Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    टिपिकल

    September 22, 2026

    ललिताची खरेदी

    September 22, 2026

    जीएसबी गणपतीची भव्यता अन्…

    September 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!
    फूड काॅर्नर

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरAugust 7, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, माधवी जोशी माहुलकर, लेखिका माधवी जोशी माहुलकर, माधवी जोशी, माधवी माहुलकर, स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स, मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स, मूग स्वीट कॉर्न चीज बॉल्स, स्प्राऊटेड मूग स्वीट कॉर्न चीज बॉल्स
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्प्राऊटेड मुग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स हा पदार्थ म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेल्या साहित्याचा हा मेकओव्हर आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण माझ्या स्वयंपाकघरात वाटीभर मोड आलेले मूग आणि दीड वाटी स्वीट कॉर्न उरले होते. सॅलडमध्ये वापरून झाले होते आणि वाफवून खाऊनही झाले होते. आता या उरलेल्या मक्याच्या दाण्यांचे आणि मोड आलेल्या मुगाचे करायचे काय, हा प्रश्न होता. उसळीसारखे करावे म्हटले तर, मुले म्हणाली, “हे असले काही करू नको!” हे दाणे वापरून पुलाव करावा म्हटले तर, त्यांची भाताचा प्रकार खायची इच्छा नव्हती. बाहेर पडणारा पाऊस पाहून काहीतरी चटपटीत खायला हवे, असा त्यांचा आग्रह होता!

    मला तर कसेही करून हे स्वीट कॉर्नचे दाणे आणि मोड आलेले मूग संपवायचे होते. घरात मैदा होता, चीज होते, बटाटे होते आणि ब्रेड क्रम्सही होते. मग काय, थोडा विचार केला आणि तो लगेच कृतीत आणला! मूग आणि स्वीट कॉर्नचे चीज बॉल्स पाहून माझा नवरा आणि मुले म्हणाली देखील, “आईला जर काही संपवायचे असेल, तर ती त्याचा बरोबर वापर करून आपल्या गळी उतरवते!” परंतु असे बोलणाऱ्या मुलांनी आणि नवऱ्याने हा हा म्हणता, “हे चीज बॉल्स खूप छान झालेत! तू खरंच ग्रेट आहेस!” असे म्हणत ते चट्टापट्टा संपवले देखील!

    हेही वाचा – Recipe : मोड आलेल्या मेथीदाण्यांचे रुचकर लोणचे!

    मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स बनविण्याची रेसिपी अशी आहे…

    साहित्य

    • मोड आलेले मूग – 1 वाटी
    • स्वीट कॉर्न – दीड वाटी
    • उकडलेले बटाटे – 2
    • हिरवी मिरची, आले आणि कोथिंबिरीची पेस्ट – 2 चमचे
    • रेड चिली फ्लेक्स – 4 चमचे
    • ॲारेगॅनो – 2 चमचे
    • जिरेपूड – 1 चमचा
    • धणेपूड – 1 चमचा
    • आमचूर पावडर – 1 चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • चीज क्यूब्स – 5 (तुकडे केलेले)
    • मैद्याची घट्टसर स्लरी – 2 ते 3 चमचे मैदा
    • बाईंडिंगसाठी – थोडा मैदा व ब्रेड क्रम्स
    • ब्रेड क्रम्स – कोटिंगसाठी (गरजेनुसार)
    • तेल – तळणासाठी

    हेही वाचा – Recipe : पालक आणि कांद्याच्या पातीचे रायते

    कृती

    1. मोड आलेले मूग आणि स्वीट कॉर्न एकत्र करून मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्यावेत.
    2. यामध्ये दोन उकडलेले बटाटे हाताने चांगले कुस्करून मिक्स करावेत.
    3. नंतर यात हिरवी मिरची-आले-कोथिंबीर पेस्ट, रेड चिली फ्लेक्स, ॲारेगॅनो, जिरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे.
    4. वरून बाईंडिंगसाठी थोडा मैदा आणि थोडे ब्रेड क्रम्स घालून हे मिश्रण चांगले एकजीव करावे.
    5. चीज क्यूब्सचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. दोन ते तीन चमचे मैद्याची घट्टसर स्लरी तयार करावी आणि एका ताटामध्ये ब्रेड क्रम्स घ्यावेत.
    6. त्यानंतर मूग आणि मक्याच्या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून त्यांच्या मध्यभागी चीजचा एक चौकोनी तुकडा ठेवावा आणि चीज क्यूब सर्व बाजूने आत दाबून गोळा परत एकसारखा गोल करावा. असे सर्व गोळे तयार करून घ्यावेत.
    7. गॅसवर कढईत दोन ते तीन पळ्या तेल गरम करायला ठेवावे.
    8. तेल गरम होईपर्यंत हे गोळे मैद्याच्या स्लरीत बुडवून नंतर ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित घोळवून तयार ठेवावेत. ब्रेड क्रम्स सर्व बाजूंनी व्यवस्थित लागायला हवेत.
    9. तेल छान गरम झाले की, हे गोळे मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
    10. चवीला अतिशय सुंदर आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार झालेले हे स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करावेत.

    तसे पाहायला गेले तर हे एक प्रकारचे पकोडेच झाले, परंतु यामध्ये मी ॲारेगॅनो, रेड चिली फ्लेक्स आणि चीज क्यूब्सचा वापर केल्यामुळे साधारण वाटणाऱ्या मुगाने आणि स्वीट कॉर्नने आपले रंगरूप बदलले आणि त्यासोबत त्यांच्या चवीतही छान ट्विस्ट आला! पावसाळी वातावरणात गरमागरम मूग-स्वीटकॅार्न चीज बॉल्सचे हे सरप्राइज घरातील सर्वांनाच आवडण्यासारखे आहे.


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल… टुट्टुमियाच्या शेंगांचे लोणचे!

    September 19, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : दाणेदार बेसन-काजू बर्फी अन् शाही ब्रेड रोल

    September 7, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    By Team AvaantarSeptember 21, 2026

    चिंचेच्या ठेच्यासाठी साहित्य ओल्या चिंचा – अर्धा किलो (मध्यम तयार झालेल्या) ओल्या मिरच्या – 20…

    Recipe : विदर्भ स्पेशल… टुट्टुमियाच्या शेंगांचे लोणचे!

    September 19, 2026

    Recipe : दाणेदार बेसन-काजू बर्फी अन् शाही ब्रेड रोल

    September 7, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल… घनुले!

    September 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    टिपिकल

    September 22, 2026

    ललिताची खरेदी

    September 22, 2026

    जीएसबी गणपतीची भव्यता अन्…

    September 22, 2026

    अवतीभवतीचा अनमोल आनंद

    September 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती

    September 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 सप्टेंबर 2026

    September 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 444
    • अवांतर 214
    • आरोग्य 149
    • पंचांग आणि भविष्य 593
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 937
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    टिपिकल

    September 22, 2026

    ललिताची खरेदी

    September 22, 2026

    जीएसबी गणपतीची भव्यता अन्…

    September 22, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.