Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आत्मसन्मान

    September 24, 2026

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, September 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » उपवास
    ललित

    उपवास

    प्रणाली मंगेश महाशब्देBy प्रणाली मंगेश महाशब्देAugust 7, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रणाली मंगेश महाशब्दे, प्रणाली मंगेश, प्रणाली महाशब्दे, संयुक्त कुटुंब पद्धती, संयुक्त कटुंबातील संस्कार, मोबाइलचे व्यसन, मोबाइलचे व्यसन सोडविणारा उपवास, वाचनाला प्रोत्साहन, डिजिटल डिटॉक्स, मंदिरांचा अभ्यास, घरातील ज्येष्ठांचा सुज्ञपणा, मानसिक आरोग्यदायी उपवास,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    घरात तीन पिढ्या आनंदाने नांदत आहेत. छोटे-मोठे खटके तर सगळीकडेच उडत असतात, त्याला हे अपवाद कसे असतील? तर, असे हे एकत्र कुटुंब आजी-आजोबा त्यांची दोन मुलं, त्यांची पुन्हा दोन दोन मुलं असे 10 जण एका छताखाली गुण्यागोविंदाने रहातात. (काय स्वप्नातील गोष्ट वाटते ना? पण खरंच असे कुटुंब आहे) 10 जणांचे 10 स्वभाव म्हणजे 10 वेगवेगळे मणी, पण तरी सगळे एका धाग्यात बांधले गेले आहेत.

    कोणाला कधी कोणाची गोष्ट पटते तर, कधी पटत नाही. पण सगळ्यांनीच रात्री जेवण एकत्र करायचे असे ठरविले आहे. त्यामुळे दिवसभराच्या सगळ्या कुरबुरी झोपण्यापूर्वीच संपवायच्या! ज्यामुळे शांत झोप लागते, असे त्यांचे म्हणणे.

    आता मुलांमुळे थोडे वेळेचे गणित चुकते, पण तेवढे चालते. मुलं जेवणं झाली की, मोबइल, टीव्ही बघत बसतात. त्यामुळे सगळीच मुलं त्यांच्या वेगळ्याच विश्वात! दोघेजण कॉलेजला जातात तर, दोघे शाळेत… पण म्हणतात ना “ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला”… मोठ्यांचे बघून लहान पण मोबाइलवरच जास्त दिसायला लागले होते. आधीच्या सारखे कोणत्या कामात मदत नाही की, गप्पांमध्ये सहभागी नाहीत. सुटीच्या दिवशी तर विचारायलाच नको! आजी-आजोबा बघत होते की, मुलं जास्तच मोबाइलमध्ये रमत आहेत.

    सध्या घरातील वातावरण बदलले आहे थोडेसे, हे मोठ्या नातवाच्या लक्षात आले. जेवणात बदल झाला आहे. त्याने तसे रात्री जेवताना विचारले सुद्धा! (मोठे सगळेजण तर याचीच वाट बघत होते, कधी यांच्याबरोबर बोलता येईल.)

    मग आजीने विचारले “काय रे आपण नेहमी उपवास करतो, तो का करतो असे वाटते तुम्हाला?”

    मोठा नातू, “पहिल्यापासून करत आलो म्हणून आता पण करतो!”

    आजोबा, “कसे रे तुम्ही? काही विचारले तर लगेच मोबाइल काढता, तुमचा त्याच्यावरच जास्त विश्वास! मग असा प्रश्न कधी मोबाइलवर का नाही विचारला?  आम्ही करतो म्हणून तुम्ही करणार का?”

    हेही वाचा – चला तोंड गोड करूया…

    मोठी नात, “तसं नाही, पण वातावरण खराब असते, त्यामुळे जे पचेल तसे पदार्थ प्रत्येक ऋतुमध्ये खातात ना? मग तसेच या उपवासाचे असेल.”

    मोठी सून, “ताईसाहेब तुमचे बरोबरच आहे, पण यामध्ये फक्त खाण्याकडे लक्ष असते का?”

    छोटी नात, “काकू, ताई बरोबरच म्हणते ना? म्हणजे वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठीच तर उपवास करतात…”

    आजी, “अरे, ते तर आहेच! पण उपवासामुळे मन देवपूजा, जप, ध्यान आणि सत्संगाकडे वळते.”

    आजोबा, “एवढेच नाही तर, आरोग्याची काळजी, त्याग, शिस्त यासारख्या गोष्टी पण येतात बरं का.”

    नातू, “आता त्याचा येथे काय संबंध?”

    आजी, “आता बघा, जसे खाण्याच्या पदार्थांच्या पद्धतीत बदल झाला. म्हणजे आपण काय फक्त खाण्यासाठी जेवतो का?  उपवासाचा मुख्य उद्देश केवळ अन्नत्याग नसून मन, वाणी आणि आचरण यांची शुद्धी हा आहे.”

    मोठा मुलगा, “त्यामुळे चातुर्मासात केवळ अन्नाचा नव्हे, तर मन विचलित करणाऱ्या सवयींचाही त्याग करायचा; म्हणजे आपण त्यामधून संयम शिकतो.”

    आजी, “आले का लक्षात? मन विचलित करणाऱ्या गोष्टी महत्त्वाच्या… आम्ही जेवणावर संयम ठेवतो आता तुमची पिढी नवीन, विचार नवीन बघा काय नवीन सुचते का? कोणत्या गोष्टी संयमाने बाजूला ठेवू शकता?”

    मुलांसमोरच प्रश्न ठेवला, त्यामुळे मुलं विचार करू लागली. आपण कोणती गोष्ट बाजूला ठेवू शकतो. त्यांच्यासाठी आत्ता अभ्यास महत्त्वाचा, त्यामुळे तो कसा बाजूला ठेवणार? घरातील कामं करणे, हे तर घरातील एकट्याचे काम नसल्यामुळे ते पण बाजूला ठेवू शकत नाही. मग काय??

    घरातील बाकीचे सगळे मुलांकडे बघत होती. मुलं काय ठरवतात ते ऐकण्यासाठी उत्सुक होती. कारण उपवास कसा करायचा, हा प्रत्येकाचा वैयक्तिक विचार, असा घराचा विश्वास! जो तो आपल्या कुवतीनुसार, इच्छेनुसार उपवास करत होता ना…

    मुलांनी “आम्हाला थोडी मदत करा,” असे सांगितले, त्यामुळे घरच्यांनी वाचन करा, वेगवेगळ्या मंदिरात जाऊन तेथील वेगळेपण बघा, लोक संपर्क वाढवा, नवीन काहीतरी शिका असे प्रकार सुचवले. पण सगळ्या मुलांनी “आम्हाला वेळ कुठे हे करायला!” असे सांगितले. मग वेळ कसा काढता येईल, याचा विचार करायला सांगितले तर, मुलं म्हणाली थोडा वेळ नक्कीच काढू शकतो. चौघा मुलांनी शाळा, कॉलेज, इतर गोष्टी यामधून अर्धा तास काढायचा ठरवले आणि मंदिरात जायचे ठरविले.

    त्यावर घरातील इतर मोठ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि आठ दिवसांनी आपापले अनुभव सांगायचे ठरवले.

    0000

    ठरल्याप्रमाणे आठ दिवसांनी सगळे गप्पा मारत होते. मुलं त्यांचे अनुभव सांगत होते – मंदिरात कसे वाटले? काय काय बघितले? कशी वेगवेगळ्या प्रकारची लोकं बघितली?

    चौघेजण आपापल्या क्षमतेनुसार सांगत होते… छान वाटत होते त्यांना!

    आजोबा, “बघा म्हणजे वेळ नाही, असे म्हणायचे नाही, तो मुद्दाम काढायचा. ज्यामुळे वेगळे काही बघायला, शिकायला मिळते.”

    आजी, “चला म्हणजे तुमचे पण उपवास सुरू झाले तर आमच्याबरोबर तुम्हाला फराळाचे खायला मिळेलच, तसेच जसा वेळ मिळेल तसे तुमच्याबरोबर आम्ही पण तुमच्या या नवीन उपवासामध्ये सामील होऊ.”

    हेही वाचा – सगुण साकार उपासना

    छोटी नात, “आजी, पण नेहमी एकाच ठिकाणी नाही जायचे बरं का? कधी मंदिरात जाऊ, कधी जवळ असलेल्या एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी जाऊ… तेथे जाऊन स्वच्छता करू! कधी नवीन ठिकाणी जाऊन तिथली माहिती घेऊ… असेही आम्हाला शाळेत सांगतातच ना की, या ठिकाणची माहिती लिहून आणा, एखाद्या आश्रमाला भेट द्या, गरजूंना मदत करा… मग ते या निमित्ताने पूर्ण करू.”

    घरातील सगळ्यांनाच हा नवीन उपवास आवडला. शेवटी उपवासाचा मुख्य उद्देश केवळ अन्नत्याग नसून मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास हातभार लावणे हा आहे. (सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, काही न सांगता मोबाइल पण थोडा बाजूला झाला. नवीन शब्दांत सांगायचे तर “डिजिटल डिटॉक्स”ला सुरुवात झाली की मुलांच्या! तेच तर हवे होते…)

    म्हणतात ना काय करू नको, हे सांगण्यापेक्षा काय करायचे हे सांगायला हवे!

    प्रणाली महाशब्दे
    प्रणाली मंगेश महाशब्दे

    संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494

    Related Posts

    आत्मसन्मान

    September 24, 2026 ललित

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026 ललित

    सुधाकररावांचा सन्मान

    September 23, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आत्मसन्मान

    By तृप्ती देवSeptember 24, 2026

    मालती नावाची एक साधी, परंतु मेहनती स्त्री छोट्याशा घरात राहणारी. चार-पाच घरांत कामं करत होती.…

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    सुधाकररावांचा सन्मान

    September 23, 2026

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आत्मसन्मान

    September 24, 2026

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 447
    • अवांतर 214
    • आरोग्य 150
    • पंचांग आणि भविष्य 596
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 943
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आत्मसन्मान

    September 24, 2026

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.