Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बाई बाई… बाईपण

    October 10, 2026

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    October 10, 2026

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बाई बाई… बाईपण
    ललित

    बाई बाई… बाईपण

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेOctober 10, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, पराग गोडबोले, लेखक पराग गोडबोले, बाई, शाळेतील बाई, शाळेतील मॅडम, बाई संज्ञा, बाईपण, अगं बाई अरेच्चा, बाई उच्चारात नजाकत, बाई बाई, ठाणे रिक्षा, मोलकरीण बाई,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ठाण्याला रिक्षाच्या रांगेत उभा होतो. संथ गतीने सरकणारी रांग आणि कासावीस जनता, हे रोजचंच दृश्य… माझ्या मागे एक पुरुष आणि पुढे एक स्त्री, मध्यमवयीन. ती मोबाइलमध्ये डोकं खुपसून असल्यामुळे, तिच्या पुढची रांग सरकली हे कळलंच नाही तिला. मधे चार-पाच जणांची रिकामी जागा तयार झाली आणि माझ्या मागचा माणूस म्हणाला, “ओ बाई, जरा पुढे सरका…”

    हे ऐकलं आणि ती पुढे उभी असलेली महिला, नागिणीसारखी फुत्कारली… “बाई किसको बोलताय?”

    त्या माणसाला काही कळेचना, आपली काय चूक झाली ते.

    तो म्हणाला, “तुमको ही बोलताय.” दोघांची मजेशीर बम्बईया हिंदी!

    “मैं क्या बाई जैसी दिख रही हूं तुमको?”

    मागचा माणूस मराठीत उत्तरला, “आता बाई आहे तर बाई सारखीच दिसणार ना?” आणि यावर दोघं भिडले. मधल्यामधे मी मात्र उगाचच भरडला जाऊ लागलो.

    त्या माणसाचं काहीच चुकलं नव्हतं, पण हा फरक थोडासा समज, गैरसमजाचा होता. मराठीत आपण स्त्रीला सर्रास ‘बाई’ म्हणून संबोधतो, पण इतर भाषिक लोकांसाठी बाई म्हणजे ‘मोलकरीण’. हेच संबोधन रुळलेलं सगळीकडे आणि म्हणून तिचा असा गैरसमज, की हा माणूस मला मोलकरीण म्हणतोय… किती हा अधःपात माझा, असं समजून तिने फणा काढलेला!

    मनोमन हसू आलं मला, पण हे सगळं तिला समजावायची ती वेळ नव्हती आणि तेवढा मला उत्साहही नव्हता. नेहेमीप्रमाणे थोडीशी चलबिचल, वादावादी झाली, त्या महिलेला रिक्षा मिळाली आणि सगळं शांत झालं… जगण्याच्या पृष्ठभागावरील या लाटा, नेहमीच अनुभवायला मिळतात मुंबईच्या आयुष्यात! त्या विरतातही पटकन, जशा आल्या तशा, कुठलाही मागमूस न ठेवता.

    मलाही रिक्षा मिळाली, पण माझं विचारचक्र मात्र धावायला लागलं, पूर्वी विजेच्या मीटरचं चक्र धावायचं तसं. आता डिजिटलच्या युगात कुठलं चक्र आणि कुठलं काय! तशी, ‘बाई’ ही संज्ञा मराठी भाषेत अगदी वेगवेगळ्या रूपात वापरली जाते. बालवर्गात असताना, शिक्षिका म्हणजे ‘ताई’ असायच्या. पहिलीत गेल्यावर त्या ‘बाई’ व्हायच्या, अगदी नकळत. त्या बहुतेक,  सातवीपर्यंत तशाच राहायच्या आणि आठवीत त्या अचानक, ‘मॅडम’ हे भारदस्त संबोधन लेऊन यायच्या. त्यांना ‘बाई’ म्हटलं तर कोण राग यायचा. जणू एक पायरी खाली उतरवलं असावं कुणीतरी, असा आविर्भाव. आम्ही पण मग ‘मॅडम’ना रुळायचो आणि ‘बाई’ हद्दपार व्हायच्या मनातून…

    हेही वाचा – दिनचर्या… तिची अन् त्याची!

    हल्ली याच बाई, शाळेत ‘मिस’ म्हणून दर्शन द्यायला लागल्या आणि ‘बाई बाई, तिने मला मारलं…’, ‘त्याने माझे केस ओढले…’ वगैरे लाडीक तक्रारी नामशेष झाल्या. हल्लीची मुलं, या तक्रारी कशा करतात याचा अनुभव त्या शाळेत जाऊनच घ्यायला हवा.

    बायकांच्या बोलण्यात तर ‘बाई’ हा शब्द अगदी साजरा होऊन येतो. ‘बाssssई’ म्हटलं की, अतोनात आश्चर्य ध्वनित होतं.

    ‘बाssssई, किती तो चावटपणा…’ म्हटलं, की नवरोबांची दांडी गुल झालीच म्हणून समजा. तोंडावर हात ठेवून, नुसतंच ‘बाssssई!!’ हे तर कुठेही लागू पडतं, अगदी कुठल्याही प्रसंगाला! लडिवाळपणाचा कहर.

    तसंच, मला ‘बाई’ आवडते पैठणी,  मला ‘बाई’ आवडतो शालू, मला ‘बाई’ आवडतं गप्पा मारायला,  हे तर अतोनात जीवघेणं. यात ‘बाई’ या शब्दाची जागा दुसरा कुठलाच शब्द घेऊ शकणार नाही, हे मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो. या ‘बाई’च्या उच्चारात जी नजाकत असते, ती दुसऱ्या कोणत्याही शब्दात नसते, हे मात्र अगदी नक्की. विड्यात कात जी महत्त्वाची भूमिका निभावतो, नेमकी तीच भूमिका या वाक्यात ‘बाई’ने निभावलेली असते. रंग खुलवण्याची आणि खुळावण्याची!

    काही जणी, हाच उच्चार नाजूक ‘बै’ असा करतात… तो तर अतीव जानलेवा!! अगदी काळजात कट्यार घुसवणारा. हा ‘बै’ म्हणजे साध्या, नुसत्या ‘बाई’वर कडी असते. अमिट ठसा उमटवणारी, हृदयात कळ आणणारी शब्दकळा.

    लताबाईंचं, ‘बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला’ ऐकताना आणि त्या गाण्यात जयश्री गडकर यांचे विभ्रम बघताना, या दोन्ही बाया, ‘बाई’ या शब्दाला अगदी वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. आपल्या मनमोराचा पिसारा फुलवीत. गोड वाटतं, पाहायला आणि ऐकायला.

    हेही वाचा – मारवाडी…

    निळू फुलेंचं, “बाई, वाड्यावर या” ऐकलं, की मात्र तळपायाची आग मस्तकात जाते, हे कोणीही मान्य करेल. यात ते वाक्य फेकण्याची त्यांची लकब मात्र दाद देण्यालायक, चीड आणणारी. त्यांच्यातल्या अस्सल कलाकाराला हे अगदी गौरवास्पद.

    ‘अगं बाई, अरेच्चा’ म्हणत तसाच एक चित्रपट धमाल उडवून देतो आणि ‘अग्गो बाई, ढग्गो बाई’ म्हणत कोणी एक सलील कुलकर्णी आपल्या काळजाला हात घालून जातो आणि बालपणाची सैर घडवून आणतो. याच बाया, जेव्हा ‘बाईपण, भारी देवा’ म्हणत पडद्यावर धुमाकूळ घालतात तेव्हा, खरंच बाईपण ही दैवी देणगी आहे हे पटत राहतं. ‘रूसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू’ असं म्हटल्यावर, रुसलेल्या परीच्या गालांवर आणि नकट्या नाकावर फुललेलं हसू म्हणजे आईसाठी अगदी जीवनामृतच जणू!

    मागच्या पिढीत, आत्या, काकू यांना आत्याबाई, काकूबाई तर मोठ्या वहिनीला नुसतंच ‘बाई’ म्हणायची प्रथा होती. कालांतराने ही प्रथाही बाद झाली, तरी ‘बाई’ या संज्ञेभोवती असलेलं वलय मात्र अबाधित राहिलं, तसंच.

    रिक्षाच्या रांगेत उभं असताना, त्या बाईचा, ‘बाई’ म्हटल्यावर जाणवलेला फणकारा, या सगळ्या बाईपणाच्या आठवणी जागृत करून गेल्या. अचानकच, हे बाईपण, वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या काळाच्या स्मृती उजागर करून गेलं, सुखावह भावना जागवत!

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    October 10, 2026 ललित

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026 ललित

    सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    October 9, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    By प्रणाली मंगेश महाशब्देOctober 10, 2026

    नवरात्रीच्या घटस्थापनेत सप्तधान्य पेरण्यामागे धार्मिक श्रद्धेबरोबरच शेती आणि निसर्गाशी जोडलेला सुंदर अर्थ आहे. सप्तधान्य म्हणजे…

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026

    सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    October 9, 2026

    श्रद्धा

    October 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बाई बाई… बाईपण

    October 10, 2026

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    October 10, 2026

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र

    October 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 465
    • अवांतर 216
    • आरोग्य 157
    • पंचांग आणि भविष्य 622
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 258
    • मैत्रीण 30
    • ललित 984
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बाई बाई… बाईपण

    October 10, 2026

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    October 10, 2026

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.