बेसन भातासाठी साहित्य
- बारीक चांगले तांदूळ – दोन वाट्या
- दही – दोन वाट्या
- चण्याच्या डाळीचे पीठ (बेसन) – एक वाटी
- शेंगदाणे – अर्धी वाटी
- नारळ – अर्धा
- ओल्या मिरच्या – चार-पाच
- लसूण – चार-पाच पाकळ्या
- मोहरी – अर्धा चमचा
- कोथिंबीर – चिरलेली मुठभर
- फोडणीचे साहित्य
- हळद – एक चमचा
- मीठ – चवीनुसार
कृती
- तांदूळ व्यवस्थित धुऊन घ्यावेत.
- तेलात बेसन चांगले भाजून घ्यावे.
- नंतर फोडणी करून त्यात लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत.
- त्यावर तांदूळ घालून ते तांबूस होईपर्यंत परतून घ्यावेत.
- नंतर त्यात हळद, चवीप्रमाणे मीठ (हवे असल्यास आणखी थोडे लाल तिखट घालावे) आणि गरम पाणी ओतावे.
- भात बोटचेपा होत आला, की त्यात भाजून घेतलेले बेसन, नारळाचे खोवलेले खोबरे, दही, शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून भात झाऱ्याने चांगला हलवून घ्यावा.
- नंतर तो मंद आचेवर ठेवून वर झाकण ठेवावे आणि (शक्य असल्यास) झाकणावर निखारे घालून चांगली वाफ येऊ द्यावी.
हेही वाचा – Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात
चिंचेच्या सारासाठी साहित्य
- नवी चिंच – अर्धी वाटी
- गूळ – दीड वाटी
- मीठ – चवीनुसार
- तिखट – अर्धा चमचा
- सुक्या मिरच्या – तीन-चार
- कढीलिंब – सात-आठ पाने
- फोडणीचे साहित्य
हेही वाचा – Recipe : चटपटीत लाल मिरच्यांचे लोणचे, खमंग गाजराचे लोणचे
कृती
- चिंच धुऊन गरम पाण्यात भिजत ठेवावी. नंतर ती कोळून सहा ते आठ वाट्या पाणी तयार करावे.
- त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ घालावे आणि आंबट अगर गोड ज्या प्रमाणात पाहिजे असेल, त्या प्रमाणात गूळ घालावा.
- नंतर फोडणी करून त्यात सुक्या मिरच्यांचे तुकडे आणि कढीलिंब घालून ती फोडणी चिंचेच्या पाण्याला द्यावी आणि सार चांगले उकळावे.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


