Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    September 30, 2026

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026

    मोहोर

    September 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » राधाची कबुली अन् मी…
    ललित

    राधाची कबुली अन् मी…

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यSeptember 30, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, डॉ विवेक वैद्य, डॉक्टर विवेक वैद्य, लेखक डॉक्टर विवेक वैद्य, लेखक विवेक वैद्य, विंग्ज हॉस्पिटल, सुमन आणि राधा, सिस्टर सुमन, सिस्टर राधा, सुमन नर्स, राधा नर्स, राधा मैत्रीण, राधाची कबुली. राधा राजू संबंध
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मी मुंबईत विंग्ज (Wings) या खासगी हॉस्पिटलला आरएमओ (निवासी वैद्यकीय अधिकारी) म्हणून लागलो. कामाचा अनुभव नव्हताच फारसा… तिथे तीन नर्स होत्या आणि त्यातल्या सुमन आणि राधा या सख्ख्या बहिणी होत्या, या दोघी बहिणी विक्रोळीच्या कोणत्या तरी चाळीत भाड्याने राहायच्या. सुमन विवाहित, तिला पाच-सहा वर्षांची मुलगी. तिचा नवराही कामाला जायचा. मुलगी शाळेत जायची सकाळी. दुपारी घरी यायची. सुमन आणि राधा दोघी एकमेकांच्या ड्युट्या सांभाळून घ्यायच्या, मुलीला सांभाळता यावे म्हणून. या सगळ्या गडबडीत राधाशी माझे छान जमायचे. सुरुवातीला तिनेच मला हॉस्पिटलच्या रितीभाती शिकवल्या.

    राधाबरोबर दर आठवड्याला आता बाहेर जेवण चालू झाले होते. तो तास-दीडतास माझ्यासाठी एक रीफ्रेशिंग गोष्ट होती. मला सुमनची चिंता होती. माझ्या आणि राधाच्या संबंधाबाबत तिचा काही गैरसमज व्हायला नको. पण एके दिवशी सुमनच माझ्याकडे आली आणि म्हणाली, “डॉक्टर विवेक, फुरसत में मिलना मुझे अकेले में. थोडा बात करना है तुझ से…” (हे लोक बरेचदा ज्युनिअर डॉक्टरांना अरेतुरे करतात.)

    सुमन काय बोलणार याबद्दल मला माहिती नव्हती… पण ती माझ्या आणि राधबाबत विचारेल, अशीच शक्यता होती. बहुतांश पेशंट मी आणि राधा सोबतच अटेण्ड करायचो. शिवाय, आठवड्यात एकदा राधाच्या पैशाने का होईना, हॉटेलचे जेवण! हे स्टाफच्या डोळ्यात आले नसेल तर नवलच. माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी राधाला चुकीचा स्पर्शच काय, चुकीचे काही बोललो पण नव्हतो. अर्थात, त्यावर सुमनने विश्वास ठेवायला हवा. मला उगाचच धडधडल्यासारखे झाले. केरलीय लोकांबद्दल मला फारशी काही माहिती नव्हतीच. सुमनने काही तमाशा केला असता तर, माझी नोकरी भले शिकाऊ डॉक्टर म्हणून का असेना, गेली असती. बदनामी झाली असती, ती वेगळीच. अशा परिस्थितीत काका- काकूंना काय सांगणार होतो?

    दुपारी वेळ मिळाला आणि मुख्य डॉक्टर त्यांची केबिन सोडून गेल्यावर मी आणि सुमन त्यांच्या केबिनमध्ये शिरलो. एसी असूनही मला घाम आला. तरीही मी कसेबसे म्हणालो,

    “बोलो सिस्टर…”

    घसा खाकरून सुमन म्हणाली, “देखो डॉक्टर विवेक, राधा से तुम्हारी अच्छी दोस्ती है. एक बात बोलना उससे. लेकिन ये बात किसी को नहीं बताना.”

    मी काहीसा निश्चिंत झालो.

    “मेरे पे भरोसा रखो. मैं किसी को नहीं बताऊंगा.”

    “देखो डॉक्टर, मैं, मेरा घरवाला राजू और राधा. सब एकही घर में रहते. मुझे शक हैं कि, राधा और राजू का चक्कर चल रहा है.”

    माझ्या जीवात जीव आला. म्हणजे हे माझ्या आणि राधाच्याबद्दल नव्हते.

    “आप को पक्का यकीन हैं? कभी अपने पकडा है दोनों को?”

    “नहीं. लेकिन कुछ चक्कर तो है जरूर… तू मर्द है इसलिये तेरेकु समझ नहीं आयेगा, लेकिन हम लेडीज को ये बराबर समजता है. अगर मेरी मॉर्निंग (duty) रहेगी तो मैं सात बजे घर से निकलती, मुन्नी आठ बजे जाती और राजू नौ बजे निकलता… मतलब आठ से नौ बजे तक वो दोनो अकेले रहते घर में…”

    मला ते काही पटले नाही. दिवसाढवळ्या चाळीतल्या घरात, आजूबाजूला एवढी जाग असताना… कदाचित राधाबद्दल माझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर असल्याने ती काही असलं करणार नाही, असे वाटत होते. पण समजा काही तसे असले तर मी काय करणार?

    “मैं क्या करू?”

    मी सरळ विषयाला हात घातला.

    “कुछ नही. सिर्फ उसको बोलने का की राजू से दूर रहेनेका. तेरी जिंदगी पडी है अभी. शादीवादी बाकी है. अगर कुछ उल्टा-सुल्टा हो गया तो बदनामी होगी. मैं उसको गांव से लेके आयी, लोग तो मुझे ही बोलेंगे ना?”

    “मेरी सुनेगी वो?”

    हेही वाचा – सुमन आणि राधा…

    “‘तेरी बात सुनेगी डॉक्टर, तेरा बहुत नाम निकालती है… बहुत अच्छा डॉक्टर है कर के. तू बात करना. मै बोलूंगी तो झगडा करेगी मेरे साथ… इतना करना मेरे लिये डॉक्टर विवेक…” बोलताबोलता तिने माझा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यात अश्रू आले.

    मी तिच्या हातावर थोपटलं. “जरूर बात करूंगा.”

    0000

    मी जरी सुमनला आश्वासन दिले, तरी राधाशी या विषयावर बोलण्याची माझी हिम्मत होत नव्हती. दोन चार दिवस असेच गेले आणि अचानक मला आमच्या डॉक्टर वाला सरांनी बोलावले…

    “बैद, दो-चार दिन केतन गांव जानेवाला है. तो तू चार दिन नाइट ड्युटी कर लेना. नाइट की सिस्टर की लडकी की भी डिलिव्हरी हुई है. वो भी छुट्टी पर हैं. तो मैंने राधा को बोला. वो तेरे साथ रहेगी नाइट में…”

    नाइट ड्युटीचं मला जरा दडपण होते. दिवसा पेशंट हॅण्डल करणे सोपे. सकाळ-संध्याकाळ मुख्य डॉक्टर असतात. दुपारी कुणाला ॲडमिट केले तरी, संध्याकाळी मुख्य डॉक्टरांकडून तपासून घेता येते. रात्री पेशंट आल्यास पूर्ण रात्र तो आपल्या देखरेखीखाली राहतो. मुख्य डॉक्टर पेशंट खूप सीरियस असला (किंवा व्हीआयपी असला) तरच येतात. पण राधा माझ्याबरोबर असल्याने मी सुटकेचा निश्वास टाकला.

    “येस सर.” मी सरांना होकार दिला.

    0000

    पहिली रात्र गडबडीत गेली. रात्री 3-4 पेशंट आले. दुसऱ्या नाइटला थोडा निवांतपणा मिळाला. खरेतर डॉक्टरांच्या केबिनमध्ये तिला बोलावून विचारता आले असते, पण कोणाचा गैरसमज व्हायला नको म्हणून मी बाहेर सिस्टर बसतात त्या टेबलवर आलो… तिथलीच एक फाइल हातात घेऊन म्हणालो,

    “राधा, थोडा बात करने का तेरे से.”

    “बोल डॉक्टर…”

    आवंढा गिळत स्वतःवर नियंत्रण ठेवत मी विचारले, “सुमन के घरवाले से तेरा कुछ चक्कर चल राहा है क्या?”

    तिची प्रतिक्रिया काय असेल, याबद्दल मी साशंक होतो. ती एकदम संतापून काहीतरी उत्तर देईल – “खोटं कशाला बोलतोस?” किंवा “तुझा काय संबंध?” असं काही म्हणेल…

    पण ती उदास हसली.

    “किसने बोला तेरेकु? चेचीने?”

    “किसने बोला वो जानेदे. बात सही है क्या?”

    “हां, सही है,” ती काहीशा निग्रहाने काहीशा उद्दाम स्वरात म्हणाली. मला धक्काच बसला. ती पुढे काही बोलणार तोच डिलक्स रूममधला पेशंटचा नातेवाईक काही कम्प्लेन्ट घेऊन आला. त्याला बघून येईपर्यंत एक नवीन पेशंट आला. ते सगळे निपटेपर्यंत एक वाजला. बरेचदा 1-2 वाजता आम्ही झोपून जातो. सिस्टर बसल्या-बसल्या टेबलवर… मी केबिनमध्ये. पण आज झोप उडाली होती. दोन वाजेपर्यंत सगळे पेशंट त्यांचे नातेवाईक गाढ झोपी गेलेले पाहून मी बाहेर आलो आणि राधाला म्हणालो, “चल बाहर बैठते हैं.”

    आम्ही बाहेर आलो. हॉस्पिटल दुसऱ्या मजल्यावर होते. आम्ही जिन्यात बसलो पायरीवर. वरती मंद प्रकाश असलेला दिवा होता. मी राधाचा हात हातात घेतला. जेणेकरून तिला आधार वाटावा.

    “हां, अब पुरी बात बता.”

    राधाने सांगायला सुरुवात केली –

    वडिलांनी आणि सुमनने ठरवले की, राधाला मुंबईत आणायचे. राहायची व्यवस्था होतीच. नोकरी केली तर, दोन पैसे मिळतील आणि सुमनच्या लहान मुलीकडे बघायलाही होईल… राजू आणि राधा एकमेकांकडे केव्हा आकर्षित झाले ते सांगणे मुश्किल. कदाचित, त्या छोट्या छोट्या दोन खोल्यांत वारंवार एकमेकांना बघून किंवा कदाचित, काही खासगी गोष्टी लपवता येणे कठीण असल्याने किंवा राधाचे सुमनच्या तुलनेने उसळते यौवन… नजरेची भाषा झाली आणि मग सगळेच झाले.

    घरात दोघे असल्यावर जे नको व्हायला होते, तेही झाले. दोघांत शरीरसंबंधही झाले आणि मग ते पुन्हा पुन्हा होतच गेले. हे सगळे चूक आहे, आपण आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करतो आहे, हे तिला समजत होते, पण ती त्यातून बाहेर पडू शकत नव्हती.

    हे सारे सांगत असताना राधा भावनिक होत होती, रडत होती… माझ्या दृष्टीने तर हे खूप धक्कादायक होते. राजूशी माझे शारीरिक संबंध आहेत, असे तिने सांगितले, तेव्हा तर मी सुन्नच झालो. कदाचित, राधा सिस्टर म्हणून किंवा माझी मित्र म्हणून जितकी चांगली होती, तितकीच ती चारित्र्यवान असेल, अशी कल्पना मी बाळगली होती, त्याला मोठा धक्का बसला होता. तरी मी सावरलो. राधाने ज्या प्रामाणिकपणे मला सगळे सांगितले, किमान तो विश्वास मी कमावला होता. रडत रडत राधाने माझ्या खांद्यावर डोके ठेवले. मी तिला हळूवार थोपटत गेलो.

    एकदम मला काय वाटले कोण जाणे, मी माझी मान वळवली आणि तिच्या गालाचे ओझरते चुंबन घेतले. राधाने काहीच आक्षेप घेतला नाही, तिने मला घट्ट पकडून ठेवले. मी फक्त तेवीस वर्षांचा होतो. शारीरिक सुखाबाबत मी अनभिज्ञ होतो. मी तिला काय सल्ला देणार?

    तरीही मी म्हणालो, “राधा ये गलत है. चेचीने तुम दोनों को रेड हँडेड पकड लिया, तो वो तुझे वापस केरल भेज देगी.”

    “मैं क्या करू डॉक्टर, राजू को छोडने का दिल नहीं करता.”

    “छोडना ही पडेगा…”

    राधा काहीच बोलली नाही. माझा खांदा घट्ट धरून कितीतरी वेळ ती बसून राहिली. चार-साडेचार वाजले असावेत. कारण रस्त्यावरच्या वर्दळीने वेग पकडला. दुधाच्या आणि भाज्यांच्या गाड्या…

    आम्ही उठलो. सुदैवाने, कोणी नवीन पेशंट आला नव्हता आणि ॲडमिट पेशंटपैकीही कोणाला त्रास झाला नव्हता. मी हॉस्पिटलचा दरवाजा उघडणार त्याआधीच राधाने मला थांबवले माझ्या गालावर ओठ टेकले आणि कुजबुजली,

    “डॉक्टर बहुत अच्छा है तू…”

    त्यानंतर फारसे काही घडले नाही. केतन परत आला. मी पुन्हा दिवसाच्या ड्युटीवर आलो. राधा आणि मी पूर्वीसारखेच वागत होतो… जणू त्या रात्री काही घडलेच नाही! सुमनला मी सांगितले की, “राधाला राजूपासून दूर राहायला सांगितले आहे; पण राधाचे म्हणणे आहे की, तिचे आणि राजूचे तसले काहीच नाही.”

    मात्र त्या रात्रीनंतर राधाचे हसणे पूर्णपणे बंद झाले.

    चार-पाच दिवसांनी मला घरून अचानक फोन आला की, “आजी सीरियस आहे” म्हणून. मी, काका-काकू मिळेल त्या गाडीने गावी गेलो. आजी दोन दिवस राहिली आणि वारली. त्यानंतर आजीचे तेरावे होईपर्यंत मला गावीच राहावे लागले. तब्बल पंधरा दिवसांनंतर मी परत मुंबईत आलो. हॉस्पिटलला आल्या आल्या आधी राधाचा तपास केला, तर ती आठ-दहा दिवसांपासून आलेली नसल्याचे कळाले. तीच काय, सुमनही आलेली नव्हती! दोघींचे फोनही बंद येत होते. राधा नसल्याने मी अस्वस्थ झालो. असा एकही दिवस गेला नसेल की, तिच्याशिवाय मी हॉस्पिटलला काम केले असेल. मी सगळ्या स्टाफला विचारले कोणालाच काहीच माहीत नव्हते.

    आमच्या सरांनी तर मलाच राधाबद्दल विचारले… कदाचित ती मला सांगून कुठे गेली असेल… सिस्टर सुषमा, रिसेप्शनिस्ट केतकी, वॉर्डबॉय अशोक, सफाईवाली मंजुबाई या सगळ्यांना दोन-दोनदा विचारून झाले. शेवटी सुषमाकडून राधाचा विक्रोळीचा पत्ता घेतला आणि ड्युटीवर न जाता विक्रोळीला गेलो. स्टेशनहून सरळ रिक्षा केली, तरीही घर सापडायला अर्धा तास लागला. जुनी लांब चाळ होती. तशी फारशी स्वछता नव्हतीच. कोंबड्या कलकलत होत्या… फोडणीचा, माश्यांचा वास पसरला होता… दुपारची वेळ असल्याने घरी बहुतांश बायकाच होत्या. एक लुंगीवाला काळा सावळा माणूस मात्र सापडला. त्यालाच राधाबद्दल विचारले…
    “तुम्ही कोण? “असे त्याने विचारल्यावर मी धडाधडा हॉस्पिटल, त्या दोघी सिस्टर अचानक कामावर न येणे अशा गोष्टी सांगितल्या. मराठी माणूस असल्याने मोकळेपणाने बोलता आले.

    “काय माहीत? पण दोघी बहिणींचे जोरदार भांडण झाले त्यादिवशी आणि आधी ती छोटी बहीण सामान बांधून गेली… नंतर मोठीही मुलीला घेऊन गेली.”

    “आणि राजू?”

    “त्याचा तर पत्ताच नाही.”

    “काही सांगून गेल्या का?”

    “नाही. भांडण कशावरून झाले, तेही समजले नाही. काय उन्दूगुंडू बोलतात काय माहीत? पण पुढच्या चाळीत एक त्यांची नातेवाईक राहते. संध्याकाळी भेटेल. तिच्याकडे त्यांचा केरळचा पत्ता मिळू शकेल…”

    हेही वाचा – प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा

    केरळचा पत्ता घेऊन मी काय करणार होतो? निराश होऊन मी निघालो. त्यानंतर 15 दिवसांतच मी विंग्ज हॉस्पिटल सोडले. राधा नसताना काम करणे अशक्य होते. नंतर मुंबईच सोडले.
    काळ पुढे जातच राहिला. सुषमाचा नंबर होता. तिला अधूनमधून फोन करायचो. राधा त्यानंतर आलीच नाही. पुढे सुषमानेही ते हॉस्पिटल सोडले…

    राधा पुसट होतं गेली मनातून. पण पूर्णपणे गेली नाही.

    कधीतरी कोणी मुंबईचा माणूस गावाकडे भेटतो आणि म्हणतो, ‘मी विक्रोळीला राहतो…’ ते ऐकल्यावर म्हणावेसे वाटते की, “त्या चाळीत जाऊन विचारशील का, की राधा परत आलीये का?” माझ्या मूर्खपणाचे मलाच हसू येते. आता ती चाळ जाऊन तिथे टोलेजंग इमारत उभी राहिली असेल. पण मन वेडे असते. कदाचित राधा परत आली असेल, असे वाटते.

    कधीतरी मी झोपेत असताना कोणीतरी माझ्या गालावर हलकेच ओठ टेकवतं आणि कुजबुजतं
    “डॉक्टर बहुत अच्छा है तू…” मी जागा होतो… आणि राधाला हाक मारतो. पण ती स्वप्नातही येत नाही. माझे डोळे भरून येतात. पण ते अश्रू गालावर ओघळण्याआधी मी ते टिपून घेतो. राधाने माझ्या गालावर टेकवलेल्या तो ओठांचा स्पर्श माझ्याच अश्रूंनी निघून जायला नको…

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    September 30, 2026 ललित

    मोहोर

    September 30, 2026 ललित

    नकारातून साकार

    September 29, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    By दीपक तांबोळीSeptember 30, 2026

    भाग – 1 “कुलकर्णी, अहो कुलकर्णी…” चव्हाणांनी गेटवर उभं राहून हाक मारली, तसं कुलकर्णींनी दार…

    मोहोर

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    September 30, 2026

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026

    मोहोर

    September 30, 2026

    घरातील देवघरात पूजा करताना तोंड कोणत्या दिशेला असावे?

    September 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अर्जुना तयापरी, सरली द्वैताची वारी 

    September 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 454
    • अवांतर 214
    • आरोग्य 152
    • पंचांग आणि भविष्य 606
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 961
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    September 30, 2026

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026

    मोहोर

    September 30, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.