Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मोकळीक

    August 25, 2026

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    August 25, 2026

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मोकळीक
    ललित

    मोकळीक

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरAugust 25, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मी मराठी, अभिजात मराठी, दिलीप कजगांवकर, लेखक दिलीप कजगांवकर, राजला मोकळीक, रीनाला मोकळीक, नेहाचा अमेरिकादौरा, रीना नेहाच्या घरी, रीना नेहा मैत्रिणी, राज रीना मैत्री, निर्व्यसनी राज,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    राज आणि नेहा एका टुमदार बंगल्यात रहात होते. बंगल्याच्या आजूबाजूला दाट हिरवीगार झाडी होती. बंगल्याच्या एका भागात पाहुण्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असलेला, सर्व सोयींनी सुसज्ज हॉल, बेडरूम, किचन आणि बाथरूम अशी स्वतंत्र व्यवस्था होती. नेहाला चार महिन्यांसाठी अमेरिकेला जायचे होते म्हणून ती तयारी करत होती, पण राज काहीसा काळजीत होता.

    “काय झालं?”

    “तू चार महिने नसणार… माझ्या जेवणाचं काय?”

    नेहा हसली… “मी शिकवते तुला!”

    नेहाने त्याला स्वयंपाक शिकवायला सुरुवात केली. पोहे, उपमा, भाजी, आमटी, भात आणि पोळी… पोळी सोडून बाकी बेचव का होईना, पण करता यायला लागलं. पहिली पोळी भारताच्या नकाशासारखी झाली… दुसरी आफ्रिकेसारखी… तिसरी पोळी पाहून नेहा म्हणाली, “राज, ही पोळी आहे की आधुनिक कला?”

    “मी शिकतो आहे नेहा, पण तू अमेरिकेहून परत येईपर्यंत माझा स्वयंपाक नक्की सुधारेल.”

    नेहा अमेरिकेला गेली. पहिले काही दिवस राजने कसाबसा स्वयंपाक केला. पण नोकरी, घर, स्वयंपाक, भांडी… सगळं एकट्याने करताना त्याची दमछाक होऊ लागली. एक दिवस हॉटेलमधील जेवणाच्या ताटाकडे पाहात तो स्वतःशीच म्हणाला, “बायको घरात असताना तिच्या स्वयंपाकाची किंमत कळत नाही. ती दूर गेल्यावर तिच्या हातचं साघं जेवणही पंचपक्वान्न वाटते!”

    पुढच्याच दिवशी एका अनोळखी नंबरवरून फोन आला.

    “सर, मी रीना. मला तीन महिन्यांसाठी राहायला घर हवं आहे. मी एकटीच राहणार आहे. तुमच्याकडे जागा मिळेल का?”

    “नाही मॅडम, सध्या मी एकटाच आहे, बायको काही दिवस परदेशी गेली आहे, त्यामुळे ते शक्य नाही.”

    “मग तर उत्तमच! अहो, मी छान जेवण बनवते, तुमच्यासाठी पण बनवीन.”

    ‘जेवण’ हा शब्द ऐकताच राजचा नकार मवाळ झाला.

    “मी बायकोला विचारून उद्या सांगतो.”

    हेही वाचा – प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    राजने नेहाला फोन केला,

    “नेहा, रीना नावाची बाई तीन महिन्यांसाठी राहायला जागा विचारतेय. ती माझ्यासाठी जेवणही बनवेल म्हणते.”

    “छानच! पण एक अट आहे. तू जेवायचं मात्र आपल्या इथे तिच्याकडे नाही आणि तिच्यापासून जरा दूरच राहायचं, समजलं?”

    “ठीक आहे,” राज खूश झाला.

    राजचा होकार मिळताच रीना आली. “मला अहो-जाहो आवडत नाही,” रीनाने आल्या आल्या स्पष्ट केले. सुंदर आणि आधुनिक तरुणी सोबतीला आणि जेवणाची पण सोय, राज खूश झाला.

    पहिले काही दिवस रीना चहा, नाश्ता आणि जेवण राजला पाठवित असे. एक दिवस रीना म्हणाली, “राज, आज जेवायला माझ्याकडेच ये. गप्पा मारत जेवूया.”

    “नको गं. नेहाने नाही सांगितलंय…”

    “अरे, एक दिवसाने काय होणार आहे? आणि तिला थोडीच समजणार आहे?”

    गरम पोळ्या, रस्सा भाजी, वरण-भात, वर साजूक तूप!

    “रीना, तू हे इतकं छान बनवतेस?” म्हणत राज भरपेट जेवला. त्या दिवसापासून राज रोज रीनाकडे जेवायला जाऊ लागला. जेवणानंतर गप्पा. कधी पत्ते, कधी चेस. वीकेंडला दोघे फिरायलाही जाऊ लागले.

    रीना फोटोग्राफर होती. तिच्याकडे नेहमी कॅमेरा असायचा. एकदा बाहेर फिरायला गेल्यावर ती म्हणाली, “राज, इकडे उभा राहा. तुझा फोटो काढते.”

    “माझा फोटो काढून काय करणार?”

    “फोटोग्राफरचं काम आहे फोटो काढणे!” राजने होकार दिला आणि त्यानेही तिचे फोटो काढले, पण दोघांचा एकत्र फोटो काढायचे दोघांनी शिताफीने टाळले.

    एक दिवस संध्याकाळी रीना म्हणाली, “राज, वाइन घेणार?”

    “नाही.”

    “का?”

    “मला सवय नाही आणि खरं सांगायचं तर वाइन आरोग्यासाठी चांगली नसते, उगाच सवय कशाला लावून घ्यायची?”

    रीना म्हणाली, “ठीक आहे.”

    दुसऱ्या दिवशी तिने सिगरेट पुढे केली?”

    “सिगरेट अजिबात नाही.”

    “एक तरी?”

    “नाही रीना. धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे. स्वतःचं नुकसान होतंच, पण आसपासच्या लोकांनाही त्याचा त्रास होतो. तूही ओढू नकोस.”

    रीना हसली… “ठीक आहे.”

    काही दिवसांनी दोघे पत्ते खेळत होते.

    रीना म्हणाली, “राज, पैसे लावून खेळूया का?”

    राजने पत्ते खाली ठेवले…

    “नको.”

    “अरे, थोडेच पैसे!”

    “नाही. पत्ते खेळायला हरकत नाही. पण पैसे लावून नाही. जुगाराची सुरुवात थोड्यापासूनच होते. फक्त मजा म्हणून खेळूया..”

    रीना म्हणाली, “ठीक आहे.”

    बघता बघता तीन महिने संपले. नेहा आता दोन आठवड्यांत परतणार होती.

    एके रात्री उशिरा नेहाचा फोन आला.

    “काय रे राज?”

    “काय?”

    “एकटा आहेस?”

    “हो.”

    “खरंच?”

    “हो गं!”

    “की रीनाबरोबर?”

    राज दचकला… “रीनाबरोबर आणि इतक्या उशिरा?”

    “म्हणजे आधी तिच्याबरोबर होतास?”

    “नाही गं. शब्दांत पकडू नकोस.”

    “ठीक आहे.”

    क्षणभर शांतता पसरली.

    मग नेहाने विचारलं, “या फोटोतील तरुणी कोण?”

    “कुठला फोटो?”

    नेहाने दोन फोटो पाठवले.

    राजने फोटो उघडले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

    एका फोटोमध्ये राज आणि रीना एका तलावासमोर अगदी खेटून उभे होते. दुसऱ्यात रीनाचा हात राजच्या खांद्यावर होता.

    राज घाबरला.

    “नेहा, हे फोटो तुला कोणी पाठवले?”

    “ते महत्त्वाचं नाही. आधी सांग — हे फोटो कधी काढले?”

    “पण…”

    “बोल राज, तुम्ही दोघे इतके जवळ कधी आलात?”

    “आम्ही फिरायला बरोबर गेलो होतो, पण इतक्या जवळ मात्र आलो नाही आणि एकत्र फोटोही नाही काढले.”

    “इतक्या नाही, मग किती जवळ आलात? आणि हे फोटो काय आपोआप आले?”

    “नेहा, मला खरंच समजत नाही.”

    “एक सांग, हे फोटो तुला कोणी पाठवले?”

    तेवढ्यात —

    डिंग डाँग… बेल वाजली.

    नेहा म्हणाली, “राज, बघ, तुझी ती रीना असेल!”

    राजने दार उघडलं. समोर खरोखरच रीना उभी होती…

    “राज, मला अजून दोन महिने इथे राहू देशील का?”

    राजने तिच्याकडे रागाने पाहत विचारले, “रीना, हे फोटो?”

    रीना काही क्षण शांत होती.

    “राज, माफ कर मला. मी फोटोग्राफर आहे ना… तुझे आणि माझे वेगवेगळे फोटो होते. मी फोटो एडिटिंगची ट्रिक वापरून एकत्र केले. आपण अगदी जवळ उभे आहोत, असा भास निर्माण केला.”

    राज अवाक् झाला.

    “पण ते फोटो नेहाला कसे मिळाले?”

    रीना हसली.

    “ते मीच पाठवले.”

    राजने चिडून विचारलं, “पण तुला नेहाचा नंबर—”

    पलिकडून नेहाचा आवाज आला, “मीच दिला.”

    राज बिचकला.

    “नेहा, तू दिलास?”

    “हो राज.”

    काही क्षण शांतता पसरली.

    नेहा म्हणाली, “राज, मला खूप आनंद झाला.”

    राजने आश्चर्याने विचारलं, “कशाचा?”

    “कारण तू वाइन नाकारलीस, सिगरेट नाकारलीस आणि पैसे लावून पत्ते खेळायलाही नकार दिलास.”

    “हे सर्व तुला कसं समजलं?”

    नेहा हसली.

    “रीना माझी जिवाभावाची मैत्रीण आहे. तिची पुण्यात राहण्याची सोय नव्हती आणि तुझी जेवणाची सोय नव्हती म्हणून मीच तिला तुझा नंबर दिला होता.”

    हेही वाचा – आंधळा मागतो एक डोळा…

    राजच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं.

    “रीना, तूही मला अजिबात पत्ता लागू दिला नाहीस?”

    रीना गप्प होती.

    नेहा पुढे म्हणाली, “राज, मी तुमच्या दोघांची माफी मागते.”

    “माफी? पण कशासाठी?” आता रीनाही दचकली.

    नेहा म्हणाली, “मी रीनाच्या हॉलमध्ये एक छुपा कॅमेरा लावला आहे. तुम्हा दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी.”

    राजच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अविश्वास एकाच वेळी उमटला.

    “म्हणजे?”

    “हो. मला बघायचं होतं, माझ्या गैरहजेरीत मिळालेल्या मोकळीकीचा तू आणि रीना काही गैरफायदा तर घेत नाही ना.”

    “आणि तुम्ही दोघंही पास झाला!”

    “राज, पण तुला मात्र एक शिक्षा…”

    “काय?” राजने जरा घाबरतच विचारले.

    “रीनाला अजून दोन महिने इथे राहू दे.”

    राजच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.

    “तिच्याबरोबर गरमागरम, स्वादिष्ट जेवण घे आणि हवं तर तुम्ही वाइनही घ्या…”

    राज आनंदाने म्हणाला, “हे तर बक्षीस आहे!”

    नेहा हसली.

    “हो, बक्षीसच समज. पण तुम्ही दोघे स्वतःचा तोल जाऊ देऊ नका.”

    क्षणभर थांबून ती मिश्कीलपणे म्हणाली, “छुपा कॅमेरा आहे हे विसरू नका!”

    राज कपाळावर हात मारत म्हणाला, “ही मोकळीक काय कामाची, नेहा?”

    नेहा हसत म्हणाली, “राज, कामाची आहे… पण कामासाठी नाही.”

    दोन आठवड्यांनी नेहा परतली. राज आणि रीना नेहाला घ्यायला एअरपोर्टला गेले. घरी येताना नेहाने गौप्यस्फोट केला, “राज आणि रीना, मी छुपा कॅमेरा लावलाच नव्हता. राज, तुला पूर्ण मोकळीक दिली होती, पण त्या न लावलेल्या कॅमेऱ्याने नव्हे तर, तुमच्यातील संस्कारांनी मोकळीकीवर लगाम ठेवला.”

    “राज, मला परत एक महिना अमेरिकेत जायचं आहे, जाऊ ना?”

    राजने विचारलं, “आता पुन्हा?”

    नेहा म्हणाली, “हो. पण यावेळी कॅमेरा असेल… छुपा नाही. रीनाचा कॅमेरा. हवे तसे फोटो काढायला… पण ते मलाही पाठवायचे!”

    राजने क्षणभर नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, “म्हणजे मोकळीक नाहीच!”

    नेहा, रीना आणि राज तिघेही खळखळून हसले.

    घरी पोहोचल्यावर रीना म्हणाली, “नेहा, आता तू इथे आहेस तोपर्यंत राजला पूर्ण मोकळीक दे बाई!”

    हे ऐकून राज खूश झाला आणि त्याने रीनाला मिठी मारली.

    रीना लाजत म्हणाली, “राज, मोकळीक इथे नाही… तिथे!”

    राज संकोचला आणि त्या दोघी मैत्रिणी मात्र मनसोक्त हसल्या.

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    August 25, 2026 ललित

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026 ललित

    अनपेक्षित

    August 24, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    By हर्षा गुप्तेAugust 25, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. हनी ट्रॅप (Honey trap)… जरा वेगळा…

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026

    अनपेक्षित

    August 24, 2026

    सोहोनी आजोबा आणि मोडक आजोबा यांच्या मैत्रीतील वळणे…

    August 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मोकळीक

    August 25, 2026

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    August 25, 2026

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 408
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 549
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 876
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मोकळीक

    August 25, 2026

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    August 25, 2026

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026
    Most Popular

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.