Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बिस्किटं म्हणजे एका आरोग्यक्रांतीची चव!

    October 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें पैलपण जाये, भक्त हें ऐलपण ठाये

    October 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑक्टोबर 2026

    October 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आगळ्यावेगळ्या जोशी आजी
    ललित

    आगळ्यावेगळ्या जोशी आजी

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेOctober 28, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, सतीश बर्वे, लेखक सतीश बर्वे, जोशी आजी, सकारात्मक जोशी आजी, पॉझिटिव्ह विचारांची जोशी आजी, जोशी आजी आजोबा, वृद्धाश्रमातील जोशी आजी, वृद्धाश्रमातील जोशी आजोबा, चैतन्याचा झरा जोशी आजी, आगळ्यावेगळ्या जोशी आजी, Joshi aaji, Positive Thinking Joshi aaji
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या सारखा पहाटे साडेपाचला घड्याळाचा गजर वाजला. आज खरंतर सुट्टीचा दिवस होता. गजर बंद करून थोडं उशिराच उठायचं, असं मी मनात ठरवत असताना अचानक व्हॉट्स ॲप मेसेजची घंटा वाजली… चैतन्यचा, माझ्या जवळच्या मित्राचा सहा शब्दांचा मेसेज होता. तो वाचून माझ्या डोळ्यांवरची झोप एका क्षणात खाडकन उडाली. चैतन्यने मला कळवलं होते की,

    ‘जोशी आजी गेल्या. मला फोन कर…’

    मी घाईघाईत चैतन्यला फोन केला. तो पार कोलमडून गेला होता.

    “काल सकाळी अचानकपणे सगळा खेळ संपला आणि संध्याकाळी त्यांच्याच इच्छेनुसार बाहेरच्या कोणालाही न बोलवता आजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजोबा सध्या बोलण्याच्या स्थितीत नाहीत. मी पुढच्या आठवड्यात जाणार आहे त्यांना भेटायला…” एवढं कसंबसं बोलून तो बोलायचा थांबला. मी फक्त ‘बरं’ म्हटलं आणि फोन ठेवून दिला.

    महिन्याभरापूर्वी या जोशी आजी माझ्यासाठी अनोळखी होत्या. पण आमच्या ओळखीला कारणीभूत ठरला होता चैतन्य. दरवर्षी चैतन्य आपला वाढदिवस अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम इथे साजरा करतो. तिथे वास्तव्यास असलेल्या मंडळींसाठी खाऊ आणि उपयोगी वस्तू नेऊन त्यांच्यासोबत तो दिवस सत्कारणी लावायचा. यावर्षी त्याने आग्रहाने मला आपल्यासोबत नेले होते एका वृद्धाश्रमात. तिथेच मी पहिल्यांदा भेटलो होतो जोशी आजींना.

    मला चैतन्यसोबत बघून “अजून एका नातवाला सोबत आणलं,” असं म्हणून त्यांनी चैतन्यचे कौतुक केले होते. नाव काय रे तुझं? आजींनी मला विचारले…

    “मी अद्वैत. तुमच्याच सारखा जोशी आहे बरं का!” माझं आडनाव ऐकून आजींचे डोळे भरून आले, पण विषय बदलून त्यांनी मला ते जाणवू दिलं नाही. चैतन्य नंतर आश्रमाच्या चालकांना भेटायला गेला आणि आजींनी मला आश्रम दाखवायला म्हणून त्यांच्या सोबत नेले. एकेक करत आजी मला प्रत्येक वास्तूची ओळख करून देत होत्या. एकंदर 40 खोल्यांची उभारणी तिथे केली होती. किचन आणि डायनिंग हॉलची वेगळी इमारत होती. तिथे काम करणाऱ्या सेवक-सेविकांच्या खोल्या, वाचनालय,  छोटीशी व्यायामशाळा, गणपती मंदिर देखील तिथे होते. अवतीभवती पसरलेला बागबगीचा लक्ष वेधून घेत होता. सगळं बघितल्यावर आजी मला त्यांच्या खोलीमध्ये घेऊन गेल्या आणि जोशी आजोबांशी ओळख करून दिली.

    हेही वाचा – सदूकाका अन् मानाचा गणपती…

    इतक्यात एक सेवक माझ्यासाठी चहा घेऊन आला. तो पिता पिता मी आजींना सहज विचारलं की, “ते दोघे इथे का रहातात? यावर आजींनी सांगितलेली कथा नेहमीचीच होती. पण ते सांगताना आजींच्या चेहऱ्यावर किंचित देखील दुःख दिसले नाही. उलट त्यानंतर आजी जे भरभरून बोलल्या त्यात प्रचंड सकारात्मकता, आत्मविश्वास आणि जिद्द मला दिसली. कुठेही निराशेचा सूर तसूभरही आढळला नाही. प्राप्त परिस्थितीचा त्यांनी हसतहसत स्वीकार केला आणि इथे रहाणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याची दिशा बदलण्याचं काम त्या मनापासून करत होत्या.

    आम्हाला परत भारतात यायचं नाही, असं जेव्हा दोन्ही मुलांनी सांगितले, तेव्हा आजी आणि आजोबा डगमगले नाहीत. काही वर्षांपूर्वी त्यांचा जुना बंगला पाडून नवीन इमारत उभी राहिली, तेव्हा बिल्डरकडून आजोबांनी तीन फ्लॅट मागून घेतले होते. एक त्यांच्यासाठी आणि दोन दोन्ही मुलांच्या भविष्याची तरतूद म्हणून. पण जेव्हा दोन्ही मुलांनी त्यांचा निर्णय सांगितल्यावर आजोबांनी दोन फ्लॅट भाड्याने दिले आणि त्याच पैशात मुंबईमध्ये एकटं रहाण्याऐवजी या वृद्धाश्रमात रहाण्याचा निर्णय आजींनी घेतला. आजोबा सुरुवातीला नाराज होते, पण नंतर हळूहळू ते इथे रुळले. अधूनमधून चार दिवस आपल्या घरी रहाण्यासाठी त्यांनी आपलं रहातं घर भाड्याने दिले नव्हते.

    आजी म्हणजे उत्साहाचा धबधबा आणि सकारात्मक विचारांचं आकाश. इथे आल्यावर दुसऱ्याच महिन्यात आजींनी इथलं नकारात्मक,  निराश आणि दुःखी वातावरण बदलून टाकायला सुरुवात केली. इथे रहाणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील व्यथा आणि मरगळ दूर करण्यासाठी आजींनी खूप प्रयत्न केले आणि आजी इथे सगळ्यांना हव्याहव्याशा वाटायला लागल्या. व्यायाम, सगळ्यांना जमतील असे खेळ एकत्र येऊन खेळायला सुरुवात झाली. गाण्याच्या भेंड्या, चढाओढ, सुस्त आणि निद्रिस्त झालेल्या आत्मगुणांना सर्वांसमोर सादर करण्यासाठी आजींनी प्रत्येकाला प्रोत्साहित केले. बघता बघता त्या वृद्धाश्रमाची ख्याती दूरवर पसरत चालली. वृत्तपत्र आणि काही मनोरंजन वाहिन्यांवर आजींची मुलाखत देखील सादर झाली.

    बोलता बोलता आजींनी तिथे रहाण्यामागचं त्यांचा हेतू मला सांगितला…

    निवृत्ती शब्दाशी करूनी कट्टी

    करूया राहून गेलेल्या गोष्टी

    सर्वांना ठेवून आनंदी, तंदुरुस्त

    जगूया उरलेले आयुष्य मस्त…

    खरंच चैतन्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथे नंतर रंगलेला कार्यक्रम आणि सर्व उपस्थितांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद, उत्साह आणि समाधान बघून आजींनी सांगितलेला हेतू शंभर टक्के साध्य झाल्याचे मला मनोमन पटले.

    कार्यक्रम संपल्यावर मी आणि चैतन्यने जोशी आजी-आजोबांच्या आणि तिथे उपस्थित प्रत्येकाच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. आजींनी मला जवळ घेतलं तेव्हा मी अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. माझ्या पाठीवरून हात फिरवत त्या मला म्हणाल्या होत्या,

    “जरी वागलास तुझ्या मनासारखं

    नको ते जन्मदात्यांना दूर सारणं

    कारण प्रत्येकालाच जमत नाही

    जोशी आजी आजोबांसारखं बनणं…”

    हेही वाचा – काका मला वाचवा!

    त्या भारावलेल्या वातावरणातच आम्ही तिथून निघालो होतो. परतीच्या प्रवासाला आम्ही दोघेही चिडीचूप होतो. माझ्या डोळ्यांसमोर सतत जोशी आजींचा हसरा चेहरा येत होता. परदेशी वास्तव्यास असलेल्या दोन्ही मुलांनी भारतात परत येणार नाही, असं जेव्हा निक्षून सांगितलं, तेव्हा काय वाटलं असेल जोशी आजी-आजोबांना? ज्यांना खस्ता खाऊन वाढवलं, त्यांचेच नकार ऐकण्याची शिक्षा त्यांच्या प्राक्तनात का लिहिली होती परमेश्वराने? ज्यांना बोट देऊन उभं केलं शिक्षण देऊन मोठं केलं, त्यांच्या मुलांची बोटं धरण्याची संधी नियतीने का हिरावून घेतली असेल? एक ना अनेक प्रकारचे प्रश्न मनांत आले माझ्या. पण त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा निष्फळ प्रयत्न जोशी आजी-आजोबांनी कधीच केला नाही. उलट, पुढे वाढून ठेवलेलं कठीण आयुष्य एकमेकांना सोबत घेऊन जगण्याची जिद्द मनात बाळगणारे जोशी आजी-आजोबा म्हणूनच मला सर्वांपेक्षा वेगळे आणि जवळचे वाटले.

    0000

    चैतन्यबरोबर जोशी आजोबांना भेटायला जायचं निश्चित करून मी माझं आवरायला घेतलं कारण सुट्टी म्हणून घड्याळाचे काटे न देखल्यागत करणं मला शक्य नव्हते.

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    मानसची सहामाही आणि आईचे आजारपण…

    October 28, 2026 ललित

    मित्र आणि अध्यात्म

    October 28, 2026 ललित

    चकवा

    October 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मानसची सहामाही आणि आईचे आजारपण…

    By दीपक तांबोळीOctober 28, 2026

    भाग – 2 मानस हा सुभाष-सुनीताचा एकुलता एक मुलगा. दोघांच्या आशा, स्वप्नं सगळी मानसभोवती केंद्रित…

    मित्र आणि अध्यात्म

    October 28, 2026

    चकवा

    October 27, 2026

    फादर्स डे

    October 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बिस्किटं म्हणजे एका आरोग्यक्रांतीची चव!

    October 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें पैलपण जाये, भक्त हें ऐलपण ठाये

    October 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑक्टोबर 2026

    October 29, 2026

    मानसची सहामाही आणि आईचे आजारपण…

    October 28, 2026

    मित्र आणि अध्यात्म

    October 28, 2026

    घराचे मुख्य प्रवेशद्वार, पितृपद आणि दरवाजाचा रंग

    October 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 486
    • अवांतर 217
    • आरोग्य 165
    • पंचांग आणि भविष्य 652
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 33
    • ललित 1026
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बिस्किटं म्हणजे एका आरोग्यक्रांतीची चव!

    October 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें पैलपण जाये, भक्त हें ऐलपण ठाये

    October 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑक्टोबर 2026

    October 29, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.