Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » निसर्गाची अलार्म सिस्टीम
    आरोग्य

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरSeptember 24, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर, निसर्गाची अलार्म सिस्टीम, शरीर अलार्म सिस्टीम, शारीरिक व्याधी, व्याधींकडे दुर्लक्ष, ओषधोपचाराचे गांभीर्य, तीन टप्प्यांचा अलार्म, शरीराची कुजबूज
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अंगदुखीसाठी पन्नाशीच्या आसपासचे एक गृहस्थ ओपीडीत आले होते. बीपी थोडं वर असल्यानं त्यांना मी विचारलं…

    “नियमित कोणती औषधं सुरू आहेत?”

    तर ते म्हणाले, “बीपीच्या काही गोळ्या सुरू होत्या, पण बंद केल्या. यासंदर्भात तसा काहीच त्रास नाही.”

    “मग बीपीच्या गोळ्या कुणी आणि का सुरू केल्या होत्या?” – मी

    “एक दिवस छातीत थोडं दुखलं… अपचन गॅसेसही होते… तडक डॉक्टरांकडे गेलो ते म्हणाले, ”बीपी नॅार्मल आहे, पण काही तपासण्या करू.” ते रिपोर्ट बघून अँजिओग्राफीही केली. तीही नॉर्मल आली… पण गोळ्या चिटकल्याच, सवय लागेल म्हणून मीच बंद केल्या!”

    ‘सवय लागेल’ म्हणून औषधं बंद करणारी किंवा न घेणारी आणि भारंभार वाईट सवयी असणारी ही प्रजाती केवळ भारतातच सापडते…

    असं होत नसतं… त्यांना त्यांच्या आजाराची क्रोनोलॅाजी सांगितली. तुम्हालाही सांगतो…

    मी – “डॉक्टरकडं जाण्याची फारशी सवय नाही. “एवढं तेवढं दुखणं तर चालतंच,” असं म्हणत तुम्ही अनेक दिवस जनरल का होईना चेकअप टाळलं… हो ना?”

    गृहस्थ (आठवून) : “हो… तसं म्हणता येईल.”

    मी – “मग एकेदिवशी सहज बसले असताना छातीत थोडा जडपणा जाणवला. तुम्हाला वाटलं ‘गॅस असावा’… मग सोडा प्यायले आणि अँटासिड घेत दुर्लक्ष केलं हो ना?”

    गृहस्थ : “हो.”

    मी – “हे शरीरानं पाठवलेलं पहिलं नोटिफिकेन होतं; पहिला SMS… धोक्याचा इशारा क्रमांक एक!

    काही दिवसांनी थोडं चाललं तरी, दमल्यासारखं वाटू लागलं. थोडं काम केलं तरी घाम येऊ लागला. क्षणभर वाटलंही की, “डॉक्टरकडं जाऊ या…” पण “थोडं वय झालंय, असं होणारच!” म्हणत पुन्हा दुर्लक्ष केलं; हा होता धोक्याचा इशारा क्रमांक दोन!

    मग एक दिवस सकाळी डाव्या हातात वेदना. थोडी मानदुखी…

    “हे हार्टचं लक्षण असू शकतं,” त्वरित जाणवलं… पण तुम्ही हसले आणि पेनकिलर घेत सोडून दिलं… हा होता धोक्याचा इशारा क्रमांक तीन!

    हेही वाचा – हिथ लिजर आणि आपण

    मग एकदा सकाळी चहा घेताना अचानक छातीत थोडं दुखलं. श्वास घ्यायला किंचित त्रास होऊ लागला. थंड घाम सुटला आणि आता मात्र शरीर ओरडलं, ‘इमर्जन्सी अलर्ट’… दवाखाना गाठला. काही दिवस ॲडमिट. थेट ब्लॅाकेजेस नाही आले, पण हृदयाकडचा रक्तपुरवठा निश्चितच बाधित होता आणि त्यासाठी डॅाक्टरांनी औषधंही सुरू केली…

    औषधं घेऊन प्रारंभी बरं वाटलं, नंतर ती ओझं वाटू लागली…

    हे सगळं अचानक झालेलं नव्हतं; शरीर गेल्या तीन-चार महिन्यांपासून इशारे देत होतं, पण तुम्ही ऐकलं नाही…”

    बहुतेक गंभीर आजार अचानक येत नाही. ते आधी छोटे संकेत देतात… जसं छातीत जडपणा, थकवा, चक्कर, डोकेदुखी, तहान, लघवी वाढलेली, रात्री अधूनमधून खोकला, वारंवार अंगदुखी… हे सगळे ‘ट्रेलर’ असतात; खरा पिक्चर तर नंतर येतो.

    शरीराची एक अलार्म सिस्टीम असते आणि ती तीन टप्प्यांत काम करते. पहिल्या टप्प्यात थोडं दुखणं, थकवा, अस्वस्थता… दुसऱ्या टप्प्यात हीच लक्षणं वाढतात, कामात बाधा आणतात… आणि तिसऱ्या टप्प्यात अचानक वेदना सुरू होतात, अस्वस्थता वाढते, प्रचंड त्रास होतो…

    हेही वाचा – बीपी आणि शुगरच्या गोळ्या सुरू आहेत…

    ‘शहाणा’ माणूस पहिल्याच टप्प्यात थांबतो. आपलं शरीर म्हणजे निसर्गानं दिलेली मोफत अलार्म सिस्टीम आहे. ती खराब झाली की, स्पेअर पार्ट्स मिळत नाहीत, म्हणून कुठल्याही वेदनांकडं दुर्लक्ष करू नका. वारंवार लक्षणं असतील तर तपासणी करा… आणि ‘नंतर बघू’ तर अजिब्बात म्हणू नका!

    थोडक्यात लक्षात ठेवा – शरीर आधी कुजबुजतं, ऐकलं नाही तर ओरडतं आणि तरीही दुर्लक्ष केलं तर थांबतं…

    कायमचं!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026 आरोग्य

    आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब

    September 19, 2026 आरोग्य

    गणेशोत्सव आणि आयुर्वेद

    September 15, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    Homeopathy : होमिओ आख्यान

    By डॉ. शैलेंद्र वैशंपायनSeptember 20, 2026

    संपूर्ण जगाच्या पाठीवर भारतासारखी संस्कृती शोधूनही सापडणे कठीण. या संस्कृतीचे एक विलक्षण वैशिष्ट्य आहे —…

    आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब

    September 19, 2026

    गणेशोत्सव आणि आयुर्वेद

    September 15, 2026

    शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!

    September 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026

    सुधाकररावांचा सन्मान

    September 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 447
    • अवांतर 214
    • आरोग्य 150
    • पंचांग आणि भविष्य 596
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 942
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.