दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 11 ऑक्टोबर 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 19 आश्विन शके 1948; तिथि : प्रतिपदा 21:30 ; नक्षत्र : चित्रा 22:32;
- योग : वैधृति 21:04; करण : किंस्तुघ्न 09:21;
- सूर्य : कन्या; चंद्र : कन्या 10:03; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:20;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
घटस्थापना
शारदीय नवरात्रारंभ
मातामह श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर
टीम अवांतर
अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी हैद्राबाद येथे झाला. त्यांचे मूळ गाव होते गोव्यातील पेडणी तर मूळ नाव होते रतन पेडणेकर. त्यांनी लहान वयातच भारतीय शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. 1935 मध्ये, रतन ऑल इंडिया रेडिओ (AIR) मध्ये रुजू झाल्या. तिथे त्यांनी रेडिओ नाटकांमध्ये काम केले. 1936 मध्ये, त्यांचे डॉ. शिरोडकर यांच्याशी लग्न झाले.
त्याच वर्षी, मृहणजे 1936 मध्ये त्यांच्या लग्नानंतर, हंस पिक्चर्स नावाच्या चित्रपट कंपनीतील भागीदारांपैकी एक असलेल्या पांडुरंग नाईक यांच्याकडून रतन यांना चित्रपटाची ऑफर मिळाली. अर्थात रतन यांनी सुरुवातीला ही ऑफर नाकारली, दुसरीकडे नाईक यांनी शिरोडकर यांच्या पतीला पटवून दिले की रतन यांनी चित्रपटात पदार्पण करावे.
हेही वाचा – सप्तधान्य अन् घटस्थापना
रतन यांनी 1938 मध्ये मास्टर विनायक यांच्यासोबत ‘ब्रह्मचारी ‘ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले. चित्रपटाचे लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांनी रतन यांच्या मोठ्या डोळ्यांना साजेसे असे त्यांचे नामकरण केले आणि त्यांची ‘रतन’ वरून ‘मीनाक्षी’ अशी ओळख बनली बदलले. या चित्रपटातील ‘यमुना जळी खेळू खेळ’ या गाण्यात त्या स्विमसूटमध्ये दिसल्याने त्याकाळी मोठी खळबळ उडाली होती, या त्यांच्या लूकमुळे परंपरावादी प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. एकीकडे गाण्यातील त्यांच्या दुहेरी वेणीच्या केशरचनेमुळे देखील त्यांना प्रसिद्धी मिळाली, मात्र पोशाखावरून जोरदार टीकेलाही त्यांना सामोरे जावे लागले. चित्रपटात स्विमिंग सूट घालणाऱ्या त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या
‘यमुना जळी’ हे गाणे स्वतः मीनाक्षी यांनी गायले होते आणि त्याकाळात ते खूप गाजले देखील. पुढे मीनाक्षी यांनी मास्टर विनायक यांच्यासोबत ब्रँडची बाटली, घर की रानी, अमृत, लपंडाव यांसारखे इतर अनेक चित्रपट केले. 1952 साली त्यांनी एका तेलगू चित्रपटात देखील काम केले. त्यानंतर गबन, मेरे हुजूर, पाकिजा यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी अभिनय केला.
हेही वाचा – बाई बाई… बाईपण
1950 ते 1975 या काळात ‘नूतन संगीत नाटक मंडळी’ द्वारे मराठी रंगभूमीवर ‘मृच्छकटिक’, ‘मानापमान’ आणि ‘एकच प्याला’ या संगीत नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. 70 च्या दशकाच्या मध्यंतरात त्यांनी चित्रपटातून अभिनय करणे बंद केले. त्यांनी एकूण 15 मराठी आणि 9 हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. तसेच 1950 ते 1975 या कालावधीमध्ये सुमारे 12 संगीत नाटकांमध्ये अभिनय केला.
या धाडसी आणि प्रभावशाली अभिनेत्रीने 3 जून 1997 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी आयुष्यातून एक्झिट घेतली. त्यांच्यानंतर त्यांच्या नाती नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर यांनी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री होत अभिनयाची परंपरा पुढे नेली. याशिवाय नम्रता शिरोडकर मॉडेल आणि फेमिना मिस इंडिया विजेती देखील होती.


