Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अहंकार

    October 20, 2026

    नाते

    October 20, 2026

    फक्त पोटच्या लेकरासाठी…

    October 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, October 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 ऑक्टोबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 ऑक्टोबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 20, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 20 ऑक्टोबर 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 28 आश्विन शके 1948; तिथि : नवमी 12:49; नक्षत्र : श्रवण 18:00;
    • योग : शूल 24:48; करण : तैतिल 25:35;
    • सूर्य : तुळ; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:33; सूर्यास्त : 18:13;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    महानवमी

    दसरा / विजयादशमी

    विजय मुहूर्त दु. 02:19 पासून 03:05 पर्यंत

    साईबाबा पुण्यतिथी उत्सव- शिर्डी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    गुजराती कादंबरीकार, कवी आणि विचारवंत गोवर्धनराम त्रिपाठी

    टीम अवांतर

    युगप्रवर्तक गुजराती कादंबरीकार, कवी आणि  विचारवंत गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1855 रोजी नडियाद येथे झाला. त्यांचे शिक्षण आधी नडियाद आणि नंतर मुंबई येथे झाले. 1875 साली ते एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी. ए. झाले. 1883 मध्ये ते एल्एल्. बी. झाले आणि 1884 सालापासून त्यांनी मुंबईत आपला वकिली व्यवसाय सुरू केला; मात्र त्यात त्यांचे मन रमले नाही. वयाच्या 43 व्या वर्षी भरभराटीत असलेला आपला वकिली व्यवसाय सोडून ते नडियादला आले आणि त्यांनी स्वतःला साहित्यसेवेसाठी संपूर्णपणे वाहून घेतले.

    गुजराती साहित्यातील दलपत–नर्मद यांच्या सुधारक युगानंतरच्या पंडित युगाचे प्रतिनिधित्व करणारे गोवर्धनराम त्रिपाठी हे श्रेष्ठ लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी संस्कृतिचिंतन तसेच साहित्यसेवा यांसाठी आपले जीवन वेचले. विद्यापीठाच्या उच्च शिक्षणातील संस्कृताध्ययन, रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांनी केलेली धर्मजागृती, राष्ट्रीय आंदोलनामुळे निर्माण झालेली राष्ट्रीय अस्मिता तसेच न्यायमूर्ती तेलंग यांच्या वैचारिक प्रभावातून गोवर्धनराम यांचा पिंड तयार झाला होता.

    हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सार्वजनिक मत, संवाद

    गुजराती साहित्यात अढळ स्थान प्राप्त करणारी सरस्वतीचंद्र ही 4 भागांमधील त्यांची बृहत् कादंबरी युगप्रवर्तक मानली जाते. ह कादंबरीत त्यांनी भारतीय जीवनाचे साकल्याने दर्शन घडविले आहे. विविध भारतीय भाषांत तिची भाषांतरे झाली असून तिच्यावर हिंदीत चित्रपटही निघाला.

    स्नेहमुद्रा  हे 110 कडव्यांचे त्यांचे प्रदीर्घ काव्य आहे. त्यांच्या पत्नीचा झालेला मृत्यू या काव्य निर्मितीचे निमित्त असली, तरी कवीने स्वतंत्र काव्यकथा कल्पून प्रणयाच्या स्थूल आणि सूक्ष्म अंगोपांगांची प्रत्ययकारी वर्णने तसेच मीमांसा या काव्यात केलेली आहे. लीलावती जीवनकला ही गोवर्धनरामांनी लिहिलेली स्वतःच्या मृत कन्येची जीवनकथा असून, त्यात व्यक्तीदर्शनापेक्षा चिंतनाचा भाग अधिक आहे. याशिवाय ‘नवल ग्रंथावलि’मध्ये नवलराम यांच्या ग्रंथांचे संकलन आणि चरित्र तर दयारामनो अक्षरदेह मध्ये भक्तकवी दयाराम यांचे व्यक्‍तिमत्त्व आणि वाङ्मय यांबाबतचे त्यांचे अध्ययन ग्रंथित आहे.

    क्‍लासिकल पोएट्स ऑफ गुजरात हा इंग्रजी भाषेतील त्यांचा ग्रंथ आहे. शिवाय स्वतःच्या खाजगी जीवनाचे चिंतनपूर्ण सार त्यांनी इंग्रजीत लिहिलेल्या स्क्रेपबुक ह्या दैनंदिनीत आले आहे.  क्षेमराज अने साध्वी, सरस्वती अने माया ही त्यांची दोन अपूर्ण नाटके होत. पाश्चात्य हास्यरस, वडनगरानागर ब्राह्मणोनी वंशावळी, सती चुनी कविता, काव्य अने कवी ए विषये मिताक्षर’, ‘आध्यात्मिक कवि अने तेनी कविता’ इ. बरेचसे त्यांचे लेखन असून त्यातील काही अद्यापही अप्रकाशित आहे.

    गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्षपद 1905 मध्ये भूषविण्याचा पहिला मान त्यांना देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. 4 जानेवारी 1907 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज एखादी चांगली बातमी तुमच्या जुन्या चिंता दूर करून तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते. संततीच्या शिक्षणाबद्दल किंवा करिअरबद्दल चिंतित असाल तर ती चिंता देखील दूर होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे काम तुमच्या वरिष्ठांना आवडू शकते आणि तुम्हाला प्रशंसाही मिळू शकते. पण अहंकार यशाच्या आड येणार नाही याची काळजी घ्या.  नम्रता, समजूतदारपणा आणि शांत स्वभाव यांची आज गरज भासेल. आरोग्याबाबतही निष्काळजीपणा दाखवू नका.

    वृषभ – आजचा दिवस सुख, आनंद आणि चांगल्या बातम्या घेऊन येणारा असेल! नोकरीच्या शोधात असणाऱ्या जातकांसाठी एक नवीन संधी निर्माण होईल. आर्थिक बाबींमध्ये तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात. मात्र अनोळखी व्यक्तीच्या गोड शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. सासरच्या मंडळींसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, परंतु तुमचा संयम नात्यांवर कोणताही परिणाम होऊ देणार नाही.

    मिथुन – आज कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. घाईघाईत केलेली गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतो. महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागला तर या प्रवासातून उपयुक्त माहिती मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुम्हाला पाठिंबा देतील. भूतकाळातील एखादी चूक किंवा निर्णय याबद्दल चिंता करण्याऐवजी, त्यातून मिळालेले धडे लक्षात ठेवा. भागीदारीत असलेल्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आज उचललेले शहाणपणाचे एक पाऊल भविष्यात मोठे फायदे मिळवून देऊ शकते.

    कर्क – आज जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक चांगले होतील. त्यांना एखादी नवीन संधी मिळेल, त्यांचा आनंद संपूर्ण कुटुंबाला होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाहासंबंधीचे जुने अडथळे देखील दूर होण्याची शक्यता आहे. थोडक्यात म्हणजे, घरात चिंतेचे कारण ठरलेल्या गोष्टींमध्ये आता दिलासा मिळू शकतो. मात्र प्रत्येकावर अती विश्वास ठेवणे टाळा. आज तुम्हाला स्वतःच्या आवडीनिवडी, सुखसोयी आणि इच्छांवर खर्च करावासा वाटेल. बजेट लक्षात ठेवून स्वतःच्या आनंदासाठी खरेदी कराल.

    सिंह – आज, तुमचे व्यक्तिमत्व आणि कार्यनिष्ठा चर्चेचा विषय बनू शकतात. समाजात असो वा कामाच्या ठिकाणी, तुमची प्रतिष्ठा वाढत असल्याची आणि तुम्हाला आदर मिळत असल्याची चिन्हे दिसत आहेत. लोक तुमचे बोलणे गांभीर्याने घेतील आणि तुमच्या कामाचे कौतुकही करतील. मात्र एखाद्या महत्त्वाच्या करारात किंवा मोठ्या व्यवहारात शेवटच्या क्षणी अडथळा येऊ शकतो. अशा परिस्थितीत, घाबरून जाऊन आपला विचार बदलण्याऐवजी, संयम ठेवा.  गुंतवणुकीच्या बाबतीत उतावीळपणा करू नका. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच पाऊल उचला.

    कन्या – आज तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल. सरकारी योजना किंवा लाभांचा फायदा होण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही भविष्यासाठी बचत योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर संबंधित माहिती गोळा करून तुम्ही सकारात्मक पावले उचलू शकता. मात्र, शेजाऱ्यांशी किंवा आजूबाजूच्या लोकांशी वाद घालणे हे वेळ आणि शक्तीचा अपव्यय ठरू शकते. आज स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कुटुंबाचा पाठिंबा स्वीकारा आणि अनावश्यक गुंतागुंत टाळून पुढे वाटचाल करा.

    तुळ – बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या समस्या आज सुटू शकतात. ज्या जुन्या व्यवहाराची वाट पाहत आहात, तो पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि मनाला शांती मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे तुमचा उत्साह वाढवतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात, परंतु सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ते यशाच्या जवळ पोहोचतील. आज पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. जुनी कामे पूर्ण करण्यासोबतच, स्वतःच्या आरोग्याला आणि नात्यांना वेळ देणे देखील महत्त्वाचे आहे.

    वृश्चिक – आज आर्थिक व्यवहार करताना तारतम्य बाळगण्याची गरज आहे. घराच्या नूतनीकरणाशी किंवा सजावटीशी संबंधित काही कामे सुरू होतील. पण त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे आगाऊ नियोजन करणे उत्तम. कामातून आलेली एखादी चांगली बातमी तुमचा उत्साह वाढवू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते आणि पदोन्नतीची आशा अधिक दृढ होऊ शकते. घरगुती जबाबदाऱ्या, आर्थिक संतुलन आणि करिअरमधील महत्त्वाकांक्षा यांच्यात योग्य तो समतोल साधणे, हाच आजचा तुमचा खरा विजय असेल.

    हेही वाचा – बर्फाखालचे निळे भूत

    धनु – आज नशीबाची मोठी साथ मिळेल. मात्र यशाची गुरुकिल्ली घाईत नसून संयम आणि शिस्तीत आहे. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी, त्या निर्णयाच्या प्रत्येक पैलूचा काळजीपूर्वक विचार करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमची दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. घरातील प्रार्थना, भजन किंवा धार्मिक कार्यक्रमामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल. आज आत्मविश्वासाने पुढे जाल, पण प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाका.

    मकर – आज नवी आशा आणि भविष्याबद्दल नवीन उत्साह निर्माण होऊ शकतो. काहीतरी नवीन सुरू करण्याची किंवा वेगळ्या दिशेने जाण्याची कल्पना मनात रुजू शकते. तुमची बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी तुम्हाला संधी ओळखण्यास मदत करेल. मात्र काही गोंधळ कायम राहू शकतो आणि नेमकी कुठून सुरुवात करावी हे ठरवणे कठीण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. एकाच वेळी सर्व दिशांना धावण्याऐवजी, स्वतःचे प्राधान्यक्रम ठरवा. जेव्हा ध्येये स्पष्ट असतील, तेव्हा तुमची पावले योग्य दिशेने पडतील, ज्यामुळे नवीन संधी मिळवणे सोपे होईल.

    कुंभ – आज, तुमची दूरदृष्टी आणि तुमचा पुढाकार एका दीर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक समस्येचे निराकरण करण्यासाठी निर्णायक ठरू शकतो. मालमत्ता किंवा घराशी संबंधित एक आकर्षक संधी समोर येऊ शकते, मात्र स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचे आणि भविष्यातील गरजांचे मूल्यांकन नक्की करा. व्यावसायिक परिस्थिती कधी फायदेशीर तर कधी आव्हानात्मक असू शकते, परंतु तुमच्या व्यावहारिक दृष्टिकोनामुळे त्यावर मात करता येईल. आज, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि आपल्या प्रियजनांचा विश्वास टिकवून ठेवणे ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल.

    मीन – आज तुमच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी, स्वतःच्या शरीर संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. गरज असेल तेव्हा विश्रांती घ्या. व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये डोळे आणि कान उघडे ठेवा. स्थावर मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने असू शकते. जर एखादे कायदेशीर किंवा न्यायालयीन प्रकरण बऱ्याच काळापासून सुरू असेल, तर त्यात दिलासा मिळण्याची शक्यता असू शकते. मात्र कोणतेही महत्त्वाचे करार किंवा आश्वासने देण्यापूर्वी स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे समजून घ्या. आज अचूक माहिती आणि संयम तुम्हाला एका मोठ्या संधीचा फायदा घेण्यास मदत करू शकतात.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सार्वजनिक मत, संवाद

    October 19, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 ऑक्टोबर 2026

    October 19, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 18 ते 24 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सार्वजनिक मत, संवाद

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरOctober 19, 2026

    जीवनप्रवास उलगडणारे 100 ज्योतिषीय मार्गदर्शक सूत्रे – 79) प्रारंभिक प्रौढावस्था – शारीरिक तंदुरुस्ती ज्योतिषीय सिद्धांत…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 ऑक्टोबर 2026

    October 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 18 ते 24 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 18 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अहंकार

    October 20, 2026

    नाते

    October 20, 2026

    फक्त पोटच्या लेकरासाठी…

    October 20, 2026

    शितावरून भाताची परीक्षा

    October 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सत्त्वरजतमांचां, भेदीं पसरु कर्माचा

    October 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 ऑक्टोबर 2026

    October 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 476
    • अवांतर 217
    • आरोग्य 161
    • पंचांग आणि भविष्य 638
    • फिल्मी 75
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 1006
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अहंकार

    October 20, 2026

    नाते

    October 20, 2026

    फक्त पोटच्या लेकरासाठी…

    October 20, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.