Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र

    October 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?
    आरोग्य

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 10, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, आरोग्यम् धनसंपदा, आरोग्य काळजी, समर्थ आरोग्य फाऊंडेशन, आरोग्याची काळजी, निरोगी जीवन, महिलांचे आरोग्य, सकस आहार, महिलांचे डाएट, आधुनिक डाएट, पारंपरिक आहार, भारतीय अन्नपदार्थ, विदेशी डाएट फूड, आहाराचे प्रमाण
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आरोग्यदायी जीवनाची सुरुवात औषधांपासून नव्हे, तर आपल्या जेवणाच्या ताटापासून होते. विशेषतः, महिलांसाठी योग्य आणि सकस आहार हा केवळ आरोग्याचा विषय नसून त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याचा पाया आहे. घरातील प्रत्येकाच्या खाण्या-पिण्याची काळजी घेणारी महिला मात्र अनेकदा स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करते. मुलांनी व्यवस्थित खावे, नवऱ्याने डबा व्यवस्थित न्यावा, घरातल्या वडीलधाऱ्यांना वेळेवर जेवण, पथ्य-पाणी मिळावे, याची काळजी घेते. पण, हे सारं करता करता स्वतःचं जेवण मात्र उरलेल्या वेळात घाईघाईने, शिळंपाकं – उरलंसुरलं खाऊन कसबस करते… आणि म्हणतेही, ‘मला काय होतंय?’

    पण नीट न जेवल्याने पोषण कमी होऊ शकते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि लहान-सहान आजार तिला हळूहळू घेरू लागतात. महिलांच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर शरीराच्या पोषणाच्या गरजा बदलत असतात. किशोरावस्था, मासिक पाळी, गर्भधारणा, स्तनपान, प्री-मेनोपॉज, मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती या प्रत्येक टप्प्यावर शरीराला विशिष्ट पोषक घटकांची गरज असते. आयर्न, कॅल्शियम, झिंक, प्रोटिन यांचा रोजच्या आहारातून पुरवठा मिळणे गरजेचे असते.

    हेही वाचा – शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!

    मासिक पाळीमुळे महिलांच्या शरीरातून नियमितपणे लोह काही प्रमाणात शरीराच्या बाहेर फेकले जाते. त्यामुळे आहारात लोहाची कमतरता असेल तर, शरीरात रक्ताची मात्रा कमी होऊ शकते. यामुळे –

    • सतत थकवा
    • चक्कर येणं
    • अशक्तपणा
    • धाप लागणं
    • कामात उत्साहच न उरणं
    • चिडचिड

    अशी लक्षणे दिसायला लागतात. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी झाल्यानं हाडं ठिसूळ होणं, सांधे दुखणे, पाठ, मणका, कंबर दुखणं असे त्रास वारंवार होऊ शकतात. प्रोटिनच्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक परिणाम होऊ शकतात, म्हणजे केस गळणं आणि आहारावरचं नियंत्रण सुटणं.

    गोड खाण्याची क्रेव्हिंग्ज वाढू शकतात. मग सुरू होतं…

    • हे डाएट करू, ते करू…
    • रील पाहून मनानंच काही उपाय करणं
    • सतत डाएटचे सल्ले घेणं

    पण प्रत्येक व्यक्तीची पोषणाची गरज वेगळी असते. आजकाल हेल्दी डाएट म्हटलं की, अनेकदा महागडी सुपर फूड्स, परदेशी धान्य, प्रोटिन बार, विशेष प्रकारचे सीड्स, महागड्या पावडरी डोळ्यांसमोर येतात. पण खरंतर पौष्टिक आहारासाठी खिशाला मोठी कात्री लावण्याची अजिबात गरज नाही! आपल्या ‘पारंपरिक भारतीय’ घरगुती आहारातच पोषणाचा खजिना दडलेला आहे. डाळी, कडधान्ये, मोड आलेली कडधान्ये, नाचणी, ज्वारी, बाजरी, राजमा, तांदूळ, गहू, मटकी, हरभरा, शेंगदाणे, गूळ, तीळ, घरगुती मसाले, खसखस, पालेभाज्या, रानभाज्या, फळं, दूध, दही, ताक, अंडी असे असंख्य पदार्थ सहज उपलब्ध आहेत.

    हेही वाचा – टेंशन आहे? मग शुगर तपासून घ्या!

    हे पदार्थ महागड्या हेल्थ फूडपेक्षा अधिक स्वस्त आणि आपल्या आहार पद्धतीत सहज जोडता येणारे पदार्थ आहेत. उदाहरणार्थ नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असतं. नाचणीची पेज नाश्ता म्हणून तुम्ही घेऊ शकता.

    • डाळी आणि कडधान्ये प्रोटिनचा उत्तम स्रोत आहेत.
    • पालेभाज्यांमधून लोह, विविध अनेक जीवनसत्वं आणि खनिजं मिळतात.
    • शेंगदाणे + गूळ + तीळ म्हणजे लोह आणि कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. यातूनच नॅचरल ऑइल मिळते आणि तुलनेने स्वस्त आणि सहज उपलब्ध असे हे पदार्थ आहेत.

    आपल्या स्वयंपाकघरातील थालिपीठे, धिरडे, मुगडाळीची खिचडी, डाळ-भात, भाजी-भाकरी, उसळ, पोहे, उपमा, दही, ताक, दही-भात, सोयाबीन, विविध प्रकारच्या चटण्या यासारखे पदार्थ योग्य पद्धतीने आणि संतुलित प्रमाणात खाल्ले तर नक्कीच पौष्टिक आहाराचा भाग बनतात. त्यामुळे हेल्दी खाण्यासाठी नेहमी विदेशी किंवा महाग पदार्थ हवेत, हा गैरसमज दूर करणं गरजेचंच आहे. पण तेच होत नाही आणि अपुरा किंवा असंतुलित आहार दीर्घकाळ सुरू राहिल्यानं शरीरावर त्याचे अनेक परिणाम होऊ शकतात.

    सकस-पौष्टिक रोज जमवायचं कसं?

    1. सकस आहार म्हणजे भरपूर आणि सतत खाणं नाही, तर सकस आहार म्हणजे शरीराला आवश्यक असणारे विविध घटक रोजच्या रोज योग्य प्रमाणात शरीराला मिळणं.
    2. पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ आपल्या आहारात असावेत. आपल्या रोजच्या जेवणात धान्य, भाकरी, चपाती, तूप, डाळी, पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स, दूध, दही, फळभाज्या तसंच दिवसभरात एक फळ यांचा समतोल असणं महत्त्वाचं आहे.
    3. आपण रोज विसरतो तो आणि अगदी मोफत मिळणारा दुर्लक्षित घटक म्हणजे पाणी! आपण पुरेसं आणि योग्य प्रमाणात थोड्याथोड्या वेळानं पाणी पिणं गरजेचं आहे.

    स्वतःची काळजी घेणं ही स्वार्थाची गोष्ट नाही, तर स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी आहे!


    (सौजन्य – समर्थ आरोग्य फाऊंडेशन)

    संपर्क – 9150014545

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026 आरोग्य

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026 आरोग्य

    टेंशन आहे? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरOctober 8, 2026

    एक जोडपं ओपीडीत आलं होतं. त्यापैकी तिला कालच्या औषधानं बरं वाटलं, पण त्याचा ताप कमी…

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    टेंशन आहे? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026

    चेहराच फर्स्ट इम्प्रेशन…

    October 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र

    October 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026

    सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    October 9, 2026

    Recipe : ढाबा स्टाईल लसुणी पालक!

    October 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 465
    • अवांतर 216
    • आरोग्य 157
    • पंचांग आणि भविष्य 622
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 258
    • मैत्रीण 30
    • ललित 982
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र

    October 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.