Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    October 23, 2026

    Recipe : मेथी आणि तुरीच्या ओल्या दाण्यांची भरडा भाजी!

    October 23, 2026

    अकल्पित अद्भुत अष्टम भाव

    October 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता
    ललित

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    हेमा पाटीलBy हेमा पाटीलOctober 23, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, हे बंध रेशमाचे, हेमा पाटील, लेखिका उमा पाटील, उमाची सासू पारूबाई, उमाचे बाळंतपण, उमाचे पहिले बाळंतपण, जावई महेशराव, कौटुंबिक कथा, पहिलटकरीण उमा, वंदनाचे बाळंतपण, वंदूला दुसरी मुलगी, वंदनाचे सासर नाराज, शरयूचे प्रश्न, शरयूचे दु:ख,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 18

    घरी गेल्यावर तिने आईला सांगितले की, ती शरयूला घेऊन आली आहे. तिच्यासाठी पण जेवण बनव. त्यानंतर ती शरयूशी खेळत बसली. बोलता बोलता शरयूला तिने विचारले,

    “तुला कोण आवडतं जास्त? आई की बाबा?” यावर तिने जे उत्तर दिले ते ऐकून उमाच्या काळजात कालवले.

    “मला बाबा जास्त आवडतात आईपेक्षा, पण ते आलेच नाहीत बाळाला बघायला. त्यामुळे मी त्यांच्याशी कट्टी करणार आहे. बाळाला नाही, पण मला तरी भेटायला यायचं ना त्यांनी! किती दिवस झाले आम्ही इकडे आलोय, एकदाही भेटायला आले नाहीत. मला त्यांची आठवण येते.”

    त्या लहानग्या जीवाला कुठले जगाचे व्यवहार कळायला! तिने त्या बालजीवाला आपल्या छातीशी धरले. ती म्हणाली, “अगं बाबांना कामं असतात. त्यांनी नोकरी केली नाही, तर कसे चालेल? त्यांचा साहेब त्यांना सुट्टी देत नाही म्हणून ते आले नाहीत. सुट्टी मिळाली की ते नक्की तुला भेटायला येतील बघ.”

    “खरंच? मग मी नाही करणार त्यांच्याशी कट्टी. मावशी तू कित्ती छान आहेस.” तेवढा दिलासा मिळाला तर, तो बालजीव किती खुलला. कधी कधी खोट्याचा आधार घेणे आवश्यक असते.

    उमाने तिला स्वतःच्या हाताने जेवायला घातले. तिला भरविताना, तिच्याशी गप्पा मारताना उमाला आनंद मिळत होता. निष्पाप असणाऱ्या त्या बालजीवाने एक प्रश्न विचारला तो ऐकून उमा हतबुद्ध झाली…

    “मावशी तुझ्या पोटात पण बाळ आहे ना? तुला पण मुलगी झाली, तर तुझा नवरा पण येणार नाही का बाळाला भेटायला?”

    यावर काय उत्तर द्यायचे उमाला कळेना.

    हेही वाचा – सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    “असे काही नसते गं. तुला मगाशीच सांगितले ना, कामात असल्यामुळे तुझे बाबा भेटायला आले नाहीत म्हणून. चल मी आता जेवते. तोपर्यंत या पाटीवर एक, दोन गिरवत बस…” असे म्हणत उमा जेवायला उठली.

    आत जेवताना ती गप्प गप्प आहे हे पाहून आईने विचारले,

    “न्हाय आला ना अजून बी वंदूचा नवरा?” तिने आईकडे बघितले आणि नकारार्थी मान हलवली. उमाच्या मनात शरयूच्या प्रश्नामुळे विचारांचे आवर्त सुरू झाले होते, त्यात ती गुरफटून गेली होती. आपल्या बाबतीतही मुलगी झाल्यावर असेच होईल का? हा प्रश्न तिचे काळीज कुरतडू लागला.

    उमाने कसेतरी चार घास खाल्ले आणि ती पुन्हा शरयूपाशी आली.

    “तुला आईकडे सोडू? की आज तू मावशीपाशी झोपणार आहेस?”

    “मला आईकडे जायचे आहे. छोटी आईला जेवू देत नाही, मग मी तिच्याजवळ खुळखुळा वाजवत बसते आई जेवेपर्यंत. मी ताई आहे ना तिची.”

    हेही वाचा – वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    “बरं बरं, चल सोडते तुला,” हे ऐकून आई म्हणाली, “थांब तू जाऊ नगंस. वसंता, जा रं त्या पोरीला सोडूनशान यं.”

    दादा तिला सोडायला निघाला तशी उमाने शरयूला सांगितले, “तू शहाणी मुलगी आहेस ना, आईला त्रास द्यायचा नाही बरं का! छोटीची काळजी घ्यायची.”

    “हो मावशी.” असे म्हणत तिने पळत दादाच्या हाताला धरले. उमाकडे वळून तिला टाटा केला आणि आईच्या ओढीने घराकडे निघाली. पाठमोऱ्या शरयूकडे पाहत ती बराचवेळ तिथेच उभी होती. त्या जीवाला पडलेल्या प्रश्नांनी तिचे अंतरंग ढवळून निघाले होते.

    क्रमश:
    Avatar photo
    हेमा पाटील

    मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.

    Related Posts

    ‘म्युट’ नवरा

    October 22, 2026 ललित

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026 ललित

    एन्ट्री आणि एक्झिट…

    October 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ‘म्युट’ नवरा

    By तृप्ती देवOctober 22, 2026

    कधी कधी मला खरंच वाटतं – याच्या आईने याला नऊ महिने पोटात फक्त ‘शांत’ राहायला…

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026

    एन्ट्री आणि एक्झिट…

    October 21, 2026

    संपला गं नवरात्रौत्सव!

    October 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    October 23, 2026

    Recipe : मेथी आणि तुरीच्या ओल्या दाण्यांची भरडा भाजी!

    October 23, 2026

    अकल्पित अद्भुत अष्टम भाव

    October 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मोहाचां अवसरीं, ज्ञानाची चाड न धरी

    October 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 ऑक्टोबर 2026

    October 23, 2026

    ‘म्युट’ नवरा

    October 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 480
    • अवांतर 217
    • आरोग्य 162
    • पंचांग आणि भविष्य 643
    • फिल्मी 75
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 32
    • ललित 1011
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    October 23, 2026

    Recipe : मेथी आणि तुरीच्या ओल्या दाण्यांची भरडा भाजी!

    October 23, 2026

    अकल्पित अद्भुत अष्टम भाव

    October 23, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.