Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    October 4, 2026

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026

    रोजच परीक्षा…

    October 4, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, October 5
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी
    ललित

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारOctober 4, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता हवालदार, डॉ अस्मिता हवालदार, Bookshelf, सावित्री कादंबरी, वैचारिक खाद्य पुरवणारी कादंबरी, पु शि रेगे यांची कादंबरी, पु शि रेगे यांची कादंबरी, पु शि रेगे यांची सावित्री, लहान कादंबरी सावित्री
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पु. शि. रेगे यांची ‘सावित्री’ ही अवघी 117 पानांची लहानशी कादंबरी आहे. सावित्रीने एका आवडलेल्या पुरुषाला, जो तिला बहुतेक गाडीत भेटला होता, लिहिलेली 39 पत्रे यात आहेत. 1939 ते 1947 या कालावधीत लिहिलेली ही पत्रे आहेत. ती आई नसलेली आणि वडील लेखनाच्या कामात सतत व्यग्र असलेल्या पालकांची मुलगी असते. तिला वडील आनंदभाविनी म्हणत. तिने या व्यक्तीला लिहिलेल्या पत्रांतून कथा उलगडत जाते. पण त्याने लिहिलेली पत्रे नसल्यामुळे त्याच्या पत्रातला मजकूर तिच्या लेखनातूनच समजतो. ही कादंबरी लहानशी असली, अगदी हाताच्या पंजात मावण्याइतकी तरी, लवकर वाचून होत नाही! कारण, समजून वाचावी लागते. सुंदर सरळ भाषा, शब्दांचं मोहक वैविध्य वाचायला मिळतं. उदा. सोहीरा शब्द. याचा अर्थ मला समजला नव्हता. सोहीरा म्हणजे भान!

    मुखपृष्ठावर पिसारा असलेला मोर आहे. त्याने पिसारा फुलवलेला नाही, तो नाचत नाही. सुरुवातीला ऋग्वेदातला देवीसूक्तातला श्लोक येतो – मी ज्याची कामना करते, त्याला तेजपुंज करते… अशा अर्थाचा हा श्लोक आहे. हा श्लोक इथे का लिहिला? हे समजायला ही कादंबरी वाचायला हवी.

    सुरुवातीला राजम्माने सांगितलेली, लच्छी आणि मोराची कथा आहे. ज्यात ती म्हणते, ‘आपल्याला आनंदात राहायचं असेल तर, जे जे हवं असेल ते आपणच व्हावं!’ या कथेचा रूपकात्मक सुरेख उपयोग करण्यात आला आहे. अशा लहानशा कथा यात येतात. त्यात झाड, पाखरे आणि राजाची कथा आहे. ती सावकाश अर्थ समजून पचवून वाचावी लागते. तेव्हा गर्भितार्थ समजतो. सावित्री जिला सगळे साऊ म्हणतात, निर्मळ मनाची मुलगी आहे. ती म्हणते, ‘मी पहिल्यांदा काय शिकले असेन तर, स्वतःला विसरायला…’ पत्रांतून ती संयमितपणे भावना व्यक्त करते, प्रेम व्यक्त करते. तो तिला भेटायला येण्याचे ठरवतो, पण येत नाही. त्यासाठी कारण देतो, तेही न पटण्यासारखे! पुढे तो शिकायला इंग्लंडला जातो आणि ती अप्पांबरोबर जपानला जाते. तिथे एजवर्थ, अप्पांचे मित्र भेटतात. साऊने पत्रांत काहीजणांचा उल्लेख केला आहे – ल्योरे, राजम्मा, नामुरा, ओसाका, मि. सेन, बीना.

    हेही वाचा – Bookshelf : मनात खोलवर प्रभाव पाडणाऱ्या ‘चौघीजणी’

    एजवर्थ म्हणतात की, ‘पुढच्या जन्मी मी कुर्गी स्त्रीचा जन्म घेणार आहे…’ हा धागाही लेखकाने पुरा केला आहे. असे लहान वाटणारे उल्लेखसुद्धा कथानकात अर्थपूर्ण रंग भरतात. ती पत्र लिहित असलेला पुरुष तिच्याकडे पाच दिवस राहून जातो. दोघे बुद्धिमान आणि कलासक्त असल्याचे जाणवत राहते. तो शांत, ऋजू, न्यायबुद्धी, मागचं पुढचं सांधून त्यांना नव रूप द्यायची हातोटी असलेला असा आहे. ती म्हणते, ‘मी तुम्हाला आपलंसं करून घेतलं आहे, मला तुमचंसं करून घेतलं आहे.’ त्याने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ती देत नाही. स्वत: मात्र भरपूर प्रश्न विचारत राहते. त्यांचे नाते असेच पुढे जाते. तो थिसीसमध्ये तिचे आभार मानतो. इतके ते भावनिकदृष्ट्‍या जवळ आलेले आहेत.

    ल्योरे ही स्वीडिश मुलगी तिची मैत्रीण होते. सावित्री एक फोटो पत्रातून पाठवते. यात ल्योरे आणि तिने पोशाखांची अदलाबदली केली आहे, असे ती म्हणते. पुढे एका पत्रात ती लिहिते, ‘तुम्ही मला भेटला नाहीत आणि ल्योरेला भेटू शकलात, तर ती मीच समजा.’ ल्योरे त्याला स्वतंत्रपणे पत्र लिहिते असेही तिला वाटते.

    सावित्रीला सतत सुजन कसे भेटतात, असे तो विचारतो. ती म्हणते, ‘दु:खाच्या पलीकडे एक सुख असतं, तसं सुखाच्या पलीकडे एक दु:ख असतं.’ सुजन आणि दुर्जन यावर ती भाष्य करते. स्वतःकडे दुसर्‍याच्या दृष्टीने पाहण्याचा खेळ ती खेळते. हे तिला शक्य होते, कारण तिला स्वतःला विसरता येत असते.

    मेजर सेन आणि मिसेस सेन मृत्यू पावल्यावर त्यांच्या मुलीला, बीनाला घेऊन ती भारतात परतते. ‘बीना माझ्यासाठी तृप्त मातृत्व अनायासे घेऊन आली,’ असे ती लिहिते. युरोपात युद्ध सुरू झाल्यावर काही पत्रे गहाळ होतात. जेव्हा त्याचं पत्र मिळतं, तेव्हा ती लिहिते, ‘आज तुमचं ओळखीचं लाडकं अक्षर घेऊन मी मला मिरवलं.’ सहा वर्षांच्या पत्रलेखनातून निर्माण झालेल्या नात्याबद्दल ती लिहिते, ‘पहिल्यांदा एक सहेतुक वेगळेपणा आणि दुसऱ्यांत एक निर्हेतुक आपलेपणा दिसून येईल.’ शेवटी तो भारतात परत यायच्या तयारीला लागतो. तिला भेटायला अधीर झालेला असतो. शेवटच्या पत्रात ती पुन्हा सुरुवातीच्या मोराच्या गोष्टीचा उल्लेख करते. लेखकाने या कथेचा किती खुबीने वापर केला आहे!

    हेही वाचा – एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!

    कादंबरी वाचून संपल्यावर त्यातल्या कितीतरी संकल्पनांचा, वाक्यांचा विचार मनात सुरू राहतो. खलनायक नसलेली, धक्कादायक घटना नसलेली ही कथा आहे; तरी, ती मनाचा ठाव घेते. त्यातले नाट्य तरीही आपल्याला बांधून ठेवते. हा केवळ सावित्रीच्या मनाचा व्यापार आहे. तिच्या नजरेतून आपण तिच्या प्रियकराबद्दल आडाखे बांधतो. सावित्रीला आपण ओळखू लागलो, असे वाटत असताना ती अनोळखी, अथांग वाटू लागते.

    ही मराठीतली खूप गाजलेली कादंबरी. लेखकाची ही पहिलीच कादंबरी. एवढ्या लहानशा पुस्तकाने इतके वैचारिक खाद्य पुरवले आहे की, पाने आलटून पालटून पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते, तरी अतृप्त वाटते… इतके लिहूनही अपूर्ण वाटतंय, कारण सावित्रीचा परिचय करून देणे कठीण आहे.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    रोजच परीक्षा…

    October 4, 2026 ललित

    बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    October 3, 2026 ललित

    फिट्टमफाट

    October 3, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    रोजच परीक्षा…

    By नीता चंद्रकांत कुलकर्णीOctober 4, 2026

    आपला प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. रोज नवीन प्रश्न समोर उभे राहत असतात. खरंतर, ती…

    बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    October 3, 2026

    फिट्टमफाट

    October 3, 2026

    तीन मित्र

    October 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    October 4, 2026

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026

    रोजच परीक्षा…

    October 4, 2026

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 04 ते 10 ऑक्टोबर 2026

    October 4, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रवृत्ति पेललें पोट, निवृत्ति ते पाठी नीट

    October 4, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 458
    • अवांतर 215
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 613
    • फिल्मी 70
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 970
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    October 4, 2026

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026

    रोजच परीक्षा…

    October 4, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.