Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मालमत्ता, परदेशवारी, अध्यात्म

    August 17, 2026

    साताजन्माचे नाते

    August 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान

    August 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    म्हणे एक हेंचि आथी । येर जाणणें ते भ्रांती । ऐसी निकुरेंसी मती । मेरु होय ॥620॥ एवं निश्चयो जयाचा । द्वारीं अध्यात्मज्ञानाचां । ध्रुव देवो गगनींचा । तैसा राहिला ॥621॥ तयाचां ठायीं ज्ञान । या बोला म्हणसी व्यवधान । जे ज्ञानीं बैसलें मन । तेव्हांचि तें तो ॥622॥ तरी बैसलेपणें जें होये । ते बैसतांचि बोलें न होये । तरि ज्ञाना तया आहे । सरिसा पाडु ॥623॥ आणि तत्त्वज्ञान निर्मळ । फळे जें एक फळ । तें ज्ञेयहीवरी सरळ । दिठी जया ॥624॥ एऱ्हवीं बोधा आलेनि ज्ञानें । जरी ज्ञेय न दिसेचि मनें । तरी ज्ञानलाभुही न मने । जाहला सांता ॥625॥ आंधळेनि हातीं दिवा । घेऊनि काय करावा । तैसा ज्ञाननिश्चयो आघवा । वायां जाय ॥626॥ जरि ज्ञानाचेनि प्रकाशें । परतत्त्वीं दिठी न पैसे । ते स्फूर्तीचि असे । अंध होऊनि ॥627॥ म्हणोनि ज्ञान जेतुलें दावीं । तेतुली ही वस्तुचि आघवी । तें देखे ऐसी व्हावी । बुद्धि चोख ॥628॥ यालागीं ज्ञानें निर्दोखें । दाविलें ज्ञेय देखे । तैसेनि उन्मेखें । आथिला जो ॥629॥ जेवढी ज्ञानाची वृद्धी । तेवढीच जयाची बुद्धी । तो ज्ञान हे शब्दीं । करणें न लगे ॥630॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे

    अर्थ

    तो म्हणतो की, हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांति होय, अशा निश्चयाला त्याची बुद्धि मेरुप्रमाणे (आधार) होते. ॥620॥ याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्मज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुवाच्या तार्‍याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो ॥621॥ त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, या माझ्या बोलण्यात आडपडदा आहे, असे अर्जुना तू म्हणशील (तर तुला स्पष्ट सांगतो की) जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले, तेव्हाच तो (पुरुष) ते (ज्ञान) झाला. ॥622॥ तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही, तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्य़ास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे. ॥623॥ आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते, ते फल म्हणजे ज्ञेय (ब्रह्म) होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टि नीट जाऊन भिडते ॥624॥ वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल, तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला, तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही. ॥625॥ आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला तरी त्याचा त्याला काय उपयोग? त्याप्रमाणे आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही, तर ते (ज्ञेयाचे) ज्ञान म्हणून जे जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो, त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो. ॥626॥ जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे, असे म्हणावयास हरकत नाही. ॥627॥ म्हणून ज्ञान जेवढे दाखवील तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तु पाहील अशी बुद्धी शुद्ध पाहिजे. ॥628॥ याकरिता निर्मळ ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पाहते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे ॥629॥ जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे, तो ज्ञानाचे रूप आहे, हे शब्दाने सांगावयास नको. ॥630॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे

    August 15, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी

    August 14, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    By Team AvaantarAugust 16, 2026

    अध्याय तेरावा सूर्याचां होणां होईजे । कां सूर्यासवेंचि जाईजे । हें विकलेपण साजे । प्रभेसि…

    सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे

    August 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी

    August 14, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मालमत्ता, परदेशवारी, अध्यात्म

    August 17, 2026

    साताजन्माचे नाते

    August 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान

    August 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 ऑगस्ट 2026

    August 17, 2026

    नर्मदेSS हर हर.. माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडविणारा अनुभव

    August 16, 2026

    जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    August 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 398
    • अवांतर 205
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 538
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 855
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मालमत्ता, परदेशवारी, अध्यात्म

    August 17, 2026

    साताजन्माचे नाते

    August 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान

    August 17, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.