Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    उमानं ऐकली वंदनाची व्यथा

    August 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑगस्ट 2026

    August 29, 2026

    शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड

    August 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » उमानं ऐकली वंदनाची व्यथा
    ललित

    उमानं ऐकली वंदनाची व्यथा

    हेमा पाटीलBy हेमा पाटीलAugust 29, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, हे बंध रेशमाचे, हेमा पाटील, लेखिका उमा पाटील, उमाची सासू पारूबाई, उमाचे माहेरपण, उमाचे बाळंतपण, उमाचे पहिले बाळंतपण, उमा आणि अनघा मामी, उमा वंदना, मैत्रीण वंदनाची व्यथा, मुलगी झाल्याबद्दल नाराजी, वंदनाच्या कुटुंबीयांची नाराजी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 10

    “मामी, एकदम भारी झालीय भेळ. थोडी आणखी द्या.”

    “नको, जास्त खाल्ली तर रात्री जेवण जाणार नाही. तुझी इच्छा होती म्हणून बनवली. पित्त वाढेल याने. तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, नाही तर आजारी पडलीस तर तुझ्या सासरची माणसं म्हणतील, माहेरी गेली आणि आजारी पडून आली…” मामीचं हे बोलणं  ऐकून उमाने हात आवरता घेतला. दोघींनी चहा घेतला आणि थोडे चालण्यासाठी त्या बाहेर पडल्या.

    चालत पुढे गेल्यावर वंदना भेटली. उमाला फार आनंद झाला, कारण वंदनाचे लग्न झाल्यापासून दोघींची भेट कधीमधीच व्हायची. अवघडलेल्या वंदनाच्या बोटाला पकडून तिची साधारण तीन वर्षांची मुलगी चालत होती. तिच्याशी बोलत वंदना चालत होती. उमाला पाहून तिलाही खूप आनंद झाला. दोघींनीही एकमेकींना घट्ट मिठी मारली. ती चिमुकली या दोघींकडे टकामका बघत होती. उमाने तिचा गालगुच्चा घेतला आणि विचारले,

    “काय नाव गं तुझे?” ती लाजून म्हणाली,

    “शरयू.”

    “अय्या, छान आहे की तुझे नाव. मी तुला शरूच म्हणेन, चालेल?”

    तिने हसून मान डोलावली.

    हेही वाचा – कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    “मी कोण आहे माहीत आहे का?”  तिने नकारार्थी मान हलवली.

    “मी तुझी मावशी आहे मावशी. ही तुझी आई आणि मी कायम एकत्र असायचो…” ती आपली नुसतीच तोंडाकडे पाहत होती.

    “कधी आलीस गं वंदना? आई काही म्हणाली नाही, तू आली आहेस म्हणून.”

    “अगं, आजच आले. तू कशी आहेस? तू कधी आलीस?”

    “अगं, मी तर कालच आलेय. काकी आणि दादू डोहाळेबुत्ती घेऊन आले होते, तर आत्याबाई म्हणाल्या, जा, दोन दिवस माहेरी जाऊन ये. मला जरा चक्कर आली होती, त्यामुळे त्यांनी विश्रांतीसाठी पाठवले दोन दिवस.”

    “छान आहे, पण उद्या जर मुलगी झाली तर हे प्रेम, ही माया अशीच टिकवून ठेवा म्हणाव…”

    “म्हणजे काय गं?”

    “अगं मी यातून गेलेय म्हणून सांगितले.  शरयूचा जन्म झाला, त्यावेळी मला बघायला अगर भेटायला सासरचे कुणीही आले नव्हते. आले ते थेट बारशालाच.”

    “नवरा? तो पण आला नव्हता?”

    हेही वाचा – उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    “तो आठ दिवसांनंतर आला होता.”

    “मग तू रागावली नाहीस त्यांच्यावर? इतरांचे ठीक आहे, पण त्याने तरी लगेच यायला हवे होते ना! बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो‌.”

    “काय रागावून करायचं? इच्छा असती तर, तो त्याचदिवशी पण येऊ शकला असता. त्याला काय कुणी बांधून ठेवले होते का? मी काही बोलले असते तर, त्यावर गुळमुळीत उत्तर मिळाले असते फक्त मला. त्यामुळे मी काहीच बोलले नाही.”

    “मुलाला आणि मुलीला प्रसववेदना वेगवेगळ्या असतात का? या सासवा पण बाईच्या जन्माला येऊन अशा का वागतात?”

    “आता तर मला म्हणतात, मुलगा झाला तरच सासरी ये, नाही तर तिकडेच राहा.”

    “आणि नवरा? तो काय म्हणतो?” अस्वस्थ होऊन उमाने विचारले.

    “तो काहीच बोलत नाही, याचेच वाईट वाटते. तो आईला का ठणकावून सांगत नाही की, ‘गप्प बस, मुलगा, मुलगी काहीही झालं तरी मला फरक पडणार नाही, तर तू का बडबड करतेस?’ त्यामुळे त्याच्या मनातही तेच आहे हे समजून येतं.” वंदना एक उसासा टाकत म्हणाली.

    क्रमश:
    Avatar photo
    हेमा पाटील

    मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.

    Related Posts

    शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड

    August 28, 2026 ललित

    दोन कन्यादानांतून मिळाले दोन पुत्र

    August 27, 2026 ललित

    राजेशच्या भावांचे नेमके प्रपोजल काय?

    August 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड

    By प्रणाली वैद्यAugust 28, 2026

    भाग – 40 त्या क्षणी व्हिलाच्या शांततेत एक निर्धार उमटलेला होता — एक संघर्ष उडण्याच्या…

    दोन कन्यादानांतून मिळाले दोन पुत्र

    August 27, 2026

    राजेशच्या भावांचे नेमके प्रपोजल काय?

    August 27, 2026

    अशीही एक भाऊबीज… उत्तरार्ध

    August 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    उमानं ऐकली वंदनाची व्यथा

    August 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑगस्ट 2026

    August 29, 2026

    शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड

    August 28, 2026

    विदर्भ स्पेशल… वाटीभर मुगाच्या दाण्यांची कढईभर आमटी!

    August 28, 2026

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कडाडीं लोटला गाडा, शिखरौनि सुटला धोंडा

    August 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 412
    • अवांतर 206
    • आरोग्य 141
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 555
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 24
    • ललित 882
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    उमानं ऐकली वंदनाची व्यथा

    August 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑगस्ट 2026

    August 29, 2026

    शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड

    August 28, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.