Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, September 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 6, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 06 सप्टेंबर 2026; वार : रविवार
    • भारतीय सौर : 15 भाद्रपद शके 1948; तिथि : दशमी 19:29; नक्षत्र : आर्द्रा 19:52;
    • योग : सिद्धि 09:44; करण : वणिज 08:41, बव 30:16;
    • सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:51;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    आदित्य पूजन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    कन्नड कवी मंजेश्वर गोविंद पै

    टीम अवांतर

    कन्नड कवी मंजेश्वर गोविंद पै यांचा जन्म 23 मार्च 1883 रोजी कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील मंजेश्वर या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मिशन स्कूलमध्ये झाले आणि नंतर ते मंगळूर येथील कॅनरा हायस्कूलमध्ये गेले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी पै मद्रास येथे गेले. मात्र वडिलांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांना परत यावे लागले.

    गोविंद पै हे आधुनिक कन्नड कवी व एक श्रेष्ठ संशोधक होते. गोविंद पै यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्‌मय, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांचा त्यांनी स्वयंप्रेरणेने व्यासंग केला. वीसहून अधिक भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या त्यांत ग्रीक आणि हिब्रू यांचाही समावेश होता. 60 वर्षांहून अधिक काळ त्यांनी साहित्य निर्मिती केली.

    हेही वाचा – नातवाचा ‘ध चा मा’ अन् आबा!

    त्यांची पहिली कविता ‘सुवासिनी’ त्याच नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली. ‘स्वदेशभिमानी’मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या कविता ‘सुभद्रा विलाप’ आणि ‘कालिया मर्दन’ या होत्या. या कवितांमध्ये आरंभिक यमक होते. या यमकबद्ध कविता 1903 ते 1910 या काळात ‘स्वदेशभिमानी’ नियतकालिकात प्रकाशित झाल्या.

    परंपरागत द्वितीय प्रासाचा (चरणातील दुसरे अक्षर तेच येणे) उपयोग न करता रचना करणारे गोविंद पै हे पहिले कवी होत. भावगीतांव्यतिरिक्त येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील गोलगोथा, गौतम बुद्धाच्या जीवनावरील वैशाखी, भगवान श्रीकृष्णावरील प्रभास आणि महात्मा गांधी यांच्यावरील देहली ही खंडकाव्येही त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे बुद्ध, कृष्ण आणि गांधीजी यांच्या अखेरच्या दिवसांवर ही खंडकाव्ये आधारलेली आहेत. त्यांची निवडक भावगीते गिळिविंडु या  संग्रहात आहेत.

    हेब्बेरळू आणि चित्रमानु  ही त्यांची दोन नाटके. यांपैकी पहिले नाटक एकलव्याच्या कथेवरील आहे तर दुसरे 1942 च्या छोडो भारत आंदोलनातील एका हुतात्याच्या जीवनावर आधारलेले आहे. काही जपानी ‘नो’ नाट्यांचाही त्यांनी कन्नड अनुवाद केलेला आहे. त्यांनी कन्नडमध्ये सॉनेट हा काव्यप्रकार देखील आणला.

    हेही वाचा – श्रीकृष्णाचे आपल्या जीवनातील स्थान

    गोविंद पै यांच्या संशोधनपर लेखांची संख्या 160 हून अधिक भरते. त्यांत कर्नाटक आणि तुळुनाडू यांचे इतिहास, प्राचीन भारत-ग्रीस संबंध, इतिहासकालीन राजांची, गौतम बुद्ध, महावीर यांसारख्या धर्मप्रवर्तकांची आणि प्राचीन कन्नड लेखक-कवींची कालनिश्चिती इ. विषयांचा समावेश होतो. धारवाड येथील ‘कन्नड संशोधन संस्थे’त दिलेली त्यांची खास व्याख्याने मुरु उपन्यासगळु या नावाने संग्रहीत करण्यात आलेली आहेत.

    सर्जनशील साहित्य आणि ऐतिहासिक संशोधन या दोन्हीही क्षेत्रांत गोविंद पै यांना सारखीच गती होती. देशभक्ती आणि सर्वधर्मीय सुसंवाद साधण्याची दृष्टी या त्यांच्या कर्तृत्वाच्या प्रेरणा होत. याहीपेक्षा ते मानवतावादी होते, हे अधिक महत्त्वाचे होय. ते स्वभावाने प्रसिद्धिपराङ्‌मुख होते. ही सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालेली दिसतात. त्यांची भाषाशैली खरंतर सहजसुबोध नाही. मात्र त्यांचा वैचारिक आशय उच्च कोटीतील असल्याने त्याला एक प्रकारचे शाश्वत मूल्य प्राप्त झालेले आहे.

    मद्रास राज्य शासनातर्फे 1948 साली त्यांना ‘राष्ट्रकवी’ हा बहुमानाचा पुरस्कार देण्यात आला. 1950 मध्ये मुंबई येथे भरलेल्या अखिल कन्नड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने एक राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला असून, मंजेश्वर येथील त्यांचे जुने घर राष्ट्रीय स्मारक बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोविंद पै यांचे 6 सप्टेंबर 1963 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 सप्टेंबर 2026

    September 5, 2026 पंचांग आणि भविष्य

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    By प्राजक्ता काथेSeptember 6, 2026

    मेष या आठवड्यात वास्तुविषयक समस्या सुटतील. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणचे वातावरण अनुकूल असेल. मात्र, त्याचबरोबर…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 सप्टेंबर 2026

    September 5, 2026

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 सप्टेंबर 2026

    September 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    मैत्रीण

    September 5, 2026

    नातवाचा ‘ध चा मा’ अन् आबा!

    September 5, 2026

    HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    September 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 423
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 568
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 899
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.