Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » विभक्त
    ललित

    विभक्त

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेSeptember 21, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मी मराठी, अभिजात मराठी, अतुला प्रणव मेहेंदळे, अतुला मेहेंदळे, लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे, विभक्त कुटुंब, मुलाची जबाबदारी, संसाराची मुलावर जबाबदारी, मुलाचा स्वतंत्र संसार, समंजस मीनाताई, जयंतरावांची नाराजी, सोहन निहिरा, मुलाचा स्वतंत्र संसार, मुलगा सूनेला प्रायव्हसी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “मीना, अगं तू अशी काय बसलीस? अगदी काहीही न झाल्यासारखी! मी इथे इतका अस्वस्थ आहे आणि तू चक्क गाणी ऐकतेयस. तेही ‘पिया तू अब तो आजा…’ अशी! मला वाटलं नव्हतं, तू इतकी बेपर्वा वागशील…” असं म्हणतच पायात चप्पल सरकवून जयंतराव टिळक वाचनालयाचं पुस्तक बदलायच्या निमित्ताने बाहेर पडले. त्यांनी मीनाला बोलायची संधीच दिली नाही आणि मीनाला याचं काहीच वाटलं नाही.

    मीना जयंत टिळक, एका सुखवस्तू घरातली गृहिणी. लग्नाला आता जवळपास 35 वर्षं झाली. जयंतराव सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झालेले. त्यांना एक मुलगा सोहन आणि मुलगी अमृता! जिचं लग्न होऊन सासरी आनंदात रहात आहे. सोहनची बायको निहिरा. ती सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि मोठ्या कंपनीत कामाला. मीनाताईंना एक गोंडस नात पण आहे श्रिया टिळक! जी इयत्ता दुसरीत शिकत आहे. तर, एकंदर सगळं छान चालू होतं.

    गेली कित्येक वर्ष मीनाताई सकाळपासूनच सगळ्यांसाठी, म्हणजे अगदी सगळ्यांसाठीच, आनंदाने घरातली कामं करायच्या. कधीही तक्रार नाही की, धुसफूस नाही. सुनेचं आणि त्यांचं छान पटत होतं, असं सगळ्यांना वाटत तरी होतं. पण अचानक काय झालं कोण जाणे… दोन दिवसांपूर्वी सोहनने जेवणाच्या वेळी सगळ्यांवर एक बॉम्ब टाकला. तो म्हणाला, “आई-बाबा आम्ही पाषाण रोडला एक घर घेतलं आहे. त्याची चावी मागच्याच आठवड्यात मिळाली.”

    जयंतराव अवाक् झाले. ते आणि मीनाताई बघतच बसले सोहनकडे. तो निहिराकडे बघून पुढे बोलायला लागला. “आता आमचा विचार आहे, तिकडे रहायचा. तुम्हाला हवं तर तुम्हीही तिथे या. आता आपलं हे घर लहान पडतं ना, म्हणून तिकडे मोठं घर घेतलं. पण तुम्ही काही पेठ सोडून जायला तयार होणार नाही, हे आम्हाला दोघांना आधीच माहिती होतं. त्यामुळे तुम्ही म्हणत असाल तर आपण लांब राहून एकत्र राहूया. त्याने प्रेम अजून वाढेल.” एवढं सगळं बोलून तो शांत झाला. त्यावर थोडा वेळ निःशब्द शांतता पसरली.

    मीनाताई एकंदर परिस्थिती बघून म्हणाल्या, “अरे वा! आमच्या लेकाने स्वतःचं घर घेतलं, हे ऐकूनच आज पोट भरलं रे. कित्ती आनंदाची बातमी आहे ही. अशी जेवणाच्या टेबलवर काय सांगतोस. उद्या येताना छान पेढे आणा आणि देवाला दाखवा. अभिनंदन तुम्हा दोघांचं आणि हो आमच्या लाडक्या परीचंही.”

    हेही वाचा – वेळ

    आता मात्र जयंतराव चक्रावले. मीनाला काहीच वाटलं नाही, हे बघून ते त्यावेळी तरी गप्पच बसले. त्यावर निहिरा म्हणाली, “म्हणजे आईबाबा तुमची काही हरकत नाही ना? आपलं तसं छानच चालू आहे इथे. पण आपलं कुटुंब आता वाढतंय ना? आता श्रियाला पण वेगळी बेडरूम हवी, एक-दोन वर्षांनी. म्हणून मग ठरवलं आपण कर्ज काढायचं, तर आत्ताच काढू. नंतर काही केल्या जमत नाही… आणि तुम्ही अधून मधून तिथे आलात तरी काहीच हरकत नाही, अहो.” त्यावर मीनाताई म्हणाल्या, “हो हो.. नक्कीच. चला आता जेवूयात का? तुमच्या बाबांना गोळ्या घ्यायच्या असतात नं. जेवणाला उशीर नको.” असं म्हणून त्यांनी तो विषय तिथेच थांबवला. तेव्हापासून जयंतराव बोलतच नव्हते मीनाताईंशी. आजही तणतणतंच बाहेर पडले.

    या दोन दिवसांत मीनाताईंना आतून खूप वाईट वाटत होतं. पण त्या दाखवत नव्हत्या. आता मात्र घरात कुणी नाही बघून त्यांचा बांध फुटला. सोहनच्या लहानपणापासूनचे दिवस त्यांना आठवायला लागले… सगळ्या स्मृती एकच सांगत होत्या सोहन पहिल्यापासूनच तसा ‘ममाज् बॉय’ होता. आईशिवाय त्याचं पान नाही हलायचं. अगदी बायको निवडायचा निर्णयही त्याने आईसोबतच्या साधकबाधक चर्चेत घेतला होता. पण आता या सगळ्या गोष्टी मीनाताईंना आतून पोखरत होत्या… “मला उगीच वाटत होतं की, सोहनला अजूनही आई लागते. प्रत्येक वेळी माझ्या मनाप्रमाणे त्याने स्वतःचा निर्णय घेतला म्हणून हे असं समजणं म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे माझा. मी विसरलेच होते की, त्याला आता स्वतःचे निर्णय घ्यायला हवेत. आता तो मोठा झालाय आणि मी म्हातारी! किती दिवस तो असा आपल्या पंखाखाली राहणार? पण तरी मन अजिबातच मानत नाहीये. आपण बोललो खरं जा म्हणून पण ते अगदी मनाविरुद्ध होतं आपल्या. तेव्हापासून आपलं तरी मन कुठे थाऱ्यावर आहे…” असे असंख्य विचार त्या इतका वेळ करत होत्या की, त्या नादात त्यांना संध्याकाळ झाली हे ही लक्षात नाही आलं.

    “हे अजून कसे नाही आले. असूदे गेले असतील निर्मल भाऊजींकडे…” असं म्हणून त्यांनी संध्याकाळचा दिवा लावला आणि त्या तशाच देवासमोर हात जोडून बसल्या. एका वेगळ्याच वातावरणाची त्यांना अनुभूती झाली आणि बराच वेळ देवासोबत अंतर्मनीचं हितगुज करून त्या एका निष्कर्षावर पोहोचल्या…

    सोहन आल्यावर त्यांनी चक्क रात्री सांगून टाकलं, “सोहन तुम्ही तुमचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे तुम्ही तिथे रहा. आम्ही इथे आहोतच. उगीच हे घर बंद रहायला नको. तुझ्या बाबांची अख्खी हयात या घरात गेली, त्यामुळे ते आणि मी आम्ही इथेच छान आहोत.  निहिरालाही तिकडे मोकळेपणा मिळेल. ते काय तुमची प्रायव्हसी का काय ते! आपण गुण्यागोविंदाने वेगळे राहू. यातच शहाणपणा आणि भलं आहे.” सोहन, निहिरा खूश झाले. जयंतराव मात्र अजूनच रुसले.

    दुसऱ्या दिवशी दोघेही कामाला आणि नात शाळेत गेल्यावर जयंतरावांना स्वस्थ बसवेना. ते पडक्या स्वरातच म्हणाले, “मीना हे काय करतेस तू? काय वाईट चाललंय ग आपलं? मुलगा मान देत होता, सूनही प्रेमाने आई आई करत होती. मग तुला का हे असलं सुचतंय? आपण म्हणालो असतो आणि समजावलं असतं, तर थांबले असते ते! आणि श्रियाचा विचार कर जरा. तिला काय वाटेल. तिला आजी-आजोबांचं प्रेम हवंच ना?”

    त्यावर मीनाताई मंद हसल्या आणि म्हणाल्या, “अहो, या तुम्ही बसा इथे झोपाळ्यावर… बघा कसं छान वाटतंय.” आता मात्र जयंतराव चिडलेच, “अगं मी काय म्हणतोय आणि तुझं काय चाललंय. काही तारतम्य आहे का?” आता मात्र मीनाताई मोठ्यानेच हसल्या आणि म्हणाल्या, “अहो, त्यांनी तुम्हाला विचारलं, असं वाटतंय का तुम्हाला? त्यांनी त्यांचा निर्णय घेतला होता आणि आपल्याला फक्त सांगितला! निदान एक सुख म्हणूयात भांडून वेगळं नाही झालेत. नाहीतर पूर्णच संबंध तुटला असता. मग मी काल खूप विचार केला, तेव्हा माझ्या मनाने जे सांगितलं ते मी केलं. अहो आपली मुलगी पण परिस्थितीनुरूप सासू-सासऱ्यांपासून वेगळी राहतेच की. तिचं स्वतःच विश्व केलंच नं तिने तिथे. तेव्हा का नाही हा त्रागा केलात. आज सून म्हणतेय मुलाच्या आडून असं आपण म्हणतो, पण मुलाच्या मनात हे असल्याशिवाय तो हे मान्य करेल का? आता काय कुक्कुल बाळ आहे का तो? की कुणी सांगितलं आणि त्याने केलं. मग मी पण म्हणून टाकलं तिला, ‘रहा बाई वेगळे, रहा स्वतःच्या विश्वात.’ अहो, मुलं मोठी झालीत आता. चांगलं-वाईट कळतंय त्यांना स्वतःचं…

    …आणि काय हो, आज मला विचारताय काय झालंय तुला म्हणून? अहो सोहन, अमृता आणि आता आता सूनबाई सगळेचजण माझ्यावर एकच आरोप करत आहेत ना… आई तू ना उगाच चिडचिड करतेस. उगीच भांडत राहतेस आणि हे आताचं नाही… कैक वर्ष करताय अगदी तुम्हीसुद्धा. पण माझी का होते उगाच चिडचिड, याचा विचार करतात का ही मुलं? एक वस्तू नीट ठेवतील जागेवर तर शप्पथ. तरी इतकी वर्षं अपेक्षा केली नाही. कारण काय तर आई घरातच तर असते… किंवा मग मला काय कामं असतात घरात… पण मला सांगा घर काय माझं एकटीचंच आहे? की मला या वयातही विशीचा उत्साह आहे हे सगळं अंगावर ओढवून घेण्याचा! पण तुम्ही सगळ्यांनी मला गृहीत धरलं आणि मी पण कुटुंब म्हणून करत राहिले. सोहनला घर अंगावर पडणं म्हणजे काय हे कळायलाच हवंय आता. अशी कित्येक कामं आहेत, जी त्याच्यापर्यंत कधीच आली नाहीत. आता माझा मुलगा ही उद्याच्या भाजीसाठी मार्केटमध्ये धावलाच पाहिजे. लेकीला सकाळी प्यायला दूध नाही म्हटल्यावर त्याचाही जीव अडकला पाहिजे. हे सगळं मी इतकी वर्ष सांगतेय, पण करत कुणीच नाही. आता त्यांच्या घरात ते करतील आणि करावंच लागेल.

    आता बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. तशीच पुरुषांनी पण त्यांना मदत करायलाच हवी… आणि यापासून माझ्या मुलानेही सुटता कामा नये. आपले पंख किती दिवस पुरणार त्याला? आणि हेच ती चिमुकली पण पाहील आणि तिलाही चांगल्या सवयी लागतील अगदी आत्तापासूनच. हे सगळं जयंतराव त्या दोघांनाही त्यांचं घरच शिकवेल. म्हणूनच मला त्यांनी वेगळं राहण्यात काहीच गैर वाटत नाही…

    हेही वाचा – गुलकंद

    तुमचा काय झाला संसार माझ्यामुळे. पुढच्या पिढीचं तसं नाहीये. काय कळतंय का काही जयंतराव? आणि कुणालाही अडलं काही तर, आपण आहोतच की एकमेकांना. दूर राहिलं की, प्रेम वाढतं आणि टिकतंही! त्यामुळे आता सोडा हे सगळं. आपण आपली पुढची वर्षं एकमेकांसाठी घालवू. इतकी वर्षं जे अनुभवायचं आपलं राहून गेलं ते सगळं आता पूर्ण करून घेऊ. आपलं बऱ्याच ठिकाणी फिरायचं, बरंच काही करायचं राहून गेलं आहे या धकाधकीत. ते आता करू. काय?” सगळं ऐकल्यावर जयंतरावांना पटलं आणि त्यांनी डोळ्यांनीच होकार भरला.

    ते म्हणाले, “मीना खूप हुशार आहेस गं तू.. म्हणूनच म्हणा आपला संसार सुखाचा आणि आनंदाचा झाला. नाहीतर या दगडाशी कुणी जुळवून घेऊच शकलं नसतं!” असं त्यांनी म्हटल्यावर मीनाताई छानशा हसल्या आणि लाजतच म्हणाल्या, “चला काहीतरीच तुमचं.” या सुसंवादाने दोघांच्याही मनात साचलेली एकटेपणाची भावना निदान थोडा वेळ तरी बाजूला सारली गेली होती…

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे या ठाणे स्थित प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. त्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहेत. शिवाय, त्या LLB शिकलेल्या आहेत. मराठी लेखनही गेली काही वर्ष करत आहेत. वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरणे असे इतर छंदही जोपासले आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्या बऱ्याच कथांचं अभिवाचन वेगवेगळ्या ठिकाणी, Social media, You Tube इत्यादींवर केलं जातं. तसेच, दिवाळी अंक, वर्तमानपत्रात विविध कथा छापून येतात. त्यांना राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही बोलावले जाते. जे त्यांचा अनुभव अजूनच संपन्न करून जाते. आतापर्यंत 60हून अधिक कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या आहेत. व्यावसायिक कथालेखन न करता समाजाला आवडेल, रुचेल आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या हेतूने लघुकथा लिहिल्या आहेत. वय कमी असूनही लिखाणाचा सुरू झालेला हा प्रवास असाच पुढेही सुरू राहो.

    Related Posts

    एकटं टाकून…

    September 21, 2026 ललित

    Bookshelf : ‘स्वामी’… कालजयी कादंबरी

    September 20, 2026 ललित

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    एकटं टाकून…

    By डॉ. शिरीष कुलकर्णीSeptember 21, 2026

    पहाटेचा कोवळा प्रकाश बागेच्या पापण्यांवर अलगद विसावला आणि एकेक फूल जागं झालं. पानांच्या टोकांवर विसावलेले…

    Bookshelf : ‘स्वामी’… कालजयी कादंबरी

    September 20, 2026

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026

    विसर्जन

    September 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026

    एकटं टाकून…

    September 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : दीपकाची अर्ची, राहाटी वाहे घरींची

    September 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 सप्टेंबर 2026

    September 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 442
    • अवांतर 208
    • आरोग्य 149
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 592
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 934
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.