्यामुळे केलेलं खरेदीखत रद्द करून जमीन परत मिळावी, अशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती.

    बरमू नाना माझ्यासमोर शांत बसले होते. मी त्यांना विचारलं,

    “नाना, जमीन घेताना तुम्ही चौकशी केली होती का?”

    “केली होती.”

    “कुणाकडे?”

    “गावात. तलाठ्याकडे, सोसायटीत, आजूबाजूला… सगळीकडे.”

    मी पुन्हा विचारलं,

    “शिदा आप्पाकडे दुसरी जमीन आहे का?”

    नाना काही वेळ गप्प राहिले. त्यांनी डोक्यावरची टोपी काढली. डोकं खाजवलं.

    “नाही.”

    “तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे?”

    “हो.”

    “म्हणजे ते खरंच भूमीहीन झालेत?”

    नानांनी मान हलवली. पुन्हा डोक्यावर टोपी घातली…

    “हो. आता त्यांच्या नावावर काहीच जमीन नाही.”

    मी कागद बंद केला. क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं…

    “नाना, मग आपली बाजू फार मजबूत नाही.”

    नाना माझ्याकडे पाहत राहिले…

    “म्हणजे?”

    “दावा आपल्या विरोधात जाण्याची शक्यता जास्त आहे.”

    हेही वाचा – नातं भाऊ बहिणीचं…

    ते काही बोलले नाहीत. वर छताकडे पाहात राहिले. मी पुढे म्हणालो,

    “दावा उलटा गेला तरी आपण अपील करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी ना कधी जमीन शिदा आप्पाला परत द्यावी लागणार आहे.”

    नानांनी एक दीर्घ श्वास घेतला. हाताची बोटे चाळवत चाळवत म्हणाले,

    “वकीलसाहेब, तुमचं काम तुम्ही करा. पुढचं कसं असेल तसं असेल.”

    0000

    मी त्यांची मोडकीतोडकी बाजू कोर्टापुढे मांडली. मला तेव्हा कुठे ठाऊक होतं की, या मोडक्यातोडक्या बाजूच्या कुठल्यातरी कपारीत सत्याचा एक छोटासा तुकडा लपलेला आहे. पाच-सहा वर्षे गेली. केस बोर्डावर आली. शिदा आप्पांचा उलटतपास सुरू झाला. साक्षीदाराच्या पिंजऱ्यात शिदा आप्पा उभे होते…

    उलटतपास घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते, काय विचारायचं यापेक्षा काय विचारायचं नाही, हे अधिक महत्त्वाचं असतं. कारण साक्षीदाराला तुम्ही जे विचारता, त्यापेक्षा तुम्ही त्याला कुठे घेऊन जाता, याला अधिक महत्त्व असतं.

    मी सुरुवात केली…

    “तुमचं शिक्षण किती?”

    “जुनी दहावी.”

    “गावच्या राजकारणात तुम्ही असता?”

    “नाही.”

    “कधीच नाही?”

    “नाही.”

    “अडचण आली की, कर्ज काढता?”

    “हो. लोकांकडून घेतो.”

    मी प्रश्न विचारत राहिलो. केसशी थेट संबंध नसल्यासारखे… शिदा आप्पा निर्धास्त होते. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. त्यांना वाटत होतं, वकीलसाहेब केस सोडून भलतेच प्रश्न विचारत आहेत. मग मी सहज विचारलं,

    “दोन वर्षांपूर्वी तुमची सोसायटी थकली होती?”

    शिदा आप्पांच्या चेहऱ्यावर क्षणभर सावली उमटली.

    “नाही.”

    “तुमच्यावर जप्ती आली होती?”

    “नाही.”

    “त्यामुळे सोसायटीतील सदस्यांबरोबर तुमची तक्रार झाली होती?”

    “नाही.”

    “त्यामुळे तुमची गावातील पतही कमी झाली होती?”

    “नाही साहेब, माझी सोसायटी कधीच थकली नव्हती.”

    “तुम्ही सोसायटी पूर्ण भरलेली होती?”

    “हो.”

    मी थांबलो.

    “किती रुपयांची होती?”

    “दीड लाख.”

    क्षणभर कोर्टात शांतता पसरली. शिदा आप्पांचे वकील चुळबुळ करू लागले. मी पुन्हा विचारलं,

    “दीड लाखांची?”

    “हो.”

    “आणि ती तुम्ही भरून टाकली?”

    “हो. मी लगेच भरली.”

    “म्हणजे सोसायटी काढली होती?”

    “हो.”

    “कशावर?”

    ते सहजपणे म्हणाले,

    “जमिनीवर.”

    बस्… माझ्यासाठी तेवढंच पुरेसं होतं. मी कागद बाजूला ठेवला. माझा उलटतपास संपला. शिदा आप्पा आनंदाने साक्षीदाराच्या पिंजऱ्यातून खाली उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांना काहीच कळलं नव्हतं. पण त्यांच्या वकिलांच्या चेहऱ्यावर मात्र अचानक काळजी पसरली होती.

    कोर्ट हॉलच्या बाहेर पडताच शिदा आप्पा आपल्या वकिलांना म्हणाले,

    “बरमू नानांच्या वकीलसाहेबांनी, केसमधलं काहीच विचारलं नाही. भलतंच काहीतरी विचारत होते.”

    शिदा आप्पांच्या वकिलांनी त्यांच्या कपाळावर हात मारला…

    “अहो! तुम्ही कोर्टात काय बोलला याची तुम्हाला कल्पना आहे का शिदा आप्पा?”

    “काय?”

    “तुम्ही म्हणता आहात की, दोन वर्षांपूर्वी तुम्ही दीड लाखांची सोसायटी काढली होती!”

    “हो. भरली ना मी!”

    “हो. पण काढली कुठून?”

    “जमिनीवरून.”

    “कुठल्या जमिनीवरून? तुम्ही भूमीहीन झाला आहात म्हणून हा दावा केला आहे ना?”

    शिदा आप्पा झटका बसल्यासारखे गप्प झाले. वकिलांनी त्यांच्याकडे पाहिलं…

    “तुमच्या नावावर दुसऱ्या गावात जमीन आहे ना? मग कसे भूमीहीन झालात?”

    शिदा आप्पांच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू विरलं. त्या क्षणी त्यांना कदाचित पहिल्यांदाच समजलं, वकिलाने प्रश्न सोडून काहीही विचारलं नव्हतं. तो प्रश्न म्हणजेच खरी वस्तुस्थिती होती.

    नंतर कागदपत्रं बाहेर आली. दुसऱ्या गावात शिदा आप्पांच्या नावावर दीड एकर जमीन होती. त्याच जमिनीवर त्यांनी सोसायटी काढली होती. म्हणजे ज्या माणसाने कोर्टात उभं राहून स्वतःला भूमीहीन घोषित केलं होतं, तो भूमीहीन नव्हताच. त्याच्या नावावर जमीन होती. त्याने त्या जमिनीवर आर्थिक व्यवहार केले होते… आणि त्या एका उत्तराने त्याने स्वतःच आपल्या दाव्याच्या पायाखालची जमीन काढून घेतली होती. कायदा कधी कधी मोठमोठ्या शब्दांत सत्य सांगत नाही. तो एखाद्या साध्या प्रश्नाच्या उत्तरातून ते उघड करतो.

    त्या दिवशी बरमू नानांचा दावा जिंकला. ज्या दाव्यात सुरुवातीपासूनच आपला पराभव होणार, अशी जवळजवळ खात्री होती, जिथे स्वतःच्या पक्षकारानेही समोरचा माणूस भूमीहीन असल्याचं मान्य केलं होतं, तिथे शेवटी निकाल बरमू नानांच्या बाजूने लागला.

    निकाल ऐकताना बरमू नाना माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यांत विश्वास नव्हता. आनंद होता. अगदी लहान मुलाला हरवलेली वस्तू अचानक सापडावी तसा! जमीन घेण्यासाठी पतसंस्थेचे घेतलेले कर्ज, पाइपलाइन करण्यासाठी केलेली साडेसहा लाखांची पदरमोड, वेळोवेळी शिदा आप्पाला केलेली परतावा नसलेली मदत, दाव्याची नोटीस आल्यापासून बायकोचे कमी झालेले जेवण, त्यांचे डोळे पाणावले… ते माझा हात हातात घेऊन म्हणाले,

    “वकीलसाहेब… तुम्ही तेव्हा म्हणाला होता ना, जमीन परत जाणार म्हणून?”

    मी हसलो…

    “नाना, तेव्हा तसं दिसत होतं.”

    “आणि आता?”

    मी म्हणालो, “आता दिसतंय की, जमीन कधीच जायची नव्हती.”

    नाना मोठ्याने हसले. त्यांच्या त्या हास्यात पाच-सहा वर्षांची जीवघेणी चिंता विरघळून गेली.

    हेही वाचा – अनोखे रक्षाबंधन

    0000

    समाजात वकिलांविषयी एक गंमत सांगितली जाते… “वकील खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करतात.”

    काहीजण तर म्हणतात, “वकिलांना खोटं बोलण्याचं लायसन्स मिळालेलं असतं.”

    पण कोर्टाच्या चार भिंतींच्या आत काम करणाऱ्या माणसाला माहीत असतं. वकिलाचं खरं काम खोट्याला खरं करणं नसतं. त्याचं काम असतं खोटं कुठं लपलंय, ते शोधणं आणि त्यासाठी कधी कधी त्याला केसच्या मध्यभागी असलेल्या मुद्द्यापासून दूर जावं लागतं. शिक्षण विचारावं लागतं… राजकारण विचारावं लागतं… कर्ज विचारावं लागतं… सोसायटी विचारावी लागते… जमीन विचारावी लागते… कधी एखादा निरर्थक वाटणारा प्रश्न विचारावा लागतो. कारण, साक्षीदाराचं एक उत्तर दुसऱ्या दरवाजाची किल्ली असू शकतं.

    कधी कधी तो दरवाजा उघडतो आणि आत सापडतं ते संपूर्ण सत्य असतं. त्या दिवशी शिदा आप्पांनी कोर्टात फक्त एका सोसायटीबद्दल उत्तर दिलं होतं. पण त्या एका उत्तराने हे सिद्ध केलं की, ते भूमीहीन नव्हते आणि बरमू नानांनी त्यांची जमीन वाचवली होती.

    मला मात्र त्या दिवशी पुन्हा एकदा जाणवलं की, वकिली ही केवळ कायद्याची पुस्तकं वाचण्याची कला नाही. ती माणसाला वाचण्याची कला आहे.

    शब्दांच्या आड दडलेलं मौन ऐकण्याची कला आहे… आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, साक्षीदाराला प्रश्न विचारताना त्याला काय माहिती आहे, यापेक्षा त्याला स्वतःला काय माहिती नाही, हे शोधण्याची कला आहे.

    बरमू नाना कोर्टातून बाहेर पडले. चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता. हातात विजयाचा निकाल होता… आणि माझ्या मनात मात्र एकच विचार घोळत राहिला. कधी ना कधी ‘सत्याचा विजय होतो’. परंतु सत्याचा विजय सहजासहजी होत नसतो, त्यासाठी सुद्धा प्रामाणिक कष्टाची गरज असते…!

    ॲड. कृष्णा पाटील

    मोबाइल – 9372241368

    Related Posts

    मानसची सहामाही आणि आईचे आजारपण…

    October 28, 2026 ललित

    मित्र आणि अध्यात्म

    October 28, 2026 ललित

    आगळ्यावेगळ्या जोशी आजी

    October 28, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मानसची सहामाही आणि आईचे आजारपण…

    By दीपक तांबोळीOctober 28, 2026

    भाग – 2 मानस हा सुभाष-सुनीताचा एकुलता एक मुलगा. दोघांच्या आशा, स्वप्नं सगळी मानसभोवती केंद्रित…

    मित्र आणि अध्यात्म

    October 28, 2026

    आगळ्यावेगळ्या जोशी आजी

    October 28, 2026

    चकवा

    October 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026

    तिची पेन्शन… स्वाभिमानाची नवी ओळख

    October 29, 2026

    सत्याचा विजय होतोच, पण…

    October 29, 2026

    गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    October 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 488
    • अवांतर 217
    • आरोग्य 165
    • पंचांग आणि भविष्य 654
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 34
    • ललित 1027
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.