Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गौरीमायला निरोप…
    ललित

    गौरीमायला निरोप…

    नीता चंद्रकांत कुलकर्णीBy नीता चंद्रकांत कुलकर्णीSeptember 20, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नीता कुलकर्णी, लेखिका नीता कुलकर्णी, नीता चंद्रकांत कुलकर्णी, पारंपरिक गौरीपूजन, ज्येष्ठा गौरी, कनिष्ठा गौरी, अन्नाचा जपून वापर, गौरीमायची शिकवण, गौरीपूजन 2026, गौरीविसर्जन 2026, गौरीला निरोप, गौरीशी संवाद
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सोन्या रुप्याच्या पावलांनी गौरी घरात आल्या. प्रत्यक्ष त्या महालक्ष्मींचं आगमन होतं घरी… किती भाग्याची गोष्ट आहे ना! घरातल्या प्रत्येक खोलीत नेऊन त्यांना घर दाखवलं. दोघींना  नीट बसवलं. साडी,  दागिने हार घातले. आरती, मंत्रपुष्पांजली झाली. आल्या दिवशी साधी भाजी भाकरी… ती दाखवून झाली. दूध देऊन दोघींना आराम करायला सांगितलं.

    दुसऱ्या दिवशी सकाळीच लगबग सुरू झाली. पुरणावरणाचा स्वयंपाक, भाजी, कोशिंबीर, भात वरण… दोघींचा चेहरा तृप्त दिसत होता. गौरी प्रसन्न हसतमुख दिसत होत्या. घरात आनंद उत्साह भरला होता. तो दिवस गडबडीत गेला. रात्री निवांत दोघींसमोर बसले… समई तेवत होती. त्या प्रकाशात गौरीचा शांत, आश्वासक चेहरा उजळला होता. मनातलं तिला ओळखता येतंच, तरी सगळं तिला सांगितलं. तिच्याशी बोललं की, मन कसं शांत होतं!

    तीन दिवसांच्या पाहुण्या म्हणून आलेल्या गौरी… निघाल्या की परत! मुरडीचा कानवला, दहिभाताचा नैवेद्य दाखवला. अक्षदा टाकल्या… जाता जाता निरोप देताना म्हटलं,

    “आई, क्षणभर जरा थांबतेस का गं? तुझ्या लेकींचा निरोप सांगते तुला… गौरी माय तू यायच्या आधीच आम्हाला शहाणं केलं होतंस. यावेळी तुझं सांगणं सगळ्यांनी ऐकलं बरं का… त्यामुळे कोणी अन्न वाया नाही घालवलं, मोजकंच केलं. खूप जणींनी मला हे सांगितलं. त्यांचा स्वयंपाक लवकर झाला. एका ताईंची सवाष्ण दरवर्षी दोन वाजता जेवायची. यावर्षी त्यांनी तुला बारा वाजताच नैवेद्य दाखवला. तुझी आरती करून साडेबाराला घरच्यांना जेवायला वाढलं. खूप आनंदाने ताईंनी मला हे सांगितलं…

    लेकी-सुनाच घरच्या लक्ष्मी आहेत, ते सर्वांना फार पटलं बघ! किती जणींनी पहिल्यांदाच तुझ्यासमोर बसून श्रीसूक्त, देवी अथर्वशीर्ष, नवीन नवीन आरत्या म्हटल्या… तुझी गाणी गायली… तू ऐकली असशीलच, तरीपण सांगते गं आई…

    हेही वाचा – माझी गौरी माय

    बऱ्याच जणी शहाण्या आणि सुज्ञ झाल्या. तू सांगितलं तसं वागल्या… घरातले लोक  आनंदित झाले. हळूहळू जमेल तसा थोडा थोडा बदल करत आहेत सगळ्याजणी… तरी पण रूढी, परंपरा, रीती-रिवाज यांचा पगडा मनावर अजून खूप आहे. नव्हे, त्याचे दडपण आहे… बदल करताना मनात अजून थोडी भीती मात्र आहे. आई खरं सांगू का काय होतं… बदल केला आणि काहीतरी विपरीत घडलं की, वाटतं आपण बदल केला म्हणून हे असं झालं! लगेच मनात संशय येतो… देवी किंवा देव आपल्यावर  कोपला तर नसेल…

    हेही वाचा – आपला धर्म आणि संस्कृती

    आमचं कसं आहे, आमची प्रगती, भरभराट झाली, चांगल्या गोष्टी घडल्या की, आम्हाला वाटतं ते आमचं कर्तृत्व! माझ्यामुळेच ते झालं… मी कष्ट केले म्हणून ते झालं… असं आम्ही म्हणतो. त्यावेळी ही ‘देवाची कृपा’ असं क्वचितच म्हणतो. पण विपरीत काही झालं की, आम्ही आपलं देवावर ढकलून देतो. हे अगदी खरंखुरं आमच्या मनातल आज तुला सांगते बरं का!

    पण यापुढे नाही… आता आम्ही शहाणे होऊ… तू सांगितलं आहेस तसेच वागू… तसं तुला आश्वासन देते…

    भेटूया आता पुढच्या वर्षी… पुनरागमनायच…”

    असं म्हणेपर्यंत डोळे भरून आले होते. घर शांत झालं होतं. त्यांचं येणं आनंदाचं, सुखाचं समाधानचं असतं. घर भारुन टाकणार असतं. इतर कशाचीही आठवण या तीन दिवसांत येत नाही. त्यांच्याभोवती मन फिरत असतं. हे दिवस झटकन जातात…

    आता लक्षात येतं, त्यासाठीच गौरी घरी येतात… मन तृप्त करायला… भरपूर सुख, आनंद द्यायला! राहिलेले दिवस त्यांच्या आठवणी काढत सरतात… सुख-दुःख, राग-लोभ करत आपला प्रत्येकाचा  संसार चालूच राहतो…

    हात जोडून तिला सांगितलं – “गौरीमाय अपार सुख देणारी आहेस. तुझा आशीर्वादाचा हात सदैव आमच्या पाठीवर असू दे, हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना. तू साथीला असलीस की, आम्हाला बळ येतं गं माय…

    तुझ्याच सगळ्या लेकीबाळी.”

    Avatar photo
    नीता चंद्रकांत कुलकर्णी

    एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

    Related Posts

    विभक्त

    September 21, 2026 ललित

    एकटं टाकून…

    September 21, 2026 ललित

    Bookshelf : ‘स्वामी’… कालजयी कादंबरी

    September 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    विभक्त

    By अतुला प्रणव मेहेंदळेSeptember 21, 2026

    “मीना, अगं तू अशी काय बसलीस? अगदी काहीही न झाल्यासारखी! मी इथे इतका अस्वस्थ आहे…

    एकटं टाकून…

    September 21, 2026

    Bookshelf : ‘स्वामी’… कालजयी कादंबरी

    September 20, 2026

    विसर्जन

    September 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026

    एकटं टाकून…

    September 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : दीपकाची अर्ची, राहाटी वाहे घरींची

    September 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 सप्टेंबर 2026

    September 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 442
    • अवांतर 208
    • आरोग्य 149
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 592
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 934
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.