Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026

    कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा

    October 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…
    ललित

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    हेमा पाटीलBy हेमा पाटीलOctober 16, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, हे बंध रेशमाचे, हेमा पाटील, लेखिका उमा पाटील, उमाची सासू पारूबाई, उमाचे बाळंतपण, उमाचे पहिले बाळंतपण, जावई महेशराव, कौटुंबिक कथा, पहिलटकरीण उमा, वंदनाचे बाळंतपण, वंदूला दुसरी मुलगी, वंदनाचे सासर नाराज,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 17

    सकाळी उठल्यावर उमा शेताकडे निघाली. आईला न सांगताच ती बाहेर पडली. फर्लांगभर अंतरावर असलेल्या बाभूळटेकात ती पोहोचली आणि थेट बिब्ब्याच्या झाडाकडे गेली. झाडांवर अजूनही काही बिब्ब्या शिल्लक होत्या. पक्ष्यांनी बिया खाल्ल्याने झाडाखाली बिब्बे पडले होते. पानांमधून अधूनमधून पिवळी रशरशीत फळे दिसत होती. ते पाहून तिला आनंद झाला.

    घरी परत आली, तर आई ओरडली. रानातून फिरून आले, असे सांगितल्यावर आणखी रागावली.

    “अशा अवघडलेल्या बाईनं जाऊ नयी कुटं. जागा खराब आस्ती…” हे ऐकून तिच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे आपल्या काळजीपोटी आई आपल्याला कुठे जाऊ देत नाहीय. आईची अशी काळजी घेणे पाहून ती सुखावली.

    तिला आठवण झाली म्हणून तिने आईला विचारले,

    “आई, वंदना बाळंत झाली असेल ना! वंदूला काय झाले गं?”

    “दुसरी पन पोरगीच झाली.”

    वंदूला दुसरी पण मुलगीच झाली. हे ऐकून उमाला तिचा आणि वंदूचा मध्यंतरी झालेला संवाद आठवला.

    “कुठं आहे वंदू?”

    “इथंच हाय की… कुटं जाणार?”

    ती म्हणाली, “मला चहा दे लवकर. मी जाते वंदूला भेटायला.”

    ती वंदूच्या घरी आली, तर शरयू बाहेर अंगणात खेळत होती. तिने शरयूच्या हातात बिस्किटचा पुडा ठेवला. शरयू हरखली. तिने शरयूला जवळ घेतले आणि म्हणाली,

    “आई कशी आहे गं? आणि छोटं बाळ कसंय?”

    “छान आहे मावशी, पण ते बाळ सारखंच झोपतं. आई माझ्या मांडीवर देतच नाही, सारखी स्वतःच घेऊन बसते. मला पण आता मांडीवर घेत नाही. मी आपली एकटीच बसते खेळत…” त्या बालजीवाने आपली व्यथा मांडली.

    “आता मी घरी जाताना तुला माझ्यासोबत घरी घेऊन जाते. मी खेळीन तुझ्याशी. चालेल?”

    शरयूला झालेला आनंद तिच्या डोळ्यांत दिसला. ती पळतच आत गेली आणि आईला म्हणाली,

    “आई, आई मी मावशीकडे जाणार आहे. मावशी मला न्यायला आली आहे…” तिच्या पाठोपाठ उमा खोलीत शिरली. उमाला पाहून वंदूला आनंद झाला.

    “कधी आलीस गं? बरी आहेस ना?”

    “परवा आले. सकाळी आईने सांगितले म्हणून आले तुला भेटायला.”

    बाळ झोपले होते, त्यामुळे दोघींचे बोलणे सुरू झाले.

    हेही वाचा – सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    “दाजी आले होते का बाळाला बघायला?” तिने हा प्रश्न विचारला आणि वंदूच्या डोळ्यांना धारा लागल्या. उमा उठून तिच्याजवळ गेली आणि तिचे डोळे पुसत तिचे सांत्वन करू लागली. तेवढ्यात वंदूची आई उमासाठी चहा घेऊन आली. वंदूला रडताना पाहून म्हणाली,

    “हजारदा सांगिटलंया रडायचं न्हाई म्हनून. रडून काय फरक पडनार हाय का? यकदा शरीरात वात शिरला, तर तुलाच निस्तराय लागंल. ना यिऊदे कुनी… आमी तर तुला टाकनार न्हाय. बाळातपन म्हंजी पुनर्जनम असतुया बाईचा. कुनाचा बी इचार करायचा न्हाय. उमा तू तरी सांग बया तुज्या मैतरनीला समजून.”

    तिने मान हलवली. विदूला आलेला उमाळा जरा कमी झाला होता. आईने तिच्या हातात चहाचा कप ठेवला आणि दुसरा कप उमाला दिला. वंदूच्या शेजारी बसत उमाने चहाचा कप तोंडाला लावला. तिला हळूवार शब्दांत समजावत उमा तिच्याशी बोलत राहिली. वंदूचा हात हातात घेऊन ती प्रेमाने म्हणाली,

    “आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. तुझ्या सासरची माणसं आली नाहीत तरी, हरकत नाही. तू पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न कर, तुला नोकरी लागेल. हिरकणी आपल्या बाळासाठी एवढा अवघड गड उतरून गेली, मग तू का करू शकणार नाहीस? सासरच्या माणसांचा विचार डोक्यातून काढून टाक. तुझ्या आणि मुलींच्या भविष्याचा विचार करायचा आता.”

    हे ऐकून वंदू जरा शांत झाली. थोड्यावेळाने बाळ जागे झाले म्हणून वंदूने तिच्या मांडीवर दिले.

    “नको नको, मला सवय नाही एवढ्या छोट्या बाळाला घेण्याची…” उमा म्हणाली.

    “आता स्वतःचं येईल पंधरा दिवसांत, मग ते कोण घेणार आहे मांडीवर?”

    हेही वाचा – सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    वंदुचे हे बोलणे ऐकून ती खुदकन हसली. बाळाकडे कुतुहलाने पाहू लागली. ते बाळाचे छोटे छोटे हात, पाय, डोक्यावरचं भरगच्च जावळ पाहून तिला छान वाटले. तिने बाळाची बंद मूठ उघडण्याचा प्रयत्न केला, पण बाळ पुन्हा मूठ आवळत होते. बाळाकडे पाहून उमा म्हणाली,

    “नक्षत्रासारखी आहे पोर. तिच्याकडे नीट लक्ष दे. सारखी रडतच बसू नकोस. समोर आलेल्या परिस्थितीला स्वीकारून पुढे चालायचे. हार मानायची नाही.”

    हे ऐकून वंदूने मान हलवली. बाळाकडे पाहत उमा म्हणाली,

    “बाळाची आई जरा वेडीच आहे ना? समजतच नाही तिला. जरा माझ्याकडं बघ म्हणावं. मी कशी हसते तशी हसत रहा.”

    हे ऐकून वंदू हसली. बाळाला तिच्याकडे देऊन उमा परत निघाली. शरयू तिची वाटच पाहत होती. उमा तिच्या आज्जीला सांगून शरयूला घेऊन तिथून निघाली.

    क्रमश:
    Avatar photo
    हेमा पाटील

    मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.

    Related Posts

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026 ललित

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026 ललित

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    By प्रणाली वैद्यOctober 16, 2026

    भाग – 47 आनंदी  उसनं हसून म्हणाली… “काय गंमत आहे शर्वाय, इतका लगेच होकार दिलास? आधी…

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026

    कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा

    October 16, 2026

    पत्रिकेतील ग्रह आणि वास्तू

    October 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बुद्धि मेचवेना धोंडीं, हा ठायवरी मवाळें सांडी

    October 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 ऑक्टोबर 2026

    October 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 472
    • अवांतर 217
    • आरोग्य 159
    • पंचांग आणि भविष्य 632
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 996
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026

    कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा

    October 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.