Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026

    सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    October 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 10, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 10 ऑक्टोबर 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 18 आश्विन शके 1948; तिथि : अमावस्या 21:19; नक्षत्र : हस्त 21:42;
    • योग : ऐंद्र 22:01; करण : चतुष्पाद 09:24;
    • सूर्य : कन्या; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:21;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    सर्वपित्री दर्श अमावस्या

    अमावस्या श्राद्ध

    अमावस्या समाप्ती रात्रौ 09:19

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    कामगार पुढारी श्रीपाद अमृत डांगे

    टीम अवांतर

    ज्येष्ठ साम्यवादी नेते आणि कामगार पुढारी श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1899 रोजी नासिक येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नासिक येथेच झाले. उच्च शिक्षणाकरिता ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात आले. विद्यार्थिदशेत त्यांनी चळवळीत भाग घेतला. महाविद्यालयात बायबलच्या सक्तीचा पठणास विरोध केला. गांधींच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी होण्याकरिता बी.ए.ला असताना महाविद्यालयीन शिक्षणास कायमचा रामराम ठोकला. पुढे ते राष्ट्रवादाकडून साम्यवादाकडे वळले आणि गांधी व्हर्सस लेनिन हे पुस्तक त्यांनी लिहिले.

    या पुस्तकाने मानवेंद्रनाथ रॉय यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले. साम्यवादी विचारांचा प्रचारार्थ त्यांनी सोशॅलिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र 1922 मध्ये सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी इंडियन सोशॅलिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. कानपूर-बोल्शेव्हिक कटात भाग घेतल्याच्या आरोपाखाली 1924 मध्ये त्यांना अटक होईपर्यंत हे वृत्तपत्र सुरू होते. या वृत्तपत्रामुळे मानवेंद्रनाथ रॉय यांनी चौथ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनास डांगे यांना चार्ल्स ॲश्ले यांच्यामार्फत नियंत्रण पाठविले; पण 1946 पर्यंत डांगे मॉस्कोला जाऊ शकले नाहीत.

    हेही वाचा – सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    डांगे मुंबईत कामगारांमध्ये काम करीत असत. 1924 मध्ये डांगे तुरुंगात गेले आणि 1927 मध्ये त्यांची सुटका झाली. नंतर 1926-27 या वर्षी मुंबईमध्ये कामगार चळवळींना जोर चढला. डांगे यांनी गिरणी कामगारांची संघटना उभी करण्यास प्रारंभ केला. साधारणपणे याच काळात डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले.

    चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी क्रांति हे मराठी साप्ताहिक काढले. 1928 मध्ये ते कलकत्ता येथील अखिल भारतीय कामगार व कृषी पक्षाच्या आधिवेशनास हजर राहिले. 1929 मध्ये त्यांना मीरत कटात सामील झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर 1935 मध्ये ते सुटले. या काळात ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती. मात्र डांगे पक्षाचा प्रसार आणि प्रचार गुप्तरित्या करीत असत. 1939 मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावरून गिरणी कामगारांचा प्रदीर्घ काळ संप चालविला. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.

    1943 मध्ये त्यांची सुटका झाली. त्यानंतर आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1946 मध्ये कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून आले. पुढे 1957 च्या निवडणुकीत त्याच पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडून गेले. 1945 मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनच्या कमिटीवरही त्यांची निवड झाली. त्यांनी 1946 मध्ये यूरोपचा दौरा करून मॉस्को, लंडन, पॅरिस, वगैरे शहरांना भेटी देऊन तेथील कामगार नेत्यांशी चर्चा केली. लोकसभेत एक निर्भिड व सडेतोड संसदपटू म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळविली.

    याशिवाय ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील सहभागी झाले,  गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते. 1964 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष झाले. प्रथमपासून त्यांचा साम्यवाद रशियानुकूल असल्यामुळे चीन–रशिया वैचारिक संघर्षात त्यांनी रशियाची बाजू घेतली.

    त्यांचा साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांसारख्या विषयांचा सखोल अभ्यास होता. शिवाय त्यांनी वैचारिक ग्रंथ आणि  स्फुटलेखन यांचे देखील लेखन केले. इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, व्हेन कम्युनिस्ट डिफर  ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध झाली. मराठीत त्यांनी अंमळनेरच्या हत्याकांडाची भाषणे, बारा भाषणे, इतिहास कोण घडवतो, गाडगीळ आणि भारतीय लोकशाहीचे अर्थशास्त्र ही पुस्तके लिहिली.

    1974 साली त्यांचा अमृतमहोत्सव साजरा झाला. या प्रसंगी सोव्हिएट रशियाने आपले सर्वोच्च ‘लेनिन पदक’ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. या प्रसंगी त्यांच्याविषयी एक स्मरणिका आणि गौरवग्रंथ देखील प्रसिद्ध करण्यात आला. बल्गेरियन सरकारतर्फे ‘दिमित्रो लॅरिट’ हा पुरस्कार त्यांना  देण्यात आला. अशा या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे 22 मे 1991 रोजी मुंबईमध्ये निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल, तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतील आणि भागीदारीत असलेल्यांसाठी आजचा दिवस विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. गरजूल मदत केल्याने तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल. हरवलेली, तुमची आवडती वस्तू सापडण्याचीही शक्यता आहे. दिवसाच्या शेवटी, धार्मिक किंवा आध्यात्मिक वातावरणात रमल्याने मनाला गहन शांती मिळेल.

    वृषभ – आज सावधगिरी आणि शहाणपणाने पुढे जा. तुमच्याशी चांगले वागणाऱ्या प्रत्येकाच्या मनात तुमचे हित असेलच असे नाही, म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आज मिळालेला एक छोटासा फायदासुद्धा भविष्यातील मोठ्या यशाचा पाया घालू शकतो. भूतकाळातील एखाद्या निर्णयाची आठवण तुम्हाला थोडे दुःख देऊ शकते, पण त्या अनुभवाने तुम्हाला अधिक शहाणे बनवले आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. आज फक्त दैनंदिन कामावर लक्ष केंद्रित करा. शांत मन, संयम आणि आत्मसंयम तुम्हाला दिवस अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यास मदत करतील.

    मिथुन – नातेसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस खूप सुखद असेल. वैवाहिक जीवनातील दुरावा किंवा गैरसमज संवादातून कमी होईल. परदेशात शिक्षण किंवा करिअर करण्याची योजना आखत आहेत, त्यांना प्रोत्साहन देणारी एखादी बातमी मिळेल. संततीच्या यशामुळे तुम्हाला अभिमान आणि आनंद वाटेल. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि पाठिंबा यांच्या पाठिंब्याने प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

    कर्क – आज नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, त्यामुळे आपले डोळे आणि कान उघडे ठेवा. नोकरी शोधणाऱ्यांना एका चांगल्या संधीबद्दल माहिती मिळू शकते. तुमचे गोड शब्द आणि मनमिळाऊ स्वभाव इतरांना प्रभावित करेल. काही जण तुमच्या साधेपणाला कमजोरी समजू शकतात, पण तुम्ही तुमची सचोटी आणि आत्मविश्वास टिकवून ठेवा. दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. एकंदरीत, हा दिवस नवीन आशा आणि सकारात्मक बदलाचे संकेत देतो.

    सिंह – आज तुम्ही एका महत्त्वाच्या ध्येयाच्या दिशेने जोमाने पुढे जाऊ शकता. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील आणि यशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. संततीचे यश किंवा नोकरीसंबंधीची चांगली बातमी कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण करू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणतेही दीर्घकालीन प्रश्न सुटू शकतात. अर्थात या धावपळीच्या वेळापत्रकात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपली ऊर्जा टिकवून ठेवणे आवश्यक आहे; तरच तुम्ही मिळवलेल्या यशाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल.

    कन्या – आज तुमचा आत्मविश्वास दृढ राहील आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे अवघड कामेही सोपी वाटू शकतील. नशिबाची साथ मिळाल्यास, तुमच्या प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा चांगले फळ मिळू शकते. घरातील वडीलधाऱ्या सदस्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यांचा सल्ला तुम्हाला एका महत्त्वाच्या परिस्थितीत मार्गदर्शन करू शकतो.  प्रवासादरम्यान मिळालेली माहिती भविष्यात खूप उपयुक्त ठरू शकते. आई-वडिलांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तुम्हाला मानसिक बळ देतील.

    तुळ – काही काळापासून तुम्हाला त्रास देणाऱ्या समस्या आणि अडचणी हळूहळू कमी होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या एखाद्या निर्णयावर तुम्हाला पुनर्विचार करावा लागू शकतो, परंतु हा विचारविनिमय तुमच्यासाठी हानिकारक ठरणार नाही, तर तो तुमच्या भविष्यातील दिशा स्पष्ट करेल. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी, स्वतःच्या निर्णयावर आणि अनुभवावर विश्वास ठेवा. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांनाही आजचा दिवस अनुकूल वाटेल आणि त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळू शकेल.

    वृश्चिक – आज, जीवनात स्थिर प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कोणत्याही योजना पुढे जाऊ शकतात. लांबच्या प्रवासाचा विचारही करू शकता. व्यवसायात नफ्याचे संकेत आहेत आणि बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रकल्पांना पुन्हा गती मिळू शकते. समर्पण आणि वचनबद्धतेने हाती घेतलेल्या कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. लहानसहान गोष्टींवरून भावंडांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे, परंतु ते वाढवण्याऐवजी तुम्ही ते हुशारीने हाताळल्यास, परिस्थिती लवकरच सामान्य होईल.

    हेही वाचा – सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    धनु – आज तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण या जबाबदाऱ्या तुम्हाला प्रगतीच्या संधीही देतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. कुटुंबात एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते, ज्यात तुमची प्रमुख भूमिका असेल. जोडीदाराचे प्रेम किंवा त्यांच्याकडून मिळालेले एखादे खास सरप्राईज तुमचा दिवस खास बनवेल.

    मकर – बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आज हळूहळू पूर्णत्वाकडे सरकतील. कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनाने आनंद मिळू शकतो. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्यांबाबतही सकारात्मक संकेत मिळत आहेत. संततीच्या वागणुकीबद्दल काही चिंता निर्माण होऊ शकते. भूतकाळातील एखाद्या निर्णयाच्या आठवणी तुम्हाला काही काळ अस्वस्थ करू शकतात. तरीही, तुमची समज, संयम आणि व्यावहारिक विचारसरणी तुम्हाला प्रत्येक परिस्थिती समतोलपणे हाताळण्यास मदत करेल.

    कुंभ – आज तुम्हाला आधीपेक्षा हलके, अधिक उत्साही आणि आनंदी वाटू शकते. कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जवळीक वाढेल आणि परस्पर सामंजस्य सुधारेल. आज एखादी सहल किंवा लहान प्रवासाचे नियोजन करू शकता. जुना आर्थिक प्रश्न सुटल्याने दीर्घकाळापासूनचा तणाव कमी होईल. व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. संततीसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधल्यास हे वाद फार काळ टिकणार नाहीत.

    मीन – आज तुमच्या मनात नवीन कल्पना आणि योजना वेगाने आकार घेऊ शकतात. काहीतरी नवीन आणि वेगळे करून पाहण्याची इच्छा तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करेल. अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवणे टाळणे महत्त्वाचे आहे. तुमचे प्रयत्न सुरुवातीला अपेक्षेपेक्षा कमी वाटले तरी, कामाच्या ठिकाणी त्यांची दखल घेतली जाईल. इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये अनावश्यक हस्तक्षेप टाळा. तुमचा सकारात्मक विचार आणि सर्जनशील दृष्टिकोन भविष्यात महत्त्वपूर्ण फायदे मिळवून देऊ शकतात. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते आज परत मिळण्याची शक्यता आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    मिथुनेचा शुक्र… सोशल बटरफ्लाय

    October 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 ऑक्टोबर 2026

    October 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑक्टोबर 2026

    October 8, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    मिथुनेचा शुक्र… सोशल बटरफ्लाय

    By अस्मिता दीक्षितOctober 9, 2026

    || श्री स्वामी समर्थ || जीवनातील आनंदाचा कारक शुक्र. शुक्र हा स्त्रीग्रह आहे, जलतत्व आहे…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 ऑक्टोबर 2026

    October 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑक्टोबर 2026

    October 8, 2026

    अपघात टाळण्यासाठी वास्तुशास्त्र

    October 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026

    सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    October 9, 2026

    Recipe : ढाबा स्टाईल लसुणी पालक!

    October 9, 2026

    मिथुनेचा शुक्र… सोशल बटरफ्लाय

    October 9, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : घृतें आंबुखूनि आगियाळें, वज्राग्नीचें सादुकलें

    October 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 464
    • अवांतर 216
    • आरोग्य 156
    • पंचांग आणि भविष्य 622
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 258
    • मैत्रीण 30
    • ललित 982
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026

    सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    October 9, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.