Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026

    अनपेक्षित

    August 24, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    August 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 25, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 25 ऑगस्ट 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 03 भाद्रपद शके 1948; तिथि : त्रयोदशी अहोरात्र; नक्षत्र : उत्तराषाढा 22:50;
    • योग : आयुष्यमान 07:40; करण : कौलव 19:12;
    • सूर्य : सिंह; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:00;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    भीमप्रदोष

    मंगळागौरी पूजन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    संगीतकार अशोक पत्की

    टीम अवांतर

    संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म 25 ऑगस्ट 1941 रोजी मुंबईतील खेतवाडीच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. गोवा हिंदू असोसिएशन या नाट्यसंस्थेचा त्या काळी मोठा बोलबाला होता. संस्थेच्या एका संगीत नाटकासाठी पेटीवाल्याचा शोध सुरू होता. पंडित जितेंद्र अभिषेकींसोबत काम करण्याची संधी त्यातूनच अशोकजींना मिळाली. संगीत मत्स्यगंधापासून त्यांचे आणि पंडितजींचे सूर जुळले ते शेवटपर्यंत. ‘तू तर चाफेकळी’ हे या द्वयीचे शेवटचे नाटक ठरलं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही.

    त्यानंतर पत्की यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना तसेच दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे.  “मिले सूर मेरा तुम्हारा”, “पूरब से सूर्य उगा” यांसारख्या त्यांच्या संगीत रचना अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. वादक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास संगीतकार, गीतकार अशा टप्प्यावर येऊन पोहोचला. 1972 पासून सुरू झालेल्या या प्रवासात पत्की यांनी आठ हजार पेक्षा जास्त जिंगल्स (जाहिरातींचे संगीत), चारशे नाटकांचे संगीत, सव्वाशे चित्रपटांना संगीत, 500 मालिकांची शीर्षकगीते यांना संगीत दिले आहे. सुमन कल्याणपूर यांनी गायिलेले ‘नाविका रे वारा वाहे रे’ हे गाणे अशोक पत्की यांनी अगदी पहिल्यांदा संगीतबद्ध केलेले गाणे आहे.

    हेही वाचा – श्रावणी सोमवारची कहाणी

    संगीताबरोबरच अनेक भावगीतांचे लेखक म्हणून देखील अशोकजी ओळखले जातात. सुरेश वाडकर यांनी गायिलेले ‘तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा’ किंवा स्वप्नील बांदोडकर याने गायिलेले ‘रंगात रंग तो शाम रंग’ सारख्या गीतांचे बोल अशोकजींच्या लेखणीतून साकारले आहेत. तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफबॉय, वॉशिंग पावडर निरमा, झंडू बाम, धारा धारा शुद्ध धारा अशा अगणित जाहिरातींची जिंगल्स अशोकजींनी संगीतबद्ध केली आहेत.

    1985 साली सुयोग नाट्य संस्थेतर्फे ‘मोरुची मावशी’ हे नाटक पुनरुज्जीवित करण्यात आले. त्याला अशोक पत्की यांनी संगीत दिले. या नाटकातील ‘टांग टिंग टिंगा’ या गाण्याने अफाट लोकप्रियता मिळवली आणि सुयोग नाट्य कंपनीला मोठा लोकाश्रय मिळाला. अभिनेता प्रशांत दामले यांची गायक म्हणून ओळख निर्माण करून दिलेल्या सगळ्या गीतांचे संगीतकार अशोक पत्की हेच आहेत.
    दूरदर्शनवरील खोट्या, झी मराठीवरील आभाळमाया, वादळवाट, आम्ही सारे खवय्ये, मानसी, अवघाचि संसार सारख्या अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांना अशोकजींनी संगीतबद्ध केले आहे. या मालिकांना 25 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला असला तरी ही शीर्षक गीते आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

    ‘सप्तसूर माझे’ हे त्यांचे आत्मचरित्र 2012 साली प्रसिद्ध झाले. आजही त्याच्या अनेक आवृत्त्या निघत आहेत. एका संगीतकाराचा प्रवास जाणून घेण्याचं कुतहूल रसिकांना, वाचकांना आहे यातच सारं काही आलय. अनेक रंगवळणं तसंच अनुभव याने हे आत्मचरित्र परिपूर्ण झालय. अभ्यासकांसाठी देखील ते संग्राह्य ठरत आहे.

    2006 मध्ये 54 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘अंतरनाद’ या कोकणी चित्रपटासाठी अशोकजींना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, नाट्य दर्पण पुरस्कार, रंग दर्पण पुरस्कार, मिक्टा पुरस्कार, सुरसिंगार पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार (अखिल भारतीय नाट्य आणि कलासंकुल), गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार, लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल), नवरत्न पुरस्कार (सह्याद्री – दूरदर्शन), राम कदम पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्सचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सारख्या असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


    आजचे राशिभविष्य

    मेष – कामाच्या ठिकाणी आज मोठ्या यशाची चिन्हे दिसत आहेत. तुमच्या पूर्वीच्या मेहनतीचे फळ स्पष्टपणे दिसून येईल. न्यायालयीन खटल्यांमध्ये दिलासा किंवा विजयाची बातमी देखील मिळू शकते. तुमची ओळख, प्रभाव आणि प्रतिष्ठा यात  वाढ होईल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या व्यावसायिक समस्या हळूहळू सुटतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनाला शांती मिळेल, नात्यांमधील जिव्हाळा टिकून राहील.

    वृषभ – समाजात आज तुमच्याबद्दलचा आदर वाढेल, लोक तुमच्या कार्यनिष्ठेची प्रशंसा करतील. एखाद्या विशेष सामाजिक कार्यक्रमातील तुमची उपस्थिती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवू शकते. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक गोड होईल, काही जुने रुसवेफुगवे कमी होतील. एकंदरीत, दिवस सुखद असेल, परंतु आरोग्यविषयक काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. बाहेरचे तळलेले किंवा अति मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

    मिथुन – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असू शकतो. कामाच्या ठिकाणी थोडासा निष्काळजीपणासुद्धा मोठृया समस्या निर्माण करू शकतो, त्यामुळे फक्त आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. नकारात्मक टीका मनावर घेऊ नका, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमची एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला नाराज करण्याचा प्रयत्न करू शकते. खूप दिवसांपासूनची एखादी इच्छा आज पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

    कर्क – आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या आणि मजा करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. मालमत्तेसंबंधीच्या एखाद्या प्रकरणामुळे थोडी चिंता निर्माण होऊ शकते, मात्र भावंडांच्या पाठिंब्यामुळे दिलासा मिळेल. वडिलधाऱ्यांसोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे. वाद वाढवण्याऐवजी प्रेमाने आणि संवादाने प्रश्न सोडवणे अधिक चांगले होईल.

    सिंह – अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आज पूर्ण प्रयत्न कराल, त्यातून चांगले परिणाम मिळतील. एखाद्या नवीन व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी सुरू करू शकता. संततीच्या यशामुळे तुम्हाला अभिमान आणि आनंद वाटेल. मात्र कोणत्याही मोठ्या उद्योगात गुंतवणूक करणे टाळा. अविवाहित व्यक्तींचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना देखील विचारात घ्याल.

    कन्या – तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य आज प्रबळ राहील. काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करेल. तुमच्या मेहनतीला फळ मिळेल अशी चिन्हे दिसत आहेत. नोकरीत बदल किंवा व्यवसाय विस्ताराची योजना आखू शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल, परीक्षेचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे निष्काळजीपणा टाळा.

    तुळ – आजचा दिवस आनंदाने भरलेला असू शकतो. वडीलधाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. अनपेक्षितपणे प्रवास करावा लागू शकतो.‌ प्रवासात तुमच्या वस्तू आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्या. दीर्घकालीन कर्ज फेडले जाण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका. उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.

    वृश्चिक – कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईने घेण्याऐवजी आज पुढे जाण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुमची समज तुम्हाला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन करेल. स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवनात किरकोळ तणाव निर्माण होऊ शकतो, परंतु तो संवाद आणि संयमाने हाताळता येईल. एखादी आनंदाची किंवा चांगली बातमी कौटुंबिक वातावरण सुधारेल. भावंडांचा पाठिंबा खूप उपयुक्त ठरेल.

    हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    धनु – आज तुम्हाला काही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा, कारण नंतर त्याचा पश्चात्ताप होऊ शकतो. विरोधक सक्रिय असतील, म्हणून तुमच्या योजना सर्वांना सांगू नका. नवीन घर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रियांची कसून तपासणी करा. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो, परंतु पुढे जाण्यापूर्वी जोखमीच्या पातळीचा विचार करा. संततीसोबत वेळ घालवल्याने तुमचा मूड हलका होईल.

    मकर – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. कामातील तांत्रिक अडचणी किंवा किरकोळ अडथळ्यांमुळे कामाचा वेग मंदावू शकतो. कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ काढा. विश्रांती आणि मनःशांतीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असेल. जोडीदाराला दिलेली वचने पूर्ण करायला विसरू नका; कारण यामुळे तुमच्या नात्यातील विश्वास टिकून राहील.

    कुंभ – बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढविण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात, यातून तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. एक जुना कायदेशीर खटलादेखील तुमच्या बाजूने निकाली लागू शकतो. कामाच्या ठिकाणी मिळणारी चांगली बातमी तुमचा उत्साह वाढवेल. एखाद्या भावाला तुमच्या मदतीची गरज भासू शकते, त्यामुळे तुम्ही मदतीसाठी पुढे याल. या पाठिंब्यामुळे तुमच्यातील नाते अधिक घट्ट होईल.

    मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. कामातील सुधारणांमुळे मूड हलका होईल आणि आत्मविश्वास वाढेल. आवडत्या व्यक्तीची अचानक भेट झाल्याने तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटू शकते. जोडीदारासोबतच्या मोकळ्या संवादामुळे तुमचा मानसिक ताण हलका होईल. संततीच्या करिअरसाठी तुम्हाला थोडी धावपळ करावी लागू शकते. घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्याची योजना आखू शकता, परंतु यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    August 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 ऑगस्ट 2026

    August 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरAugust 24, 2026

    जीवनप्रवास उलगडणारे 100 ज्योतिषीय मार्गदर्शक सूत्रे अशी आहेत – 27) कोणत्याही वयात – घोटाळे आणि…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 ऑगस्ट 2026

    August 24, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026

    अनपेक्षित

    August 24, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    August 24, 2026

    सोहोनी आजोबा आणि मोडक आजोबा यांच्या मैत्रीतील वळणे…

    August 24, 2026

    श्रावणी सोमवारची कहाणी

    August 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जो अखंड भोग जचे, जया व्यसन काम्यक्रियेचें

    August 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 406
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 549
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 873
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026

    अनपेक्षित

    August 24, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    August 24, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.